रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई आणि मिलिंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानातून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ३ वेळेत मिलिंद विद्यालयाच्या प्रांगणात रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले. फिल्टर पाड्यासह पवईतील आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.यावेळी संस्थेतर्फे रक्तदात्यांना किराणा सामानाचे वाटप सुद्धा करण्यात आले.
रक्तदान शिबीराची संपूर्ण योजना अत्यंत काळजीपूर्वक आणि सध्याच्या परिस्थितीतील सामाजिक दुराव्याची कल्पना लक्षात ठेवून आखली गेली होती. मिलिंद विद्यालयाचे संस्थापक श्री. सदानंद रावराणे, रोटरी क्लबच्या संचालिका सविता गोविलकर यांचे या शिबिराला विशेष मार्गदर्शन लाभले. रोटरी क्लबच्या अध्यक्षा लता वनमाली आणि कार्यकर्त्या कमलिनी पाठक यावेळेस उपस्थित होते.
रक्दात्यांच्या सुविधेसाठी एका खास सुसज्ज एसी ब्लड कलेक्शन बसमध्ये या शिबीराचे आयोजन करत उत्तम नियोजन ठेवण्यात आले होते.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई या पवईतल्या पहिल्या रोटरी क्लब तर्फे गेली तीन दशके पवई आणि आसपास तसेच ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. शाळा, इ-शिक्षण, जलव्यवस्थापन आणि वैद्यकीय उपक्रम यांचा त्यात समावेश आहे.
No comments yet.