रविराज शिंदे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर बनवण्यात येणाऱ्या चार शौचालयांपैकी, आयआयटी मार्केट येथे पहिले शौचालय बनवण्यात आले आहे. या शौचालयाचे उद्घाटन रविवारी स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले असून, मंजुरीनंतर एक वर्षानंतर अखेर आता ते जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यात उरलेल्या शौचालयांचे काम पूर्ण करून ती जनतेसाठी खुली केली जाणार आहेत. […]
Author Archive | आवर्तन पवई
खदानीत सापडला तरुणाचा मृतदेह
रविराज शिंदे मंगळवार पासून गायब असणाऱ्या पवईतील एका वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह हनुमान नगर येथील खदानीत शुक्रवारी पहाटे सापडला असून, त्याची हत्या कि आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. सोनू पांडियन (२०) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पवईतील महात्मा फुले नगरमधील रहिवाशी आहे. पवईतील महात्मा फुले नगरमध्ये आपल्या ३ भावंडासह राहणारा सोनू कचरा वेचण्याच […]
पवई तलावातील मगरींचे संवर्धन, पालकत्व स्विकारण्यास पालिका, वन विभागाची टोलवाटोलवी
पवई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे पवई तलाव प्रदूषित झाला असून, मगर दर्शन घडणाऱ्या मुंबईतील एकमेव पवई तलावातील मगरींचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. तलावातील वाढत्या प्रदूषणामुळे तलावात असणाऱ्या मगरींचा आधिवास संपुष्टात येत असल्याबाबत प्राणीमित्र आणि पर्यावरणवादी संस्थांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, या मगरींचे संवर्धन करण्यास व पालकत्व घेण्यास महापालिका आणि ठाणे वन विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत […]
‘निव फौंडेशन’ची अंमली पदार्थां विरोधात जनजागृती रॅली
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत, पवईकरांच्यात जनजागृती करण्यासाठी ‘निव फौंडेशन’च्या वतीने शनिवारी २५ जूनला संध्याकाळी ५ वाजता हिरानंदानीतील ‘गलेरिया मॉल ते हेरिटेज गार्डन’ येथे जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी पथनाट्याद्वारे लोकांच्यात जनजागृती केली जाणार असून, अंमली पदार्थ विरोधी पथक व अंमली पदार्थ नियंत्रक पथकाचे अधिकारी सुद्धा लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. अनेक परिसरात […]
तलावाला वाचवण्यासाठी काय करताय? उच्च न्यायालयाने म्हाडा व पालिकेला मागितले उत्तर
नैसर्गिक संपत्ती असणाऱ्या पवई तलावात गेले अनेक महिने दुषित, घाण, गटाराचे पाणी सोडून प्रदूषण केले जात आहे. पवई तलावाची गेल्या काही वर्षात झालेली दुर्दशा विचारात घेता, पवई तलाव वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने म्हाडा व मुंबई महानगरपालिकेने तलावाला वाचवण्यासाठी काय पावले उचलली आहेत? अशी विचारणा केली […]
विकास आराखड्यात हरकती व सूचना सुचवण्यासाठी पवईकरांना सुवर्णसंधी
आयआयटी येथील शिवसेना शाखा क्रमांक ११५ मध्ये पाहा प्रारूप आराखडा. सुचवा आपल्या हरकती व सूचना. आधीच्या विकास आराखड्याला रद्द केले गेल्यानंतर पालिकेने काहीच महिन्यातच नवीन प्रारूप आराखडा तयार केला आहे. पालिकेचा हा नवीन प्रारूप आराखडा पवईकरांना पाहण्यासाठी शिवसेना शाखा ११५ मध्ये ठेवण्यात आला असून, त्यात हरकती आणि सूचना सुचवण्यासाठी शिवसेना शाखा ११५ तर्फे पवईकरांना आमंत्रित […]
कचऱ्याच्या समस्येसाठी युथ पॉवरचे पालिकेला पत्र
