गुरुवार २८ सप्टेंबर अनंत चतुर्दशी निमित्त मुंबईच्या विविध भागातून विसर्जनासाठी निघणाऱ्या वाहनांच्या सोईसाठी मुंबईतील काही भागात मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पवईतील पवई तलाव विसर्जन घाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश मूर्तींसाठी देखील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेविएलआर) साकीविहार रोड दिवसभर अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणारअसल्याचे साकीनाका वाहतूक विभागाने […]
Archive | News updates
जितेंद्र सोनावणे पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी; अकोला किडनी रॅकेट गुन्हा तपासाचे केले होते नेतृत्व
पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) (Senior Police Inspector) बुधन सावंत ३० ऑगस्टला सेवानिवृत्त (retired) झाले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सिताराम सोनावणे (Sr. PI Jitendra Sonavane) यांनी पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रभर विविध पदांवर काम करणाऱ्या सोनावणे यांनी अकोला किडनी रॅकेट गुन्ह्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते. गुरुवार, १४ सप्टेंबरला त्यांनी पवई […]
पवई कैलासनगर भागात दरड कोसळली
मंगळवारी मुंबईसह उपनगरात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पवई कैलासनगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली. मंगळवार दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने नागरिकांची कसलीही हानी झाली नाही. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यात आल्याने रस्ता बंद झाला होता. शिवसेना माजी नगरसेविका सौ चंद्रावती मोरे यांना कळताच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्ता साफ […]
सोशल मीडियावर सुसाईड नोट टाकलेल्या वकिलाची हिरानंदानीतून सुटका
आत्महत्येची पोस्ट करून गायब असणाऱ्या ३६ वर्षीय वकिलाला मुंबई पोलिसांनी शोधून काढत त्याच्या कुटुंबाला दिलासा दिला आहे. वकिलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तीन तासांच्या आत त्याचा शोध घेण्यात आला. पवई येथील जंगल परिसरात तो बसलेला पोलिसांना मिळून आला आहे. पोलिसांनी सांगितले की, नाशिकचे रहिवासी असलेले वकील ४५ दिवसांपूर्वी घाटकोपर, मुंबई येथे आपल्या […]
कोरोना उद्रेकात लढा देणारा कोरोना योद्धा हरपला; साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश नांगरे यांचे निधन
देशभर थैमान घातलेल्या कोरोना (corona) महामारीच्या काळात हॉटस्पॉट असणाऱ्या मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) कर्तव्य बजावत कोरोना प्रसार नियंत्रण आणण्यासाठी जीवाचे रान करणारे पोलीस अधिकारी रमेश नांगरे (ACP Ramesh Nangare) यांचे हृद्यविकाराने निधन झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग म्हणून पदभार सांभाळला होता. गुरुवारी सकाळी ही बातमी पोलीस खात्यात […]
न्यूज अपडेट: गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण
न्यूज अपडेट: रविवार २४ मे, पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ते पोलीस खात्यात कार्यरत आहेत. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
न्यूज अपडेट: भवानी टॉवरमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
न्यूज अपडेट: शनिवारी आयआयटी पवई समोरील भवानी टॉवरमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
न्यूज अपडेट: शनिवारी पवईत १० बाधितांची नोंद
न्यूज अपडेट: शनिवारी पवईत १० बाधितांची नोंद. आयआयटी पवई समोरील गरिबनगर, चैतन्यनगर, हनुमान रोड, टाटा पॉवर कॉलोनी येथे कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.