Archive | Health

Rotary Club of Bombay Powai distributed Sanitary Napkins

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईतर्फे कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईतर्फे घरकाम किंवा इतर मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ३५० महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करून वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे महत्त्व आणि प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. संक्रांतीच्या निमित्ताने एकता महिला समितीच्या पार्कसाईट येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. एकता महिला समिती ही सुश्री आरती चावला (बागुल) यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. या […]

Continue Reading 0
Vasantha Memorial Trust Conducts Drawing Competition1

वसंता मेमोरियल ट्रस्टच्यावतीने जागतिक कर्करोग दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

कर्करोग काळजी आणि उपचार क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव असणाऱ्या वसंता मेमोरियल ट्रस्टतर्फे शनिवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त शालेय मुलांसाठी ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. पवई आणि आसपासच्या शाळांमधील जवळपास ९० मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला. भाग्यश्री पाटील आणि प्रशांत पाटील यांनी चित्रांचे परीक्षण करून प्रत्येक श्रेणीत […]

Continue Reading 0
Hiranandani Hospital organised 'Breast Cancer Awareness Walk' 2

ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी हिरानंदानी रुग्णालयातर्फे ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस वॉक’चे आयोजन

कोविड कालावधीत (जवळपास २ वर्षांपासून) निदान न झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनाचा कर्करोग) प्रगत अवस्था असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोविड महामारीच्या निर्बंधांमुळे आणि भीतीमुळे अनेक अत्यावश्यक आरोग्य उपचार आणि शस्त्रक्रियांना सुमारे १ ते २ वर्षांचा विलंब झाला आहे. ब्रेस्ट कॅन्सरही त्याला अपवाद नाही. काही स्त्रियांना कोविडच्या काळात लहान गाठीसारखी ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची काही लक्षणे […]

Continue Reading 0
COVID-vaccine

चांदिवलीत मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन म्हणून ‘सावली सेवा फाऊंडेशन’च्यावतीने १८ डिसेंबर रोजी सकाळीं १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत एकदिवसीय कोविड लसीकरण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. चांदिवली येथील सिंहगड कॉलेज, म्हाडा कॉलनी येथे ही लसीकरण मोहीम राबवली जाणार असून, कोविड-१९ पासून सुरक्षेसाठी शासन मान्य पहिला आणि दुसरा कोव्हीशिल्ड (Covishild) लसीचा डोस यावेळी […]

Continue Reading 0
525 persons vaccinated in free vaccination campaign organized by MNS Ward 122

मनसे प्रभाग १२२तर्फे आयोजित मोफत लसीकरण मोहिमेत ५२५ जणांचे लसीकरण

सोमवार ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रभाग क्रमांक १२२ तर्फे आयोजित एक दिवसीय मोफत लसीकरण मोहिमेत ५२५ जणांना कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. पवईतील गोखलेनगर येथील मनसे कार्यालयात या एकदिवसीय लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड – १९ या महामारीने जगाला वेठीस धरले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत […]

Continue Reading 0
iit powai

आयआयटीतील शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई; कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने निर्णय

पवई स्थित इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मुंबई कॅम्पसमध्ये पाठीमागील काही दिवसात समोर येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या पाहता आयआयटीतील शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रसार रोखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कॅम्पस बाहेर सलूनमध्ये जाण्याने हा संसर्ग झाला असण्याची शक्यता येथील पथकाने वर्तवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात […]

Continue Reading 0
Coronavirus Photo Credit सांकेतिक चित्र

पवई, चांदिवलीत मंगळवारी ४९ कोरोना बाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच पवई आणि चांदिवलीत सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवार, २३ मार्चला एकाच दिवसात पवई आणि चांदिवली परिसरात मिळून ४९ नव्या बाधितांची नोंद पालिकेकडे झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभरातील या परिसरातील कोरोना बाधितांची ही सर्वांत मोठी वाढ आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बाधितांमध्ये इमारत भागात राहणाऱ्या रहिवाशांची […]