पवईत अनेक परिसरात कचराकुंड्यांची सोय नसल्याने उघड्यावर कचरा फेकला जात असून, यामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच समस्येला पालिकेच्या निदर्शनास आणण्यासाठी युथ पॉवर संघटनेतर्फे पालिका एस विभागाला कचराकुंडीची सोय करण्याचे पत्र देण्यात आले आहे. ‘स्वच्छ मुंबई – सुंदर मुंबई’चे ब्रीद वाक्य उराशी बाळगत मुंबईला स्वच्छ ठेवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या गचाळ आणि गलथान […]
पवई तलाव वाचवण्यापासून पालिका शोधतेय पळवाटा – स्थानिक नागरिक
पवई तलावाला गेल्या अनेक दिवसापासून गटाराचे सांडपाणी सोडून प्रदूषित केले जात आहे. यासंदर्भात स्थानिक जनता आणि पर्यावरणवादी संस्थेने पालिकेला तक्रारी दिल्या आहेत. मात्र हे सर्व पालिकेच्या संगनमताने होत असल्याने, पालिका अधिकारी संस्थेच्या प्रतिनिधिंना भेट देण्यास टाळाटाळ करत आहेत व बेजबाबदार वक्तव्य व उडवाउडवीची उत्तरे देवून पळवाटा शोधत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा […]
तुळशीच्या रोपांचे वाटप करून साजरा केला साहेबांचा वाढदिवस
प्रदूषण वाढीमुळे निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास रोखण्यासाठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने पवईमधील नागरिकांना तुळशीची रोपे भेट देवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला. नेत्याचा वाढदिवस आला की गल्ली बोळात साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर पोस्टर झळकतात. मात्र १४ जून रोजी असणारा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस पोस्टर्स लावून […]
महिलांना गोड बोलून लुटणाऱ्या इसमाचा पवईत धुमाकूळ
पवई पोलिसांचा महिलांना सतर्कतेचा इशारा, मुंबई पोलीस हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन चांदिवली, हिरानंदानी येथील महिलांशी प्रेमळ, गोड बोलून लुटणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या इसमाने गेल्या अनेक दिवसांपासून पवईत धुमाकूळ घातल्याने महिलांमध्ये एकच खळबळ माजली आहे. एकट्या महिलेला गाठून तिच्याशी प्रेमळ, गोड बोलून, कोरिओग्राफर असल्याचे सांगून हा इसम त्यांच्याकडून पैसे व वैयक्तिक माहिती मिळवीत आहे. पैसे नाकारल्यास […]
पवई तलाव वाचवण्यासाठी युथ पॉवर सरसावले
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मानवी साखळीतून केली जनजागृती रविराज शिंदे ‘भ्रष्टाचाराचा बोलबाला, पवई तलावाचा नाला केला’ ‘दुर्लक्ष कोणाचे? लोकप्रतिनिधींचे, पालिका प्रशासनाचे’ या घोषणांनी रविवारच्या सकाळी पवई तलाव परिसर निनादला. पवई तलावात पावसाचे पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या सुविधांमधून येथील वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. तलावाची होणारी दुर्दशा रोखण्यासाठी व नैसर्गिक अस्तित्व राखण्यासाठी ‘युथ पॉवर’ संघटनेने […]
अन् उभी इंडिगो पेटली
चांदिवली भागात चालत्या रिक्षाला आग लागून रिक्षा जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच, आयआयटी येथील तिरंदाज शाळेसमोर कारच्या एसीत शॉर्ट झाल्याने पार्किंगमध्ये उभी टाटा इंडिगो पेटल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. मात्र इंडिगो गाडी पूर्ण जळून खाक झाली असून, तिच्या जवळ पार्क असणाऱ्या कॉलीस आणि मारुती […]
साकीनाका पोलिसांनी तीन तासात लावला अपहरण झालेल्या मुलाचा छडा
साकिनाका परिसरातून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याचा तपास करणाऱ्या साकीनाका पोलिसांनी अथक प्रयत्न करत अवघ्या तीन तासांमध्ये त्याला शोधून काढत आईवडिलांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्याच्या उकलीमुळे केवळ अपहरणाच्या गुन्ह्याचाच उलघडा झाला नसून, त्याच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाचे पितळ सुद्धा उघडे पडले आहे. साकिनाका येथील हॉलिडे इन हॉटेल जवळ असणाऱ्या सत्यानगर पाईप लाईन जवळील […]
