Archive | Crime

cheating in name of police

व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या सराईत भामट्याला अटक

मुंबईतील विविध व्यापाऱ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांसह त्यांचा मालाचीही लूट करणाऱ्या सराईत भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप अगरवाल उर्फ प्रेमप्रकाश उर्फ राजू जगदीश मखिजा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईतील धोबी तलाव भागात राहणारे नरेंद्र तारी यांची सावंतवाडी येथे काजूची बाग आहे. सदर बागेत येणाऱ्या काजूची विक्री करण्यासाठी त्यांचा मुलगा […]

Continue Reading 0
Powai police arrested a thief who broke a shop and stole mobile phone worth Rs 1.5 lakh

दुकान फोडून दीड लाख किंमतीचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई येथील तुंगागाव भागातील राम मोबाईल शॉप फोडून त्यातील मोबाईल, ब्ल्यूटूथ, चार्जर, युएसबी केबल असे १.४२ लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. शादाब मोमीन अन्सारी (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राम प्रसाद नारायण यांचे तुंगागाव येथे राम मोबाईल शॉप नामक मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. १४ […]

Continue Reading 0
Fire breaks out at powai NTPC mhada building

पवईच्या एनटीपीसी म्हाडा कॉलनीत रहिवाशी इमारतीत आग

पवईतील एनटीपीसी म्हाडा कॉलनीमध्ये रहिवाशी इमारतीला आज, ३० नोव्हेंबर संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या ३ ते १४ माळ्यावरील बाहेरील भागात ही आग पसरलेली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

बलात्कारच्या गुन्ह्यात एकाला अटक

आपल्या सहकारी मैत्रिणीसोबत बलात्कार करणाऱ्या एका इसमाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इसाकी हरिश्चंद्र पांडीधर (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या महिलेशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी इसाकी आणि तक्रारदार महिला हे दोघेही एकाच लॅबमध्ये काम करतात. लॅबमध्येच त्यांची ओळख […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

लष्करात अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला पवई पोलिसांनी केली अटक

पवई पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि तोतयागिरीच्या आरोपाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. करण शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पवई पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचा दावा करत तिला लग्नाची बनावट आश्वासने देवून लैंगिक अत्याचार केल्याचे तिने या तक्रारीत म्हटले […]

Continue Reading 0
Man Crushed To Death While Chopping Branches In Powai

झाडाच्या फांद्या तोडत असताना फांदी पडून एकाचा मृत्यू

पवईमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे वाढलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी कंत्राटदाराने नेमलेल्या २५ वर्षीय कामगाराचा झाडाची फांदी तोडत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झाडावरील फांद्या तोडत असताना त्यातील एक फांदीखाली चिरडला गेल्याने ही घटना घडली. पवई पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदविला आहे. जसीन साकीर हाश्मी असे या व्यक्तीचे नाव आहे. आंबेडकर उद्यान […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

१८ वर्षीय तरुणाचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक

पवई तलावावर एका अठरा वर्षीय तरुणाचा खून केल्याच्या आरोपावरून मुंबई गुन्हे शाखा युनिट १० अधिका-यांनी मंगळवारी तीन जणांना अटक केली आहे. विनोद नंदलाल ठाकूर, शशांक रामचंद्र जाधव आणि निकेश गंगाराम जाधव अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, मृतक तनवीर नदाफ पवई तलाव भागात फिरत असताना आरोपी आणि नदाफ दोघांच्यात शाब्दिक वाद […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

खून करून पसार झालेल्या दोन्ही आरोपींच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चांदिवली येथे खानावळ चालवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोकसून खून करून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पवई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. उधारीवर जेवण देण्यास नकार दिला म्हणून हा खून करण्यात आला होता. विपुल सोळंकी (२२) आणि प्रकाश सोळंकी (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकल सुद्धा हस्तगत […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

उधारीवर जेवण देण्यास नकार दिला म्हणून खानावळवाल्याचा खून

चांदिवली येथे खानावळ चालवणाऱ्या २३ वर्षीय मालकाला उधारीवर भोजन देण्यास नकार दिल्याने दोन जणांनी मिळून त्याचा खून केल्याचा प्रकार रविवारी घडला. साकीविहार रोडवरील नित्यानंद गॅरेजजवळ ही घटना घडली. पवई पोलिसांनी दोन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदिवली येथील रहिवासी आसिफ आणि आरिफ अन्सारी हे चांदिवली येथे खानावळ […]

Continue Reading 0
activa theft

सराईत मोटारसायकल चोराला अटक, ४ एक्टिवा हस्तगत

पवई परिसरातून फक्त एक्टिवा मोटारसायकली चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोराला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ४ एक्टिवा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. नसीर सद्दान खान (५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीही २०१५ साली त्याला पवई पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३२ एक्टिवा आणि ४ कार हस्तगत करत मुंबईतील सर्वांत मोठ्या वाहन […]

Continue Reading 0
Shop Worker Arrested For Brutalising Powai Dog

हिरानंदानीत कुत्रीसोबत अत्याचार करणाऱ्या दुकान कामगाराला अटक

पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या गलेरिया मॉलमध्ये भटकी कुत्री नुरी हिच्यासोबत अत्याचार करून, तिच्या गुप्तांगात लाकडी पट्टी घालून अत्याचार करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शंबूनाथ ओटोकांथो प्रधान (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो याच मॉलमधील एका मिठाईच्या दुकानात काम करतो. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्या भागातील डझनभर सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

