गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पवई तलावात बुडून मृत्यू

mahesh-fin-pixणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या तरुणाचा पवई तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (रविवारी) पवईत घडली. महेश गौड (२४) असे या तरुणाचे नाव असून, तो स्वतः लाइफ गार्ड म्हणून विसर्जन काळात काम पाहतो.

रविवारी सात दिवसाच्या घरगुती आणि सार्वजनिक गणेशांचे विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर सुरु होते. अशाच एका सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती रात्री ११.५० वाजता विसर्जनासाठी गणेशनगर गणेश विसर्जन घाटावर आल्यावर, याच मंडळाचा कार्यकर्ता आणि विसर्जन काळात पवई तलावावर लाइफ गार्ड म्हणून काम पाहणारा महेश गौड हा सुद्धा या गणपती सोबत जेट्टीवरून त्याला विसर्जित करण्यासाठी पवई तलावात गेला असताना त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि बुडाला.

“तो पडल्यावर तिथे उपस्थित इतर लाइफ गार्डनी पाण्यात उडी घेऊन त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. ज्यानंतर त्यांनी शोध बंद करून छोटे छोटे गणेश विसर्जन सुरूच ठेवले होते. अखेर अग्निशमन दलाने येऊन दीड तासानंतर त्याला बाहेर काढले” असे आवर्तन पवईशी बोलताना मंडळाचा कार्यकर्ता आणि त्याचा नातेवाईक नागराजने सांगितले.

“राजावाडी रुग्णालय येथे नेले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याच्या शवविच्छेदनात त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट होत असून, आम्ही अधिक तपास करत आहोत” असे पवई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

“पालिकेतर्फे पवई तलावात गणेश विसर्जनाचे काम हे केवळ एकाच व्यक्तीला वर्षानुवर्ष दिले जात असल्याने त्याच लोकांची येथे मनमानी चालते. यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आणि कामाच्या पद्धतीत अनेक त्रुटी असल्याची माहिती आम्ही वारंवार पोलीस आणि पालिका प्रशासनाला देऊनही डोळेझाक करत परत त्याच व्यक्तीला काम दिले जात असल्यामुळे, सुरक्षेच्या अभावी आम्हाला एक कार्यकर्ता गमवावा लागला आहे” असे यावेळी बोलताना प्रभा बालन म्हणाले.

ते पुढे म्हणाले “निष्काळजीपणा बाळगल्याबद्दल आणि युवकास शोधण्यास केलेल्या दिरंगाईबद्दल पालिकेने त्वरित त्यांचे काम बंद करून कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.”

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

3 Responses to गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पवई तलावात बुडून मृत्यू

  1. sheetal raut September 13, 2016 at 4:50 pm #

    Why you are doing politics in between this poor accident.

    • Avartan Powai September 14, 2016 at 1:03 pm #

      हे राजकारण नाही बातमी आहे…बातमीचा उद्देश राजकारण नसून न्याय मिळवून देणे आहे…

  2. Sarita Rakesh Hirve September 12, 2016 at 9:35 am #

    Agnikshaman dalane navhe tar tithe upsthit aslelya life guard nech shodhun kadhale Mahesh la. Jar ka Mumbai sarkhya developed shahrat evdhaya ushirane hat pay chalavale jatat hyache aaj swata pratyksh anubhav milala. Farch slow system aahe. Ani ek vinanti Life guard mitrana krupya karun tumche je T-shirts tumhi distribute kartat te fakt jyala changale swimming karta yete tyala ch denyat yave. Kal jar ka Mahesh kade ha T- shirt nasta tar to aaj aaplyat asta. Mahesh chya aatmyas Shanti labho hich ishwar Charni Prarthna

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!