सोशल मीडियामध्ये वेश्याव्यवसायाची जाहिरात करून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवले जात होते.
एका नामांकीत हॉटेलमधील कॅशियरसोबत हातमिळवणी करून सोशल मिडिया, वेबसाईट जाहिरातींच्या माध्यमातून पवईत चालणार्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखा कक्ष सातने पर्दाफाश केला आहे. रविवारी हॉटेल रिलॅक्स इन रेसीडेन्सी हॉटेलमध्ये छापा मारत, संबंधित सेक्स रॅकेटमधील पीडित ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये हॉटेलच्या कॅशिअरला पोलिसांनी अटक केली आहे, तर आरोपी एजंट पसार आहे.
सोशल मिडीया, वेबसाईट आणि जाहिरातींच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष सातला खास खबऱ्याकडून मिळाली होती. जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरची माहिती काढत गुन्हे शाखेने या टोळीवर नजर ठेवली होती.
“बनावट ग्राहक तयार करून गुन्हे शाखेने एजंटच्या मोबाईलवर संपर्क साधून महिला आणि त्यांना द्यावयाच्या पैशांबाबत ठराव केला. यावेळी एजंटने पवईतील हॉटेल रिलॅक्स इन रेसीडेन्सी येथे महिला पाठवण्यात येतील असे त्याला सांगितले होते”, असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
ठरावानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलजवळ सापळा रचून ग्राहकाला आत पाठवले असता, हॉटेलच्या कॅशिअरने त्याला एका रुममध्ये जाण्यास सांगितले. हॉटेल रुममध्ये तीन महिला पोहचताच गुन्हे शाखेने छापा टाकून तिन्ही महिलांची सुटका करत हॉटेलच्या कॅशियरला ताब्यात घेतले.
हॉटेलचा कॅशियर मनोज पुजारीच्या मदतीने एंजट हा वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. मिळालेल्या पैशांतील ७० टक्के रक्कम कॅशिअर स्वत:कडे ठेऊन उरलेली ३० टक्के रक्कम या महिलांना देत असल्याचेही पोलीस चौकशीत समोर आले आहे.
याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपीना पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
No comments yet.