Continue Reading 0
Stop_the_Spread_JPG

कोरोना प्रसार रोखण्यासाठी पवई, भांडूपमधील सोसायटींवर कडक निर्बंध; स्विमिंग पूल जिम बंद

मुंबईत कोरोना व्हायरसमुळे पुन्हा वाढती बाधितांची संख्या हे चिंतेचे कारण बनले आहे. गेल्या काही दिवसांत महानगरपालिका ‘एस’ प्रभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बरीच वाढली आहे. जे पाहता पालिका एस विभागाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपाययोजना म्हणून प्रभागातर्फे कडक निर्देश देण्यात आले आहेत. गर्दी करणे टाळणे, स्विमिंग पूल, जीम बंद ठेवणे […]

Continue Reading 0
corona-FIR

FIR registered against Powai woman for violating quarantine rules

A case has been registered against a woman living at Lake Home complex in Powai for violating quarantine rules made to prevent the spread of the corona epidemic. The case was registered on Thursday after a complaint was lodged by Dr. Hiraman Mahangade, assistant medical officer of the BMC ‘L’ ward. The apartment floor had been […]

Continue Reading 0
corona-FIR

अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पवईत महिलेविरूद्ध गुन्हा दाखल

कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी असणाऱ्या अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पवईतील लेकहोम येथे राहणाऱ्या एका महिले विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पालिका असिस्टंट मेडिकल ऑफिसर डॉ हिरामण महांगडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने माळा सिल करून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून, वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर […]

Continue Reading 0
covid test IIT powai

पवईतील भाजी विक्रेत्यांची मनपाकडून कोविड चाचणी

कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत असतानाच सर्वांत जास्त संपर्कात असणारे पवईतील भाजीपाला विक्रेते आणि हॉकर्स यांची मनपा ‘एस’ विभागाच्यावतीने बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी कोरोना टेस्ट घेण्यात आली. यावेळी जास्तीतजास्त विक्रेत्यांनी याचा लाभ घेतला. देशभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंमुळे उद्भवणाऱ्या ‘कोविड-१९’शी महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका मोठ्या ताकदीने लढत आहेत. मात्र टाळेबंदी हटल्यानंतर खुले […]

Continue Reading 0
Blood camp rotary milind nagar

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई आणि मिलिंद विद्यालयाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई आणि मिलिंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानातून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ३ वेळेत मिलिंद विद्यालयाच्या प्रांगणात रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले. फिल्टर पाड्यासह पवईतील आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.यावेळी संस्थेतर्फे रक्तदात्यांना किराणा सामानाचे वाटप सुद्धा करण्यात आले. रक्तदान शिबीराची संपूर्ण योजना अत्यंत काळजीपूर्वक आणि सध्याच्या परिस्थितीतील सामाजिक […]

Continue Reading 0
BMC spitting issue

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंड ठोठावणाऱ्या पालिकेच्या कार्यालयातच नागरिकांच्या अंगावर पिचकारी

पालिकेतर्फे स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई अंतर्गत मुंबईत सार्वजनिक ठिकाणी घाण पसरवणाऱ्या आणि थुंकणाऱ्या लोकांवर कारवाई करत दंड ठोठावले जातात. मात्र पालिकेच्या दरवाजातच असे कृत्य घडत असेल तर त्याचे काय? पालिका एस विभागात आपल्या कामानिमित्त येणाऱ्या लोकांसोबत असे प्रकार वारंवार घडत असल्याने सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम कांबळे यांनी या कार्यालयातील खिडक्यांना जाळ्या बसवण्याची मागणी केली आहे. या […]

Continue Reading 0
Four Housing Societies (CHS) felicitated by BMC for good management in fighting COVID1

कोविड-१९ लढाईत सहकार्य करणाऱ्या पवईतील ४ सोसायट्यांचा पालिकेच्यावतीने सन्मान

देशासह राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच या कोरोनाला रोखण्याच्या लढाईत कोरोना योद्ध्यांना आणि यंत्रणांना सहकार्य करणाऱ्या पवईतील ४ सोसायट्यांचा पालिका एस विभागाच्यावतीने सन्मान करण्यात आला. गुरुवार, २३ जुलै रोजी ‘एस’ प्रभागमधील आरोग्य विभागाच्या एका टीमने पवईच्या चार गृहनिर्माण संस्थांचा त्यांच्या इमारतीत कोविड-१९ व्यवस्थापन करण्यासाठी दिलेल्या चांगल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कौतुकपत्र देत सन्मान केला. पवईच्या […]

