चंद्रभान शर्मा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या (सीएससीएससी) विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेत घवघवीत यश संपादन करण्याची सवयच झाली आहे. एचएससी (बारावी) बोर्डाचा २०२० सालचा निकाल सुद्धा याला अपवाद नाही. दीप गांधी या विद्यार्थ्याने ९३.६९% गुण मिळवत महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर साक्षी सिंग या विद्यार्थिनीने ९०.६१% गुण मिळवत महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील ९८.६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर वाणिज्य शाखेतून ९८.६६% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
आपल्या या यशाबद्दल बोलताना दीप म्हणाला, “नियमित ६ तासाच्या अभ्यासामुळेच मी एक चांगली कामगिरी करू शकलो आहे. माझ्या मेहनतीला पाहता मला चांगली गुणसंख्या मिळण्याचा विश्वास होता.” तर साक्षी तिच्या या यशाचे संपूर्ण श्रेय संस्थेतील उत्कृष्ट अध्यापन आणि तिच्या पालकांच्या प्रोत्साहनास देते. ती म्हणाली, “मी कॉलेजनंतर आपले सर्वसामान्य जीवन जगतानाच दिवसातून किमान ५ ते ६ तास अभ्यास करण्याचा नियम बनवला होता. हेच माझ्या यशात कामी आले आहे.”
याबाबत बोलताना प्राचार्या डॉ. प्रतिमा सिंह म्हणाल्या की, “चांगले शिक्षण आयुष्यात नेहमीच कामी येते. शिक्षण आपल्याला आपल्या जीवनात बर्याच मार्गांनी संधी देते. यानुसारच सीएससीमधील व्यवस्थापन आणि शिक्षक दशकाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कठोर परिश्रम करीत आहेत.”
No comments yet.