चांदिवलीत बनणार भव्य क्रीडा संकुल
चांदिवली म्हाडा वसाहतीतील पालिकेच्या ताब्यात असणाऱ्या दोन एकर मैदानात, लवकरच माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ भव्य क्रीडा संकुल बनवण्याचे शिवधनुष्य नुकतेच शिवसेनेत सामिल झालेले परिसराचे नगरसेवक ईश्वर तायडे यांनी उचलले आहे. याचे उदघाटन शिवसेना विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते नुकतेच चांदिवली म्हाडा येथे पार पडले. पवई, चांदिवली भागात मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानांची मोठी […]
आयआयटी, मुंबईची विदयुत कार ‘ओर्का’ फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धेसाठी सज्ज
फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धेसाठी आयआयटी मुंबईची रेसिंग टिम सज्ज झाली असून, विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या ‘ओर्का’ या पाचव्या इलेक्ट्रिक रेसिंग कारचा अनावरण आणि प्रात्यक्षिक सोहळा रविवारी आयआयटीत विद्यार्थ्यांच्या उपस्थित पार पडला. ० ते ३.४७ सेकंदात १०० किमी वेग पकडणाऱ्या या कारच्या साहय्याने आपली छाप नक्की पडेल असा विश्वास आयआयटी मुंबईच्या रेसिंग टिमने दर्शवला आहे. इंग्लंडमधील सिल्वरस्टोन सर्किटवर […]
नैराश्यातून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
प्रमोद चव्हाण @pracha2005 उच्चशिक्षित असूनही चांगली नोकरी मिळत नाही आणि त्यामुळे लग्न ठरत नाही, या नैराश्यातून आयआयटी येथील पॅराडायज इमारतीत राहणाऱ्या जसकमल सेहगल (३०) या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल पवईत घडली. पवई पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंद केला असून ते अधिक तपास करत आहेत. लंडन येथून एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर जसकमल आपल्या आईवडिलांसोबत […]
पवईकर दांपत्याची बीएमडब्ल्यूने विश्वसफर
@pracha2005 पवईकर जेनेट (५५) आणि लुईस (६१) डिसोझा यांना दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी वेगळे चित्तथरारक करण्याची इच्छा होती. त्यातूनच वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले गेले आणि हे जोडपे २० मे पासून आपल्या बीएमडब्ल्यू गाडीने ४० पेक्षा अधिक देशाच्या विश्वसफरीसाठी निघाले आहे. जवळपास ६ ते ७ महिन्याच्या प्रवासात ५० हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतराची त्यांची ही सफर […]
बस थांब्यांच्या छतासाठी युथ पॉवरचे छत्री आंदोलन
रविराज शिंदे उन्हामुळे शरिराची काहिली होत असतानाचा आयआयटी भागात बसथांब्यांवर लोकांना सावलीसाठी छत नसल्याने, प्रवाश्यांना कडक उन्हाच्या झळा सोसत उभे रहावे लागत आहे. वर्षानुवर्ष सोसत असणाऱ्या पवईकरांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी, येथील युथपॉवरच्यावतीने प्रवाश्यांना छत्री वाटून अनोखा निषेध नोंदवत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारा चिमटा काढला आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड निर्मिती दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी […]
सोमय्यांची पवई तलावाला भेट, पालिका अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
अविनाश हजारे पवई तलावाचे होणारे गटार रोखण्यासाठी आवर्तन पवई, पॉज मुंबई आणि पवईकर यांनी हाती घेतलेल्या पवई तलाव मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी खासदार किरीट सोमय्या यांनी तलावाला भेट देत त्याची पाहणी करून झालेल्या दुरावस्थेसाठी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्वरित समस्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या पवई […]