Continue Reading 0
panchkutir

गणेशनगर ८ दिवस लॉकडाऊन; कोरोना प्रसार रोखण्यासाठी स्थानिकांचा निर्णय

परिसरात वाढणारा कोरोना प्रसार रोखण्यासाठी सामान्यतः पालिकेतर्फे परिसर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील वाढत्या कोरोना बाधितांचा आकडा पाहता येथील स्थानिक नागरिकांनीच आपला परिसर सिल म्हणजेच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार १७ जुलै ते शुक्रवार २४ जुलै या कालावधीत हा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या कालावधीत मेडिकल आणि दूध विक्री […]

Continue Reading 0
Inauguration of Pact Telemedicine and Oxygen Center

पवईत सुरु झाले पॅक्ट टेलिमेडिसीन आणि ऑक्सिजन केंद्र

गौरव शर्मा: ‘आशा मुंबई’ या आशा फॉर एज्युकेशन या वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय चळवळीच्या मुंबई शाखेने सहयोग या पवईतील सामाजिक संघटनेसोबत एकत्र येऊन ‘पॅक्ट’ हे टेलिमेडिसीन व ऑक्सिजन केंद्र पवई येथे सुरू केले आहे. गेली १५ वर्षे आशा मुंबई आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पवईतील चाळसदृश्य वस्त्यांमध्ये शालेय शिक्षण आणि इतर सामाजिक प्रश्नांवर काम करीत […]

Continue Reading 0
Sachin Tendulkar inaugurates COVID-19 Plasma Therapy unit at Seven Hills Hospital

सचिन तेंडुलकरच्या हस्ते सेव्हन हिल रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटन

क्रिकेट आयकॉन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी बुधवारी मरोळ येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ रूग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटन केले. प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्यानेच राज्य सरकारने या थेरपीला परवानगी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)च्या पुढाकाराने प्लाझ्मा थेरपी युनिट कोरोनाव्हायरसच्या लढाईत एक नवीन आघाडी उघडत आहे. “कोविड -१९च्या साथीच्या रूपाने अभूतपूर्व आव्हान उभे […]

Continue Reading 0
corona update 03072020

पवईत दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद

कोरोना बाधितांच्या संख्येने मुंबई महानगरपालिका एस विभागात उच्चांक गाठला असतानाच पवईकरांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी आहे. पालिका एस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई परिसरात ३० जून आणि १ जुलै या दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात ३० जून रोजी एक तर १ जुलै रोजी ३ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूमुळे बाधित होणाऱ्या […]

Continue Reading 0
viththal rakhumai

एस विभागात कोरोना जनजागृतीसाठी साक्षात विठू – रखुमाईंची नागरिकांना साद

अवि हजारे: एस विभागात नागरिकांना कोरोना चे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी पालिकेने केलेल्या अनेक प्रयत्नानंतर सुद्धा नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी साक्षात विठ्ठल- रखुमाई नागरिकांच्या दारोदारी जावून जनजागृती करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनेकमार्गे मार्गदर्शन आणि रोखून देखील लोक घराबाहेर पडत आहेत. कोरोना चा एस विभागात वाढता आकडा लक्षात घेता, लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी […]

Continue Reading 0
vilas mohkar

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एस विभाग प्रयत्नशील

नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला – डॉ. विलास मोहकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( एस विभाग) अवि हजारे: एस विभाग हद्दीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एस विभाग कोरोना बाधितांच्या यादीत ५व्या क्रमांकावर पोहचला आहे. ही वाढती लोकसंख्या विचारात घेता राजकारणी आणि नागरिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, एस विभागाने आपण पूर्णपणे ग्राउंड लेव्हलवर […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!