महाराष्ट्रात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पीएफआयशी संबंधित कार्यकर्त्यांवर देशभरात एनआयएकडून कारवाई होत असताना पोलिसांनीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पवईतही पोलिसांनी या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
पीएफआयविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत असलेल्या कारवाई विरोधात पवई येथून अटक पदाधिकारी हा ट्वीट करत असल्याचा आरोप आहे. तसेच तो सरकारविरोधी व धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट करत तसेच रिट्विट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
पवई पोलिसांनी यासंदर्भात आवर्तन पवईला पुष्टी करतानाच मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या कार्यालयाकडून पवई पोलिसांना मिळालेल्या एका पत्रानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
No comments yet.