पवई, आयआयटी मुंबई कॅम्पस परिसरात मगरीचा मुक्तसंचार

आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅंपस परिसरात मगर मुक्तसंचार करताना आढळून आली आहे. रविवार, २३ मार्चला रात्री ६ फुटाच्या जवळपास लांबीची मगर येथील रहिवाशांना आढळून आली आहे. मगर रस्त्यावर आल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

बोरीवली राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्याने आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बिबट्याचे दर्शन घडणे हे आता सामान्य मानले जाते. यासोबतच पवई तलावाला लागूनच हा कॅम्पस भाग असल्याने पाठीमागील काही वर्षात कॅम्पस परिसरातील रस्त्यांवर आता मगरींचे येणे देखील घडू लागले आहे.

अशीच एक घटना रविवारी आयआयटी मुंबईच्या कॅम्पस परिसरात समोर आली आहे. येथील लेक साईट परिसरात असणाऱ्या पद्मावती मंदिर परिसरात एक मगर रस्त्यावर आल्याचे येथील रहिवाशांना आढळून आले. भलीमोठी मगर रस्त्यावर निवांत पडलेली आढळून आल्यावर रहिवाशांनी सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती दिली.

मगर रस्त्यावर आल्याची माहिती मिळताच येथे राहणाऱ्या अनेक रहिवाशांनी तिला पाहण्यासाठी या परिसरात धाव घेतली. यापूर्वी पंधरा वीस दिवसांपूर्वी देखील या परिसरात मगरीचे दर्शन घडले असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “मगरींचा मुक्तसंचार संपला की, आपोआप त्या पुन्हा तलावात निघून जातात.

“या कॅम्पस परिसराला लागून असणाऱ्या पवई तलाव भागात अनेक मगरींचे वास्तव्य आहे. तलावातील छोट्या टेकड्यांवर मगरींचे अधूनमधून दर्शन घडते. रात्रीच्या वेळी शांततेत मगरी आसपासच्या परिसरात बाहेर पडणे सामान्य आहे,” असे यासंदर्भात बोलताना प्राणीमित्रानी सांगितले.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!