गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. याच दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी आपल्या आवडत्या स्वरसम्राज्ञीला श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवारी पवई वॉर्ड क्रमांक १२५ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने लता दीदींना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पवईतील दीदींचा चाहतावर्ग उपस्थित होता.
“लता दीदींना कोणीच विसरु शकत नाही. त्यांची स्मृती गीतातून अजरामर राहील” असे मनसे उपशाखा अध्यक्ष राहुल कदम यांनी सांगितले.
यावेळी उपविभाग प्रमुख शैलेश वानखेडे, शाखा अध्यक्ष अरुण बालन, महिला शाखा अध्यक्ष सुजाता चव्हाण, उप शाखा अध्यक्ष राहुल अप्पा कदम, चेतन शिंपी, विठ्ठल वाघमारे, प्रविण गायकवाड, आशुतोष गायकवाड, प्रविण नाडार आदि उपस्थित होते.
No comments yet.