गुप्तांगात लाकडी पट्टी घालून अत्याचार, एफआयआर दाखल

हिरानंदानी, पवई येथील गॅलेरिया मॉलमध्ये राहणार्‍या ९ वर्षांच्या नुरी नामक भटक्या कुत्रीवर तिच्या गुप्तांगात लाकडी पट्टी घालून निर्घृण बलात्कार करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्राणीमित्र देवी शेठ आणि निहारिका गांधी यांनी बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्स एनजीओच्या मदतीने तिला एका पशु देखभाल केंद्रामध्ये दाखल केले. जेथे डॉक्टरांनी तिच्या खाजगी […]

Continue Reading 0
motorcycle-stunt-riding

पोलीस शिपायाला जखमी करणाऱ्या दोन स्टंट बाइकर्सना अटक

पवई तलाव भागात स्टंट करत असणाऱ्या बाइकर्सना रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदाराला जखमी करणाऱ्या दोन स्टंट बाइकर्सना पवई पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत पोलीस हवालदार धर्मा डेंगळे गंभीर जखमी झाले आहेत. साहिल गोसावी (वय १९) आणि शुभम लाखत (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या या दोन तरुणांची नावे आहेत. तरुणाईमध्ये वेगाने गाडी चालवणे, मोटारसायकलवर […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

चोरट्यांनी पळवले शौचालयातील नळ

सोने, हिरे, चांदी आणि मौल्यवान वस्तू पळवणाऱ्या चोरट्यांनी आता हाताला लागेल ते पळवायला सुरुवात केली असून, पवईतील एका घटनेत तर चोरट्यांनी चक्क शौचालयातील नळ पळवल्याची घटना पवईत घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली असून, इतर चोरीच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग मिळून आला आहे. सुनुज सरोज (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पवई […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

छातीत धारदार शस्त्राने भोकसून खून; बेवारस व्यक्तीची पटली ओळख

शनिवारी पवईतील फुलेनगर भागातील डोंगराळ भागात मिळालेल्या अनोळखी पुरुषाच्या शवाची ओळख पटली आहे. भांडूप पश्चिम येथील रमाबाई नगर येथे राहणाऱ्या प्रशांत राणे नामक व्यक्तीचे ते असल्याचे उघड झाले आहे. अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पवई पोलीस त्याच्या खुनामागील कारण आणि आरोपी यांचा शोध घेत आहेत. फुलेनगर येथील डोंगरभागात तलावाजवळ झुडूपातून वास येत असून, एक […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत एकाचा खून; कुजलेल्या अवस्थेत सापडले शव

पवई पोलिसांच्या हद्दीत एका ३० ते ३५ वर्षीय पुरुषाचे शव शुक्रवारी बेवारस अवस्थेत मिळून आले असून, त्या तरुणाचा खून झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पवई पोलीस भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलिसांना आयआयटी मार्केट जवळील फुलेनगर परिसरातील डोंगराळ भागात एका तरुणाचे शव […]

Continue Reading 0
img_2808.jpg

चैतन्यनगर घरफोड्यांच्या मास्टरमाइंडला अटक

पवई, चैतन्यनगर भागात घडणाऱ्या घरफोड्या आणि चोऱ्यांच्या मास्टरमाइंडला पवई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अनिल उर्फ बंटी सुरेश वर्मा (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, लॅपटॉप हस्तगत केले आहेत. अजूनही काही चोऱ्यांची उकल त्याच्याकडून होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पाठीमागील काही दिवसात पवई परिसरात आणि विशेषतः चैतन्यनगर आणि आसपासच्या […]

Continue Reading 0
fraud

हिरानंदानीजवळ ‘पोलिस के आदमी’ असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाचे सोन्याचे दागिने पळवले

हम पोलिस के आदमी है | तुम्ही सोन्याचे दागिने घालून फिरू नका. दागिने काढून बॅगेत ठेवा असे सांगत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे हातचलाखीने ९० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना मंगळवारी पवई, एसएम शेट्टी शाळा बस थांब्याजवळ घडली. या संदर्भात पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु आहे. पवईतील आयआयटी स्टाफ […]

Continue Reading 0
stolen tv

आता तर हद्दच झाली राव; चोरट्यांनी चक्क टीव्हीच पळवली

पाठीमागील काही दिवसात पवई परिसरात आणि विशेषतः चैतन्यनगर आणि आसपासच्या भागात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. जवळपास दर दोन तीन दिवसांनी चोरीच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी पवई परिसरात घडलेल्या एका घटनेत तर चोरट्यांनी घरात काहीच मौल्यवान वस्तू न मिळाल्याने चक्क घरातील एक टीव्ही आणि बूट पळवल्याचे समोर येत आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात […]

Continue Reading 0
atm-skimming

एटीएम वापरकर्त्यांची फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित चोराला साकीनाकामधून अटक

मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम वापरकर्त्यांची फसवणूक करणाऱ्या एका ३३ वर्षीय एमबीए पदवीधारकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तोफील अहमद लालमियां सिद्दीक असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव असून, तो कमी शिक्षित किंवा एटीएम वापराची माहिती नसणाऱ्या लोकांना आपला सावज बनवत असे. त्याच्याकडून पोलिसांनी १०० पेक्षा अधिक डेबिट कार्डे जप्त केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीक […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!