सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत इंजिनिअरिंग एंड टेक्नोलॉजी विभागात पवईतील आयआयटी मुंबई ने ‘टॉप ५०’मध्ये स्थान पटकावले आहे. याच क्रमवारीत आयआयटी मुंबई ने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग नुकतीच घोषित करण्यात आली आहे. यात इंजिनिअरिंग एंड टेक्नोलॉजी वर्गात पवई येथे असणाऱ्या आयआयटी मुंबईने जगात ४४वा क्रमांक पटकावला आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस इन्स्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजीने प्रथम तर स्टॅनफोर्ड विद्यापीठाने या क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. इंग्लंडचे केंब्रिज विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या क्रमवारीत जगातील १५९ शहरांमधील १३६८ विद्यापीठांचा विविध ४८ वर्गांमध्ये समावेश आहे. ज्यात भारतातून १६५, अमेरिकेतून ४४१, चीन,जपान आणि दक्षिण कोरियामधील ३६० तर इंग्लंड, जर्मनी आणि फ्रांसमधील ५०२ शिक्षणसंस्थाचा समावेश होता.
No comments yet.