आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याला झुंज करणाऱ्या बैलाने धडक देवून जखमी केल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेची आयआयटी प्रशासनाने गंभीर दखल घेत कॅम्पस परिसरात फिरणाऱ्या गाई-बैलांसाठी शेल्टर उभारण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी आयआयटी व्यवस्थापन मंडळाने कॅम्पस परिसरात योग्य अशी जागा पाहण्यास देखील सुरुवात केली आहे.
पवईतील आयआयटी मुंबईमध्ये इंटर्नशिप करत असणाऱ्या अक्षय लथा असर या विद्यार्थ्याला पाठीमागील आठवड्यात झुंज करणाऱ्या बैलाने धडक देवून जखमी केल्याची घटना घडली होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन बैलांमध्ये झुंज सुरू असताना धावणाऱ्या बैलाने गेट क्रमांक ९ जवळ अक्षयला जोरदार धडक दिली होती. ज्यात तो जखमी झाला होता. त्याच्यावर विक्रोळी येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पालिकेने परिसरातील भटके बैल आणि गायी यांना पकडण्यासाठी कारवाई सुरु केली होती. मात्र कॅम्पस भागात असणाऱ्या गायी व बैल हे आयआयटीच्या मालकीचे असल्याचा दावा करत आयआयटीतील काही कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला होता. यामुळे कारवाईसाठी आलेल्या पालिका अधिकारी आणि आयआयटी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत ६ ते ७ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत या वादावर पडदा टाकला होता.
कॅम्पस भागात सदा-सर्वदा असणाऱ्या हिरव्या चाऱ्यामुळे भटक्या गायी-बैलांचा कॅम्पस भागात नेहमी वावर असतो. त्यांची देखभाल करता यावी, त्यांना निवारा मिळावा याबाबत आयआयटी प्रशासन विचार करत आहे.
त्याला गोशाळा म्हणता येणार नाही, ते शेल्टर असू शकते” अशी प्रतिक्रिया याबाबत बोलताना आयआयटी मुंबईने दिली आहे.
No comments yet.