जाहिरातीसाठी : ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४
पवई तलाव स्वच्छतेची आमदारांकडून पाहणी
पवई तलावाची (Powai Lake) दुर्दशा होत चाललेली असतानाच स्थानिक आमदार (MLA) आणि नगरसेविका (Corporator) यांच्या पाठपुराव्याने पवई तलावाने पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेतर्फे (BMC) पवई तलावातील जलपर्णी (water hyacinth) काढण्याच्या कामाला आमदार दिलीप मामा लांडे (MLA Dilip Mama Lande) यांच्या हस्ते सोमवारपासून सुरुवात झाली असून, आमदार लांडे यांनी आठवड्याभरानंतर आज, २३ जानेवारीला या […]
पवईत ५० हजार मातीच्या दिव्यांनी साकारले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट
शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पवईकर कलाकार चेतन राऊत याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पवई येथील हरिश्चंद्र मैदानावर एक आकर्षक पोर्ट्रेट साकारले आहे. कलाकार चेतन राऊतने ५०,००० मातीच्या दिव्यांचा वापर करून ६ रंगछटाचे दिवे वापरून हे पोर्ट्रेट तयार केले आहे. ४० फूट उंच आणि ३० फूट रुंद असे हे पोर्ट्रेट चेतन याने बनवले […]
पवई पोलिसांनी अर्ध्या तासात शोधला प्रवाशाचा हरवलेला लॅपटॉप
मुंबई पोलीस (Mumbai Police) जगात उच्चस्थानी का आहे याची प्रचीती पवई पोलिसांनी (Powai Police) पुन्हा करून दिली आहे. आपले तपासाचे कौशल्य दाखवत पवई पोलिसांनी केवळ अर्ध्या तासात एका प्रवाशाने नकळतपणे विसरलेली लॅपटॉप बॅग (laptop bag) शोधून काढत त्याला परत मिळवून दिली आहे. पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावणारे हे काम असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल मुंबई पोलीस वरिष्ठ […]
‘अन्नदान सर्वश्रेष्ठ दान’ मुंबई काँग्रेस प्रभाग १२२च्या उपक्रमांतर्गत दिव्यांगाना रेशन किटचे वाटप
मुंबई काँग्रेस प्रभाग क्रमांक १२२च्या ‘अन्नदान सर्वश्रेष्ठ दान’ उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा काळ लक्षात घेऊन सुमारे १०० गरजू दिव्यांगांना रेशन किट वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, पवई अशा अनेक भागातील लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आणि मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या सेवेत सक्रिय सहभाग घेतला. कोविड – १९ महामारीपासून देशाला काही काळ विश्रांती मिळाल्यानंतर […]
लोकांचे हरवलेले ६ लाख किंमतीचे ३४ मोबाईल रिकव्हर करणाऱ्या पवई पोलीस टीमचा पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मान
मुंबईकरांचे पवई पोलिसांच्या (powai police) हद्दीत हरवलेले ३४ महागडे मोबाईल (expensive mobile phones) ज्यांची अंदाजे किंमत ६ लाख रुपये आहे, तांत्रिक तपासाच्या (technical investigation) आधारावर शोधून (recovered) त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून देणाऱ्या पवई पोलिसांच्या पथकाचा मुंबई पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) (Joint Commissioner of police – L & O) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre […]
जेवीएलआरवर पुन्हा अपघात; एकाचा मृत्यू
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेवीएलआर) पवई प्लाझा येथे झालेल्या अपघातात कचऱ्याच्या ट्रकने एका महिलेला चिरडल्याच्या घटनेला २ दिवस झाले नसतील की सोमवार, १७ जानेवारीला याच मार्गावर झालेल्या अजून एक अपघातात ५५ वर्षीय पुरुषाला आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत हलगर्जीपणाने गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल खाजगी बस चालक रामबाबू दास (३६) […]
