पवईत पावसाने दाणादाण

झाडे पडली, कंटेनर घसरून अडकून पडल्याने वाहतूक कोंडी, इमारतीत पाणी घुसले, नाले भरून वाहू लागले

@प्रमोद चव्हाण

मुंबईत शुक्रवारी रात्री पासूनच पावसाचे जोरदार आगमन झाले. शनिवार दिवसभर थोड्या थोड्या कालावधीत बरसत राहिल्याने मुंबापुरी तुंबल्याची चित्रे पहायला मिळत होती. पवई सुद्धा यातून वाचली नाही. पावसाच्या पहिल्या तडाख्यात पवईत अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. कंटेनर घसरून वाहतूक कोंडी निर्माण झाली. आयआयटी भागात काही इमारतीत पाणी घुसले, तर काही सांडपाणी वाहून नेणारे नाले भरून वाहू लागले.

कंटेनर घसरून वाहतूक कोंडी

शनिवारी सकाळी ९ वाजता गांधीनगर फ्लायओव्हरजवळ विक्रोळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पावसामुळे निर्माण झालेल्या स्लीपरी रोडवरून उताराला गाडीचा ताबा सुटल्यामुळे,झालेल्या स्लीपरी रोडमुळे पोस्टल डिपार्टमेंटचा कंटेनर घसरून दुभाजकाला धडकून अडकून पडला होता. सकाळी ऑफिसच्या वेळेस हा अपघात घडल्यामुळे दुपारी कंटेनर हटवेपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

झाड पडून गाड्यांचे नुकसान

आयआयटी पवई येथील पद्मावती रोडवर, पद्मालय मेटरनिटी होमजवळ एक भले मोठे झाड येथे उभ्या असणाऱ्या रिक्षा आणि मोटारसायकलवर पडल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र एक रिक्षा आणि दोन मोटारसायकलचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

गटाराचे ढाकण उचकटून वाहू लागले प्राणी

चांदिवली फार्म रोडवर असणाऱ्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीची सफाई व्यवस्थित झाली नसल्यामुळे लेकहोम शॉपिंग कॉम्प्लेक्स भागात गटारावर असणाऱ्या झाकणाला उकलवून पाण्याने आपली वाट मोकळी केली होती. यामुळे पाऊस आणि वाहून येणारे पाणी मिळून सखल भागात तलाव निर्माण झाला होता. त्यातून घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य परिसरात पसरले होते. येथील स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनुसार प्रत्येक पावसाळ्यात येथे हिच अवस्था असते,सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी आजतागायत कधीच साफ केली गेली नाही.

इमारतीत पाणी घुसले

आयआयटी येथील हरेकृष्ण रोड येथील काही इमारतीत पाणी घुसले होते. माता रमाबाई नगर येथील काही घरात पाणी घुसले. चैतन्यनगर आणि भाजी मार्केट भागात नदी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यामुळे घरात अडकलेल्या लोकांना बाहेर निघणे आणि बाहेरील लोकांना घरात जाणे अवघड झाले होते. इमारतीच्या सुरक्षा भिंतीना छेदून पाणी गटारात सोडल्यानंतर अखेर यातून रहिवाशांना दिलासा मिळाला.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!