Social media is emerging as a very effective medium in some cases in the past few days. It has also had an impact in the case of civic problems in Chandivali. ‘Chandivali Citizens Welfare Association’ has raised a complaint to the BMC through Twitter about the pile of garbage on the pavement on Chandivali Farm […]
Archive | Chandivali News
खासदार पूनम महाजन यांनी घेतला चांदिवलीच्या नागरी समस्यांचा आढावा
शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी खासदार पूनम महाजन यांनी चांदिवली परिसराचा दौरा करत येथील वाढत्या नागरी समस्यांचा आढावा घेतला. नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना केल्या. खासदार पूनम महाजन यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त (साकीनाका विभाग) भरतकुमार सूर्यवंशी, पवई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. उत्तम सूर्यवंशी, वरिष्ठ […]
MP Poonam Mahajan reviewed the growing problems of Chandivali
On Friday, 18 November Member of Parliament (MP) Poonam Mahajan reviewed the growing problems of Chandivali. After learning about the problem from the citizens, she instructed the officials of the concerned department to take immediate measures and give relief to the citizens. Along with MP Poonam Mahajan, Assistant Police Commissioner (Sakinaka Division) Bharat Kumar Suryavanshi, […]
चांदिवलीत वाढत्या प्रदूषणाबाबत आमदार लांडे यांची पालिका सहआयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी चर्चा
चांदिवली विधानसभा परिसरात वाढत असलेल्या प्रदूषणाबाबत मुंबई महानगरपालिका सहआयुक्त अश्विनी भिडे आणि पालिका वरिष्ठ अधिकारी यांच्याशी स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी चर्चा करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी विशेषतः नहार आणि चांदिवली भागात झपाट्याने वाढत असणाऱ्या प्रदूषणाकडे त्यांचे लक्ष वेधले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच मुंबईला ‘कचरामुक्त व प्रदुषणमुक्त आणि गतिमान मुंबई […]
साकीनाका पोलीस ठाणेचे संघर्षनगरजवळ स्थलांतर; खा. पूनम महाजनांच्या हस्ते उद्घाटन
साकीनाका पोलीस ठाण्याच्या चांदिवली म्हाडा येथील इमारतीच्या पुनर्बांधणी प्रकल्पाच्या योजनेमुळे येथील पोलीस ठाणे काही काळासाठी संघर्षनगर येथील एमएमआरडीए इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. मंगळवार २० सप्टेंबरला खासदार पुनम महाजन यांच्या हस्ते या स्थलांतरित पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा पार पडला असून, येथून कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी खा. महाजन यांच्यासोबतच मुख्य अतिथी म्हणून मुंबई पोलीस […]
आदित्य ठाकरेंनी घेतले चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन
महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज, गुरुवार ०८ सप्टेंबरला चांदिवलीच्या महाराजाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी ठाकरे यांच्यासोबत माजी परिवहन मंत्री अनिल परब, माजी नगरसेवक ईश्वर तायडे, माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, युवासेना विभाग अधिकारी बालाजी सांगळे आणि शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी संघटना मजबूत करत तिला वाढवण्यासाठी […]
पवईला स्वतंत्र वाहतूक विभाग; डॉ. सूर्यवंशींकडे नेतृत्व
पाठीमागील अनेक वर्षांपासून साकीनाका वाहतूक विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या पवई परिसराला आता स्वतःचा स्वतंत्र वाहतूक विभाग मिळाला आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असणाऱ्या पवई विभागाला डिसेंबर २००२ला स्वतंत्र करत पवई पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती आणि आता २०२२च्या सुरुवातीला पवईला स्वतंत्र वाहतूक विभाग देण्यात आला आहे. पवई वाहतूक विभागाचे प्रमुख पद पोलीस निरीक्षक डॉ. उत्तम […]
पवईतील समस्यांवर पोलीस, पत्रकार, सामजिक कार्यकर्ते यांच्यात संवाद
पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी शनिवार, १८ जूनला पवई पोलीस ठाण्यातर्फे पोलीस, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात एका संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच तरुणाईमधील वाढती गुन्हेगारीसह विविध प्रश्नावर यावेळी चर्चा करण्यात आली. पोलिस, जनतेच्या समन्वयातून कायदा सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनसेतू तयार होत […]
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पवई चांदिवलीत विकास कामांचे उदघाटन
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, १३ मार्च रोजी पवई, चांदिवली येथील विकास कामांच्या उदघाटनांचा नारळ फुटला. चांदिवली संघर्षनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम, पवई येथील बौद्ध विहाराचे नुतनीकरण, विस्तार सोबतच समाजकल्याण केंद्र उभारणे आणि स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती स्थळ सुशोभिकरण कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार […]
चोरीच्या मोटारसायकलवरून ४० दिवसात ४ चोऱ्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
साकीनाका परिसरातून मोटारसायकल चोरी करून मुंबईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सरफराज उमर कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रिमांड होममधून बाहेर येताच केवळ ४० दिवसात या चोरट्याने ४ गुन्हे केले आहेत. एका अल्पवयीनच्या खुनाच्या गुन्ह्यात त्याला डोंगरी रिमांडहोममध्ये ठेवण्यात आले होते. १५ जानेवारी रोजी त्याची रिमांड […]
चांदिवलीत मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन म्हणून ‘सावली सेवा फाऊंडेशन’च्यावतीने १८ डिसेंबर रोजी सकाळीं १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत एकदिवसीय कोविड लसीकरण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. चांदिवली येथील सिंहगड कॉलेज, म्हाडा कॉलनी येथे ही लसीकरण मोहीम राबवली जाणार असून, कोविड-१९ पासून सुरक्षेसाठी शासन मान्य पहिला आणि दुसरा कोव्हीशिल्ड (Covishild) लसीचा डोस यावेळी […]
मेट्रो स्थानकाला रामबाग चांदिवली नाव द्या; चांदिवलीकरांची मागणी
मुंबई मेट्रो ६ प्रकल्पाचे काम जोमाने सुरु असून, जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर रामबाग येथे येणाऱ्या स्थानकाला रामबाग (चांदिवली) असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी चांदिवलीकरांकडून जोर धरू लागली आहे. यासाठी सर्व प्रशाकीय यंत्रणांसोबतच राज्याच्या विविध मंत्र्यांना पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. पश्चिम उपनगरातील अंधेरीतील स्वामी समर्थ नगर-लोखंडवाला ते पूर्व उपनगरातील विक्रोळी आणि कांजूरमार्ग यांना १३ स्थानकांद्वारे जोडणारी […]