आयआयटी मुंबईमध्ये २६ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्यावर डिप्रेशनमुळे उपचार सुरू होते. आपल्या वसतिगृहाच्या खोलीतील फलकावर त्याने संदेश लिहला होता की, आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. आयआयटी बॉम्बेच्या २६ वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थ्याने सोमवारी पहाटे ४.३० वाजता पवई कॅम्पसमधील त्याच्या वसतिगृहाच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. दर्शन मालवीय असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, मास्टर्सच्या द्वितीय […]
मुंबई काँग्रेस प्रभाग १२२ तर्फे बेघरांना ब्लँकेट वाटप
मुंबई काँग्रेस प्रभाग १२२ तर्फे त्यांच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि पवई परिसरात राहणाऱ्या बेघर आणि गरजूंना ३०० हून अधिक ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कोविड-१९ महामारी आणि लॉकडाऊनने सर्वसामान्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मुंबईला विशेषत: याचा मोठा धक्का बसला आहे. कारण हे शहर मोठ्या संख्येने रोजंदारी करणाऱ्या मजुरांचे घर आहे. अनेकांनी […]
पवई तलावातील जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात
पर्यटकांचे खास आकर्षण असणाऱ्या पवई तलावाची पाठीमागील काही वर्षात दुर्दशा होत चालली आहे. पवई तलावात सोडले जाणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी दूषित होवून तलावात जलपर्णी निर्माण झाल्या आहेत. तलावाच्या किनाऱ्यावरील सुशोभिकरण दुर्लक्षित झाल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पालिका आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पवई तलावाला हे दिवस भोगावे लागले आहेत. मात्र आता या संकटापासून तलावाला मुक्ती मिळणार असून, […]
जेविएलआरवर कचऱ्याच्या ट्रकने महिलेला चिरडले; एक किरकोळ जखमी
शनिवारी एका कचऱ्याच्या ट्रकने जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला चिरडल्याची दुर्दैवी घटना पवईमध्ये घडली. महिला आपल्या मुलासोबत मोटारसायकलवरून प्रवास करत होती. या घटनेत महिलेचा मुलगा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवई पोलिसांनी ट्रक चालक अलाउद्दीन सालौद्दिन शेख (२२) याला अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी […]
बुधन सावंत यांनी स्वीकारला पवई पोलीस ठाण्याच्या वपोनि पदाचा पदभार
पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) आबुराव सोनावणे यांची पदोन्नती झाल्यानंतर गेल्या महिनाभर रिक्त पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बुधन सावंत (SPI Budhan Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी त्यांनी आपला हा पदभार स्वीकारला. यापूर्वी साकीनाका पोलीस ठाणे (Sakinaka Police Station) येथे कार्यरत असल्याने परिसराची […]
रोटरी क्लब निर्मित पवई पोलीस ठाणे ऑफिसर रूमचे उदघाटन
पवई पोलीस ठाणेतील ऑफिसर रूमचे उदघाटन गुरुवारी रोटरी क्लबचे डिस्ट्रिकट गव्हर्नर राजेंद्र अग्रवाल आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) महेश्वर रेड्डी (DCP Maheshwar Reddy) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी रोटरी क्लब प्रेसिडेंट अमित सेठ, प्रोजेक्ट डायरेक्टर हनुमान त्रिपाठी, नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत (SPI Budhan Sawant), सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी उपस्थित होते. मुंबई पोलीस (Mumbai […]
ज्येष्ठ पत्रकार दिलीप हजारे यांचे निधन
@रविराज शिंदे झोपडपट्टीवासियांचे ज्वलंत प्रश्न सातत्त्याने आपल्या लेखणीतून मांडणारे ज्येष्ठ पत्रकार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी मुंबई मुख्य संघटक तसेच पवई महात्मा ज्योतिबा फुलेनगरचे संस्थापक दिलीप हजारे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने वयाच्या ५९व्या वर्षी निधन झाले आहे. जे जे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. […]
