जाहिरातीसाठी : ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४

accident

आयआयटी पवई येथे मोटारसायकल चालकाला उडवले; डॉक्टरला अटक

रविवारी सकाळी आयआयटी-पवई सिग्नलजवळ एका मोटारसायकल चालकाला धडक देत हयगयने गाडी चालवत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका २४ वर्षीय डॉक्टरला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धार्थ सत्येंद्र चौधरी असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील रहिवासी असणारे सचिन पुतळाजी भोसले (२९) हे या अपघातात मृत पावले आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी […]

Continue Reading 0
babar_sudhakar_ration_distribution

पवईकराने उचलला ग्रामीण भागातील ५०० कुटुंबाच्या रेशनचा खर्च

आपली गावे, खेडी सोडून अनेक कुटुंबाना पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. मात्र इथे आल्यावर आपल्या गावाला विसरून चालत नाही. कोरोनामुळे अशी अनेक गावे आणि तेथील कुटुंबे आर्थिक अडचणीत आली आहेत. अशाच एका गावचे सुपुत्र पवईकर सुधाकर बाबर यांनी ही परिस्थिती लक्षात घेत गावातील सर्व रेशनधारकांचा खर्च स्वतः उचलत त्यांना आधार दिला आहे. याबद्दल […]

Continue Reading 0
sachin kuchekar

प्रामाणिक पवईकराने परत केली रस्त्यात सापडलेली महिलेची बॅग

लॉकडाऊनमुळे अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक आवक कमी झाली आहे. अशात हाती आलेली संधी गमावण्याचा कोण विचार करेल? मात्र प्रामाणिक माणूस नेहमीच प्रामाणिक असतो याचेच उदाहरण सोमवारी पवईकराच्या रुपात पाहायला मिळाले. सचिन कुचेकर यांना प्रवासा दरम्यान रस्त्यात मिळालेली महिलेची बॅग त्यांनी मालक महिलेला परत करत आपली माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे एक उदाहरण समोर ठेवले आहे. […]

Continue Reading 0
Sachin Tendulkar inaugurates COVID-19 Plasma Therapy unit at Seven Hills Hospital

सचिन तेंडुलकरच्या हस्ते सेव्हन हिल रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटन

क्रिकेट आयकॉन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी बुधवारी मरोळ येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ रूग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटन केले. प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्यानेच राज्य सरकारने या थेरपीला परवानगी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)च्या पुढाकाराने प्लाझ्मा थेरपी युनिट कोरोनाव्हायरसच्या लढाईत एक नवीन आघाडी उघडत आहे. “कोविड -१९च्या साथीच्या रूपाने अभूतपूर्व आव्हान उभे […]

Continue Reading 0
online cheating

हिरानंदानीतील पेन्शनधारक फिशिंगचे बळी; गमावले दोन लाख

अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे. तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक […]

Continue Reading 0
bharat harale and team

राजगृहावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा, पवई पोलिसांना अनुयायांचे निवेदन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान राजगृहावर मंगळवारी दोन अज्ञात इसमांनी हल्ला करत तोडफोड केली. यानंतर त्यांच्या अनुयायांकडून मोठा राग व्यक्त केला जात आहे. मात्र आंबेडकर परिवाराने अनुयायांना शांत राहण्याची विनंती केल्यानंतर पवई परिसरातील अनुयायांतर्फे आरोपींना त्वरित अटक करून, आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि राजगृह तसेच आंबेडकर परिवाराला सक्षम सुरक्षा प्रदान करण्याची […]

Continue Reading 0
JVLR khadde

जेविएलआरवर सर्विस रोडला खड्डे

सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जेविएलआरवर (आदि शंकराचार्य मार्ग) नुकतेच दुरुस्तीचे काम केलेल्या सर्विस रोडला पुन्हा खड्डे पडले आहेत. ट्रिनीटी चर्च ते गांधीनगर उड्डाण पूल भागात हे खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिक जॉली मोरे यांनी यासंदर्भात पालिकेला तक्रार केली होती. जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. या मार्गावरून […]

