प्रातिनिधिक छायाचित्र

चांदिवलीत लवकरच उभे राहणार भव्य प्रसूतिगृह, पालिका दवाखाना

प्रातिनिधिक छायाचित्र @सुषमा चव्हाण स्थानिक नगरसेविका चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या प्रयत्नातून लवकरच चांदिवलीत सुसज्ज असे प्रसूतिगृह आणि दवाखाना पालिकेच्या माध्यमातून उभे राहणार आहे. हे प्रसूतिगृह चांदिवली म्हाडा परिसरातील आरक्षित भूखंडावर उभे राहणार असून, यासाठी १० कोटी ७१ लाख रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. सदर कामाचा शुभारंभ फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे. पुढील अडीच वर्षात […]

Continue Reading 0
BEST Gutter

हिरानंदानी बेस्ट बस डेपोजवळच्या गटारात पडून पवईकर जखमी

@अरित्रा बॅनर्जी एका दुर्दैवी घटनेत पवईकर चायना व्हॅली रेस्टॉरंटजवळ असलेल्या हिरानंदानी बेस्ट बस आगाराच्या अगदी बाहेर असणाऱ्या गटारात पडून जखमी झाला आहे. रहिवाशी फुटपाथवर चालत असताना गटाराचे झाकण तुटल्याने त्याच्या जागी टाकण्यात आलेल्या जुन्या प्लायवूडच्या तुकड्यावर पाय ठेवल्याने तो तुकडा तुटून ही दुर्घटना घडली. या संदर्भात आवर्तन पवईशी या घटनेविषयी बोलताना त्यांनी सांगितले कि, “मी […]

Continue Reading 0
transplant-deceased-building with decease

केस प्रत्यारोपण: डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच मृत्यू; जेजे रुग्णालयाच्या पॅनेलचा अहवाल

केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रक्रियेनंतर चांदिवली येथील ४३ वर्षीय व्यावसायिक श्रवण कुमार चौधरी यांचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी याबाबत चौकशीची मागणी केल्याच्या नऊ महिन्यांनतर अनेक पातळीवर निष्काळजीपणा आढळून आल्याचे राज्यस्तरीय जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणात नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला असून, डॉक्टरला अध्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक […]

Continue Reading 0
lande1

मराठीच हवी ! आमदार लांडेनी इंग्रजी कागदपत्रे फाडून अधिकाऱ्यांकडे भिरकावली

चेंबूर पालिका प्रभाग अधिकाऱ्यांनी इंग्रजी कागदपत्रे सादर केल्याने चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे पाटील संतापले. त्यांनी ती कागदपत्रे फाडून अधिकाऱ्यांकडे भिरकावली. “शासन निर्णय असताना देखील अधिकारी इंग्रजीतच कामकाज करतात. मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पुन्हा जर असे घडले तर अधिकाऱ्यांना कडक उत्तर देऊ.” – आमदार दिलीप मामा लांडे इंग्रजीत सगळा कारभार करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना […]

Continue Reading 0
medha patkar

तंत्रज्ञानाच्या नावाखाली सामान्याच्या हातातील काम हिसकावतेय – मेधा पाटकर

‘तंत्रज्ञानामुळे अनेक मानवी हातातील कामे मशिन्सकडे आल्यामुळे तंत्रद्यानाच्या नावाखाली सामान्यांच्या हातातील काम हिसकावले जात आहे, याकडे कोणाचेही लक्ष नाही.” असे मत समाजसेविका मेधा पाटकर यांनी नुकतेच व्यक्त केले. पवई येथील आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये त्या बोलत होत्या. या चर्चासत्रासाठी पाटकर यांच्यासोबत आरटीआय कार्यकर्ते शैलेश गांधी सुद्धा उपस्थित होते. ३ ते ५ जानेवारी […]

