ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी हिरानंदानी रुग्णालयातर्फे ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस वॉक’चे आयोजन

कोविड कालावधीत (जवळपास २ वर्षांपासून) निदान न झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनाचा कर्करोग) प्रगत अवस्था असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

कोविड महामारीच्या निर्बंधांमुळे आणि भीतीमुळे अनेक अत्यावश्यक आरोग्य उपचार आणि शस्त्रक्रियांना सुमारे १ ते २ वर्षांचा विलंब झाला आहे. ब्रेस्ट कॅन्सरही त्याला अपवाद नाही. काही स्त्रियांना कोविडच्या काळात लहान गाठीसारखी ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची काही लक्षणे जाणवली, मात्र त्यांना प्रथमतः रुग्णालयांमध्ये निदान सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांची चाचणी / निदान झाले नाही. कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या भीतीने अनेकांनी रुग्णालयात जाण्यापासून आणि चाचण्या आणि उपचार घेण्यापासून दूर ठेवले. यामुळेच पाठीमागील २ वर्षात ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रगत अवस्थेत असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

ब्रेस्ट कॅन्सरसारख्या या भयंकर आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी पवई येथील डॉ. एल एच हिरानंदानी हॉस्पिटलने रविवारी ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस वॉक’चे आयोजन केले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला आणि याबाबत शिक्षण घेतले. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कोविड निर्बंधानंतर आयोजित करण्यात आलेल्या वॉकला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

हिरानंदानी समूहाचे सह-संस्थापक डॉ निरंजन हिरानंदानी आणि डॉ सुजित चॅटर्जी (सीईओ डॉ. एल एच हिरानंदानी हॉस्पिटल) हे देखील या वॉकमध्ये सहभागी झाले होते.

हे ज्ञात सत्य आहे की भारतातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य आहे. पण, त्याहूनही अधिक म्हणजे, महिलांमध्ये ‘लाइफ टाईम रिस्क’च्या प्रमाणातील मृत्यूदरातील बदल हे चिंताजनक आहेत. पूर्वीच्या २६ मधील एक ते आता २२ मधील एक. या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की तरुण स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.

ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस वॉकनंतर हिरानंदानी हॉस्पिटलमधील ब्रेस्ट ऑन्को-सर्जन डॉ. नमिता पांडे यांनी सहभागी लोकांना संबोधित करत याबाबत महिलांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. कोणती चिन्हे पहावीत, उपचार केव्हा घ्यावेत, काळजी कशी घ्यावी आणि उपचार कसे करावेत. ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारातील पध्दती झालेली प्रगती यावर त्यांनी लोकांशी संवाद साधला.

“अशाप्रकारे, जितकी जागरूकता जास्त, तितकी प्रकरणे कमी! हाच या ‘वॉक’द्वारे प्रचार करण्याच्या आमचा प्रयत्न आहे.” असे यावेळी बोलताना डॉ चटर्जी म्हणाले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!