Continue Reading 0
चितळांचा मुक्त बागड

पवईत चितळांचा मुक्त बागड

सुषमा चव्हाण | पवई तलावावर नेहमीच मगरींचे दर्शन घडत असते, मात्र या लॉकडाऊनच्या निरव शांततेत पवईकरांना बिबट्याचे देखील दर्शन अनेक वेळा घडलेले आहे. त्यापाठोपाठच आता पवईत चितळांचाही मुक्त बागड दिसून आला आहे. साईबंगोडा येथील विहार तलावाजवळील बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात चितळांचा मुक्त बागड पहायला मिळाला. तेथील स्थानिक पवईकर दिपक निकुळे यांनी हा नयनरम्य क्षण आपल्या […]

Continue Reading 0
WhatsApp Image 2020-07-03 at 4.55.40 PM

विज बिल माफ करण्याकरता सी.आय.टी.यूच्यावतीने पवई विभागात आंदोलन

लाॅकडाऊनच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात येणारे विज बिल माफ करण्याकरता तसेच केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दरमहा दहा हजार रुपये प्रति व्यक्ती खात्यात जमा करण्यासाठी सी.आय.टी.यूच्यावतीने पवई विभागातील चैतन्यनगर भागात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.

Continue Reading 0
Vishwa Hindu Parishad and Rohit Rai Mitra Mandal solved the poor people’s food problem

विश्व हिंदू परिषद दुर्गेश्वर प्रखंड कुर्ला आणि रोहित राय मित्र मंडळाच्यावतीने सुटला लोकांच्या जेवणाचा प्रश्न

@आकाश शेलार कोरोना वैश्विक महामारीमध्ये अनेक गरीब गरजूंना हाताला काम नाही त्यामुळे त्यांच्यासमोर परिवाराच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला असताना विश्व हिंदू परिषद दुर्गेश्वर प्रखंड कुर्ला आणि रोहित राय मित्र मंडळाच्यावतीने या प्रश्नाला उत्तर शोधण्यात आले आहे. यांच्यावतीने परिसरातील लोकांना ९२ दिवस मोफत अन्नदान करण्यात आले. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असताना हातावर पोट […]

Continue Reading 0
corona update 03072020

पवईत दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद

कोरोना बाधितांच्या संख्येने मुंबई महानगरपालिका एस विभागात उच्चांक गाठला असतानाच पवईकरांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी आहे. पालिका एस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई परिसरात ३० जून आणि १ जुलै या दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात ३० जून रोजी एक तर १ जुलै रोजी ३ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूमुळे बाधित होणाऱ्या […]

Continue Reading 0

मेडिकल स्टोअर मालकाची ऑनलाईन फसवणूक

पवई येथील मेडिकल आणि जनरल स्टोअरच्या मालकाची ₹ २०,०००ची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी आपली ओळख सैन्य अधिकारी म्हणून करून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात नागरिकांना आवश्यकता असणाऱ्या मेडिकल किटची गरज लक्षात घेता, आरोपीने हँड सॅनिटायझर, मास्क आणि हँड ग्लोव्हज ऑर्डर करून त्याचे पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड पाठवत मेडिकल मालकाची ऑनलाईन […]

Continue Reading 0
mangesh borgavkar

प्रेम आणि आठवणींमध्ये चिंब करायला “बरसात आली”

पाऊस म्हंटलं की आठवतात चहा-भजी आणि पावसाची गाणी. आणि महाराष्ट्राचा लाडका गायक मंगेश बोरगावकरचा आवाज म्हणजे सोन्याहून पिवळे. पावसाच्या सुरुवातीलाच आकार मल्टीमिडीयान प्रेक्षकांसाठी मंगेश आणि मृन्मयीच्या आवाजात सुंदर सुरांची मेजवानी घेवून आली आहे. गाण्याचे नाव आहे बरसात आली. बरसात प्रेमाची असते तशी आठवणींचीही असते. मंगेशने गायलेल्या या गाण्यातून प्रेक्षकांच्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. माथेरान भागात […]