Continue Reading 0
parasailing

पॅरासेलिंगसाठी गेलेल्या साकीनाका येथील युवकाचा मृत्यू

साकीनाका येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या युवकाचा मालवण किनाऱ्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी पॅरासेलिंग करताना हा अपघात घडला. अझर अन्सारी असं या युवकाचं नाव आहे. तो आणि त्याची पत्नी दोघेही १६ जणांच्या एका गटासोबत पॅरासेलिंग करण्यासाठी गेले होते. साकीनाका येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या युवकाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्यावर अपघाती मृत्यू झाला आहे. […]

Continue Reading 0
online dating

ऑनलाईन डेटिंग फसवणूकीत चार्टर्ड अकाऊटंटला ३.३ लाखाचा गंडा; एकाला अटक

पवई पोलिसांनी पवई येथील ५४ वर्षीय चार्टर्ड अकाऊटंटला साथीदार मिळवून देण्याच्या बहाण्याखा ली ३.३ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाला वेस्ट बेंगाल येथून अटक केली आहे. अर्णब सिंग उर्फ नील रॉय बनमाळी (वय २६) हा कोलकाता येथील हावडा येथील रहिवाशी असून, त्याला शनिवारी अटक करण्यात आली. पवई पोलिस त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. दोनदा […]

Continue Reading 0
hidden camera pic

तरुणीचे कपडे बदलताना चित्रीकरण करणाऱ्या नोकराला अटक

आपल्या सहकारी तरुणीचे कपडे बदलाताना चोरुन मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पवईत समोर आला आहे. याबाबत तरुणीच्या लक्षात येताच तिने पवई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पवई पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीच्या आधारावर चित्रीकरण करणारा तरुण प्रदीप रॉय याला बेड्या ठोकल्या आहेत. २३ वर्षीय पिडीत तरुणी आणि आरोपी तरुण हे पवईतील एकाच घरात काम करत असून, एकमेकांना […]

Continue Reading 0
chandivali hospital meet

चांदीवलीत लवकरच उभे राहणार २५० खाटांचे सुसज्ज रुग्णालय

स्थानिक शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून लवकरच चांदिवलीत ७ मजली सुसज्ज रुग्णालय पालिकेच्या माध्यमातून उभे राहणार आहे. मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सह आयुक्त सुनील धामणे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर धामणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रुग्णालयाच्या कामासाठी हिरवा कंदील दिला आहे. चांदीवली विधानसभा क्षेत्रातील लाखो नागरिकांना महानगरपालिकेची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना आमदार दिलीप […]

Continue Reading 0
sm shetty road

एसएमशेट्टी रोड वाहतुकीसाठी खुला

सेन्ट्रल एजेन्सीच्या माध्यमातून पवई आणि चांदिवली या दोन भागांना जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गाचे काम पूर्ण झाले असून, आजपासून (बुधवार, २५ डिसेंबर) हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, आयआयटी स्टाफ कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक राणे काका आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पावसाळ्यापूर्वी पवईतील अनेक रस्त्यांची […]

Continue Reading 0
PEHS

पवई इंग्लिश हायस्कूलच्या शिरपेचात ‘एस वॉर्ड’मधील सर्वोत्कृष्ट शाळेचा मुकुट

पवई इंग्लिश हायस्कूल (पीईएचएस), प्राथमिक विभागाने आणखी एक विक्रम नोंदविला आहे. यावेळी ‘बेस्ट स्कूल’चा मुकुटावर आपले नाव कोरले आहे. ४६ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, त्यांच्यावर मात करत पीईएचएसने हा सन्मान आपल्या नावे केला आहे. पीईएचएसच्या बिन्नू नायर यांनी आपल्या शालेय यशाबद्दल आवर्तन पवईशी बोलताना सांगितले “पीईएचएसला त्याच्या वचनबद्धतेसाठी, स्पर्धात्मक अभ्यासक्रमाचे समर्पण आणि २०१९ […]

