पवईत शाळेशेजारील पानटपऱ्या, बेकायदेशीर फेरीवाल्यांवर पालिका, पोलिसांकडून कारवाई

शाळा महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात असणारे बेकायदेशीर फेरीवाले आणि पानटपरीवर पवई पोलीस ठाणे तसेच महानगरपालिका यांच्याकडून मंगळवारी, २४ डिसेंबरला तडकाफडकी कारवाई करण्यात आली.

शाळा महाविद्यालय परिसर पवईत गेल्या कित्येक वर्षापासून बेकायदेशीर फेरीवाले तसेच पानटपरींचे साम्राज्य राजरोसपणे वाढत चालले होते. हे व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार पालिका आणि पवई पोलीस यांच्याकडे करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पालिका सहाय्यक आयुक्त एस विभाग तसेच पवई पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनी) जितेंद्र सोनवणे यांनी तत्काळ ॲक्शन मोडवर येत कारवाईचा बडगा उचलला.

पवईतील तुंगा गाव, शिवशक्ती नगर, सोलारीस तसेच चैतन्यनगर आणि हिरानंदानी परिसरातील शाळा महाविद्यालय परिसरातील अवैद्य पान टपरी तसेच बेकायदेशीर फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली.

“पवई परिसरात नशाखोरी रोखण्यासाठी पाऊले उचलली जात असताना शाळा, महाविद्यालये परिसरात मुलांना नशेचे सामान उपलब्ध होत असल्याची माहिती समोर आली होती. या व्यसनांच्या आहारी शाळकरी मुले जात आहेत. तसेच शाळेच्या जवळ फेरीवाले आणि राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास शासनाने मनाई आदेश लागू केलेले असताना देखील पानटपऱ्या बनवण्यात आलेल्या असल्याने आम्ही पालिकेच्या मदतीने त्वरित कारवाई केली”, असे पवई पोलिसांनी सांगितले.

पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या कारवाईनंतर येथील परिसर आत्ता मोकळा श्वास घेत असल्याने नागरिकांनी पालिका तसेच पवई पोलिसांचे आभार मानले.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!