Continue Reading 0
dr adsul with Dr Kumbhar and Team

‘हॅप्पी डॉक्टर्स डे’ – डॉ. बाळकृष्ण अडसूळ, सेव्हनहिल्स इस्पितळाचे अधिष्ठाता यांची कोविड सोबतची लढाई

@प्रमोद सावंत : या वर्षीचा ‘ डॉक्टर्स डे ’ सर्वार्थाने संस्मरणीय आहे. जगभर कोविड-१९चं संकट गहिरं होत असताना डॉक्टर्स हे थेट कोरोनाशी सेनापती सारखे लढत आहेत. इतर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार हे या डॉक्टरांना तेवढीच तोलामोलाची साथ देत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण म्हटल्यावर लोक त्या रुग्णाला, त्याच्या कुटुंबियांना जवळपास वाळीतच टाकत आहेत. माणुसकी आपण विसरत […]

Continue Reading 0
FIRE IN HIRANANDANI DELPHI

हिरानंदानीतील डेल्फी इमारतीत ५व्या मजल्यावर भीषण आग

पवईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या हिरानंदानी गार्डन्स येथील डेल्फी इमारतीच्या ५व्या मजल्यावर आग लागल्याची घटना आज, बुधवार १ जुलै रोजी सकाळी घडली. एसीच्या डक्टमध्ये शोर्ट-सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. पवईतील हिरानंदानी परिसरातील डेल्फी इमारतीमध्ये ५व्या मजल्यावरून आगीचे लोळ आणि धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनात आले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही […]

Continue Reading 0
Two Yemeni nationals have been arrested here for allegedly cheating

फसवणूकीच्या गुन्ह्यात २ येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी पुण्यातून केली अटक

मुंबईत उपचार घेत असलेल्या येमेन देशातील सहा सैनिकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन येमेन नागरिकांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पुणे येथे लपून बसलेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या आहे. फहद रदवान अल मस्तारी (३३) आणि अली अब्दुलघानी अली अल गौझी (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. येमेनमधील सुरू असलेल्या गृहयुद्धात जखमी झालेले […]

Continue Reading 0
DCP Thakur Vishal copy

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई; परिमंडळ १० मध्ये १७५८ गाड्या जप्त

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलीस आता पुढे सरसावली असून, विनाकारण घराबाहेर पडून नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. मुंबई पोलिसांतर्फे केल्या गेलेल्या कारवाईत परिमंडळ १० च्या हद्दीत येणाऱ्या पवई, साकीनाका, एमआयडीसी, अंधेरी आणि मेघवाडी पोलीस ठाणे परिसरात दोन दिवसात १७५८ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई परिसरात या परिमंडळात सर्वाधिक […]

Continue Reading 0
viththal rakhumai

एस विभागात कोरोना जनजागृतीसाठी साक्षात विठू – रखुमाईंची नागरिकांना साद

अवि हजारे: एस विभागात नागरिकांना कोरोना चे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी पालिकेने केलेल्या अनेक प्रयत्नानंतर सुद्धा नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी साक्षात विठ्ठल- रखुमाई नागरिकांच्या दारोदारी जावून जनजागृती करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनेकमार्गे मार्गदर्शन आणि रोखून देखील लोक घराबाहेर पडत आहेत. कोरोना चा एस विभागात वाढता आकडा लक्षात घेता, लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी […]

Continue Reading 0
vilas mohkar

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एस विभाग प्रयत्नशील

नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला – डॉ. विलास मोहकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( एस विभाग) अवि हजारे: एस विभाग हद्दीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एस विभाग कोरोना बाधितांच्या यादीत ५व्या क्रमांकावर पोहचला आहे. ही वाढती लोकसंख्या विचारात घेता राजकारणी आणि नागरिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, एस विभागाने आपण पूर्णपणे ग्राउंड लेव्हलवर […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!