Continue Reading 0
Atal Bihari wajpai garden hiranandani

हेरीटेज उद्यान आता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान

पवई, हिरानंदानीतील सर्वांचे आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या हेरीटेज उद्यानाचे आज (बुधवार, २५ डिसेंबर) नामकरण करण्यात आले असून, आता हे उद्यान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि […]

Continue Reading 1
JVLR traffic problem

पवईची वाहतूक कोंडीची समस्या वाहतूक पोलिसांच्या नजरेतून

अरित्रा बॅनर्जी आणि गौरव शर्मा पवईतील वाहतुकीच्या दैनंदिन समस्येमुळे निराश झालेल्या पवईकरांनी गेल्या आठवड्यात फॉरेस्ट क्लब येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमता, भ्रष्टाचार अशी कारणे पुढे करत त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. मात्र मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या नजरेतून ही समस्या एवढी मोठी आहे का? आणि कसे निराकरण करता येईल, त्यांच्यासमोर काय आव्हाने […]

Continue Reading 0
Powai’s Ace Swimmer Bags 3 Gold Medals at ‘South Asian Games’, Makes New Record

‘दक्षिण आशियाई क्रीडा’ स्पर्धेत पवईच्या जलतरणपटूला ३ सुवर्णपदके; रचला नवीन विक्रम

काठमांडू येथे डिसेंबर २०१९’मध्ये झालेल्या ‘१३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत’ पवईतील १४ वर्षीय नववीत शिकणारी आपेक्षा फर्नांडिस भारताचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात युवा खेळाडूंपैकी एक आहे. तिने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक; २०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक आणि ४x२०० मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये तीन सुवर्ण पदके जिंकली. र रहेजा विहारमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूलची विद्यार्थिनी असणाऱ्या आपेक्षा फर्नांडिसने जलतरण […]

Continue Reading 0
dog lake home

विकृत मानसिकता: एअरगनच्या साहय्याने घेतला श्वानाचा जीव; लेक होममधील घटना

पवईतील लेक होम येथील लेक फ्लोरेंस इमारतीत एका श्वानाला (कुत्रा) एअर गनच्या साहय्याने मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नुकतीच पवईत उघडकीस आली आहे. श्वानाच्या शरीरात एक्सरेमध्ये दोन एअर गनच्या पुलेट्स डॉक्टरांना मिळून आल्यानंतर ही घटना समोर आली. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

बँक व्यवस्थापक आणि साथीदाराला पाच कोटीची एफडी चोरल्याप्रकरणी अटक

इंडियन ओव्हरसीज बँक साकीनाका शाखेचे माजी व्यवस्थापक त्रिभुवनसिंग रघुनाथ यादव (वय ५०) आणि त्याचा साथीदार मुबारक वाहिद पटेल (वय ५४) यांना साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. माथाडी कल्याण मंडळाच्या सहा मुदत ठेवींमधून पाच कोटी रुपयांच्या अपहार केल्याच्या आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुबारक पटेल हा आयुर्वेद डॉक्टर आहे. कापड बाजार आणि […]

Continue Reading 0
mumbai police return stolen gold property

वृद्ध दाम्पत्याला दिलासा; रिक्षात विसरलेल्या ४० तोळय़ांच्या दागिन्यांचा छडा लावत गुन्हे शाखेने परतवले

रिक्षातील प्रवासादरम्यान ४० तोळे सोन्याचे दागिन्यांची पिशवी हरवल्यानंतर आयुष्यभराची कमाई गेल्याने निराश झालेल्या एका वृद्ध दाम्पत्याला गुन्हे शाखेने दिलासा मिळवून दिला आहे. आपले  तपास कौशल्य दाखवत रिक्षाचालक आणि त्याच्या एका नातलगाकडून त्यांनी दागिने हस्तगत करत वृद्ध दाम्पत्यास परत मिळवून दिले आहेत. विशेष म्हणजे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेने त्या दोघांना ताब्यात घेवून, पिशवीतील एका […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!