मी कुणासाठीही थांबत नाही
@ परिस ( प्रसाद वाघ ) समुद्राच्या किनाऱ्यावरुन तो धावत सुटला होता. मी त्याला मागून कितीतरी हाका मारल्या. वाळूत रुतलेल्या त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत मी रेंगाळत होतो. पठ्ठ्या काही थांबायचे नाव घेईना. शेवटी मी त्याच्या पावलांवर पाऊल टेकवायचा खुळा नाद सोडून दिला. थोडीशी गती वाढवली आणि त्याच्या शेजारी येवून पळायला लागलो. हाय ! _ हाय […]
पवई तलावाजवळ कारला आग
पवई तलाव मुख्य गणेशघाटाजवळ एका कारला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, घटनेत गाडीचे जळून मोठे नुकसान झाले आहे. टूअर्स अंड ट्राव्हल कंपनीसाठी काम करणारे राजेंद्रकुमार मेहतो हे नेहमी प्रमाणे आपल्या वेगेनॉर गाडीतून (क्रमांक एमएच ०४ जिडी ५१६७) प्रवासी घेवून जेवीएलआर मार्गे कांजूरच्या दिशेने जात होते. […]
चीनमधील कंपनीचे बनावट ईमेल खाते तयार करून व्यावसायिकाची ३.३ लाख रुपयांची फसवणूक
पवईस्थित एका ५५ वर्षीय व्यावसायिकाची चीनस्थित कंपनीकडून व्यवसायासाठी सुटे भाग मागवण्याच्या बहाण्याने ३.३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदाराने खात्यात पैसे पाठवल्यानंतरही जेव्हा त्याला शिपमेंट प्राप्त झाले नाही तेव्हा त्याने कंपनी आणि बँकेकडे तपासणी केली असता त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात फसवणूक आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला […]
कोविडच्या नावाखाली विद्यार्थ्याची ४५,००० रुपयांची फसवणूक
मुंबईतील पवईमध्ये रहावयास असणाऱ्या एका विद्यार्थ्याला सायबर चोरट्यांनी ४५,००० रुपयाला गंडवले आहे. सायबर चोरट्याने दिल्लीहून त्याचा मेहुणा बोलत असल्याचा दावा करत तक्रारदार यांना फसवले आहे. तक्रारदार राहुल अग्रवाल (२२) यांनी आपल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, फोन करणार्याचा आवाज त्यांच्या मेहुण्यासारखा नसल्यामुळे संशय आला होता, परंतु कॉलरने दावा केला की, त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असून, […]
युथ पॉवर दिनदर्शिकेचे नाका कामगारांच्या हस्ते प्रकाशन
नवतरूणांची संघटना म्हणून कार्यरत असणाऱ्या युथ पॉवर संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पवईत संपन्न झाले. दैनंदिन काम करून घरातील उदरनिर्वाह चालवणाऱ्या कष्टकरी नाकाकामगार बांधव यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. नागरिकांच्या पॉकेटमध्ये बसेल अशी ही मिनी दिनदर्शिका असून, महापुरूषांचे कार्य तसेच इतर माहीती, तारीख वेळेनुसार या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. पवईतील चैतन्यनगर परिसरात असलेल्या कामगारांच्या […]
१०० कोटीचे लोन करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक
व्यवसायासाठी १०० कोटीचे लोन करून देतो असा बहाणा करून एका व्यावसायिकाला २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिलीप सिंग (४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचे इतर दोन साथीदारांचा शोध सुरु आहे. अटक आरोपीकडून पोलिसांनी फसवणूक केलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे. फिर्यादी प्रणव जानी यांचा विलेपार्ले येथे गारमेंटचा […]
खंडणीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराला अटक
मिलिंदनगर येथे एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत धमकावून त्याच्या घरांपैकी एक घर किंवा २ लाख रुपये खंडणी मागितल्याबद्दल गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगार अमीन मोमीन खान (३८) याला बेड्या ठोकल्या आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक कांबळे हे मिलिंदनगर येथे राहतात. २७ नोव्हेंबर रोजी ते आपल्या परिसरात असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास अमीन खान […]