१८ वर्षीय तरुणाचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक

१८ वर्षीय तरुणाचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक

पवई तलावावर एका अठरा वर्षीय तरुणाचा खून केल्याच्या आरोपावरून मुंबई गुन्हे शाखा युनिट १० अधिका-यांनी मंगळवारी तीन जणांना अटक केली आहे. विनोद नंदलाल ठाकूर, शशांक रामचंद्र जाधव आणि निकेश गंगाराम जाधव अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, मृतक तनवीर नदाफ पवई तलाव भागात फिरत असताना आरोपी आणि नदाफ दोघांच्यात शाब्दिक वाद झाले होते. वाद सुरु असताना आरोपीने आपल्या इतर दोन साथीदारांना बोलावले. तिघांनी नदाफला मारहाण केली व त्याला गंभीर जखमी करून रक्ताच्या थारोळ्यात तिथेच सोडून पळ काढला.

नदाफच्या मित्राने त्याला जखमी अवस्थेत पडलेले पाहिले आणि त्याला ताबडतोब राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना दिलेल्या जवाबानंतर त्याचा २१ ऑक्टोबरला मृत्यू झाला होता.

२ ऑक्टोबर रोजी एका खासगी सुरक्षा कंपनीत ड्यूटीवर असलेल्या निकेशचा मोबाईल फोन व काही कागदपत्रे चोरल्याचा आरोप नदाफवर होता. माहिती मिळताच गुन्हे शाखेने निकेशला ताब्यात घेवून चौकशी केली. आपल्या इतर दोन साथीदारांसोबत मिळून त्याने हा गुन्हा केल्या असल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

युनिट १० वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चोरीनंतर तिथून पळत असताना नदाफचा चेहरा आरोपीने पाहिला होता.”

ते पुढे म्हणाले “२० ऑक्टोबर रोजी आरोपीने पवई तलावाजवळ नदाफला फिरताना पाहिले तेव्हा त्याला पकडून दोरीने बांधून त्याला मारहाण केली होती.” त्याचा मृत्यूनंतर पोलिसांनी भादवि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून, तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेत होते.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!