पवई किडनी रॅकेट: हिरानंदानी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यास अटक
पवई किडनी रॅकेटचा तपास करणाऱ्या पवई पोलिसांनी या किडनी रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या हिरानंदानी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. निलेश कांबळे (३६) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, अवयव प्रत्यारोपण समन्वयक म्हणून तो काम पाहतो. या कामासाठी त्याला देण्यात आलेले ८ लाख रुपये त्याच्या पनवेल येथील घरातून पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यापूर्वीही अशा प्रकरच्या केसेसमध्ये परवानगी मिळवून […]
हिरानंदानी रुग्णालयाची अवयव प्रत्यारोपण मान्यता रद्द
किडनी रॅकेट उघडकीस आल्यानंतर राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण समितीचा निर्णय गुरुवारी पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेली शस्त्रक्रिया थांबवून, समाजसेवक आणि पवई पोलिसांनी किडनी रॅकेट उध्वस्त केल्यानंतर हिरानंदानी हॉस्पिटलला कोणत्याही प्रकारचे अवयव प्रत्यारोपण करण्यास तात्पुरत्या स्वरुपात बंदी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी काही समाजसेवकांनी पोलिसांना हिरानंदानी रुग्णालयात किडनी रॅकेटच्या […]
तोतया आयएएस अधिकाऱ्याला साकीनाका पोलिसांनी केली अटक
२००५ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असल्याचे सांगून, साकीविहार येथील व्यवसायिकाची १७.३८ लाखाची फसवणूक करून फरार झालेल्या ८ वी पास तोतया आयएएस अधिकाऱ्याला साकीनाका पोलिसांनी दुसऱ्या सावजाच्या शोधात असताना पुण्यातून अटक केली आहे. सुरेश यादव (४२) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शिक्षकाच्या नोकरीत चांगले […]
चैतन्यनगरमध्ये दरड कोसळून दोन जखमी
जोरदार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच, पवईतील चैतन्यनगर येथे बुधवारी पहाटे घरांवर दरड कोसळल्याने झोपेत असणारी तीन कुटुंबे घरात अडकून पडली. स्थानिकांनी धावपळ करत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या घटनेत येथील तीन घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दोन लोक किरकोळ जखमी झाले आहेत, ज्यामध्ये एका आजारी महिलेचा समावेश आहे. […]
पवईत किडनी रॅकेटचा पर्दाफाश, चार जणांना अटक
लोकांना फसवून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे संमती मिळवून किडनी रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी समाजसेवकांच्या मदतीने गुरुवारी पर्दाफाश केला आहे. भादवि कलम १२० (ब), ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा नोंद करत मुख्य सूत्रधारासह चार लोकांना या गुन्ह्यात अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये रुग्णाच्या मुलाचा सुद्धा समावेश आहे. मुख्य सुत्रधार भैजेंद्र भिसेन (४२), […]
डी-मार्ट जवळील चौकाला पत्रकार जेडे यांचे नाव
हिरानंदानीतील डी-मार्ट जवळील चौकाला निर्भीड पत्रकार जेडे यांचे नाव देण्यात आले आहे. बुधवारी १३ जूनला महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जेडे यांच्या पत्नी शोभा डे, हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, आमदार नसीम खान, नगरसेवक चंदन शर्मा, प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग व मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते. पत्रकार जेडे […]
झोपडपट्टी माफियांना पवईत अटक
बेकायदा घरे विकून लोकांना करोडोचा गंडा घालणाऱ्या तीन झोपडपट्टी माफियांना पवई पोलिसांनी केली अटक वन विभागाच्या जागेवर घरे बांधून, ती आपले असल्याचे भासवून, लोकांना विकून करोडोचा गंडा घालणाऱ्या एका महिलेसह तिच्या दोन साथिदारांना पवई पोलिसांनी वन विभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने अटक केली आहे. रेश्मा खान (४५), नैबुल हुसेन (४४) व मोहमद हुसेन खान (३७) अशी अटक […]
अंध विद्यार्थ्यांसाठी मदतीचा ‘आवाज’
अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांच्या ‘आवाज’ उपक्रमास पवई इंग्लिश हायस्कूलच्या १९ विद्यार्थ्यांनी आपला आवाज देत त्यांच्या शिक्षणाट मोलाचा वाटा उचलला आहे. विद्यार्थ्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कविता आणि गोष्टी रेकॉर्ड केल्या आहेत. अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. अंधांमध्ये ‘दृष्टी’ नसली तरी ‘दृष्टिकोन’ असतो. एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा ते भरभरून बोलतात […]
हिरानंदानीतील चौकाला पत्रकार ज्योतिर्मय डे यांचे नाव
गुन्हे व शोध पत्रकार ज्योतिर्मय डे (जेडे) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या हिरानंदानी येथील चौकाला, सन्मानार्थ त्यांचे नाव देण्यात येणार आहे. १३ जुलै रोजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत नामकरण फलकाचे उदघाटन केले जाणार आहे. मुंबई प्रेस क्लब, स्थानिक रहिवाशी, हिरानंदानी विकासक व महानगरपालिका यांच्या माध्यमातून या चौकाला जेडे यांचे नाव देण्यात येणार आहे. […]
पवई तलावाच्या मगरीचा ‘ट्रॅक वॉक’
पवई तलावात असणाऱ्या मगरी आतापर्यंत केवळ तलावात असणाऱ्या टेकड्यांवरच आढळून येत, मात्र सोमवारी यातील एक मगरीने तलावातून बाहेर निघत, लोकांना चालण्यासाठी बनवलेल्या पदपथावर अक्षरशः ‘ट्रॅक वॉक’ करून परत तलावात परतली. पवई तलावातील त्यांची बसण्याची ठिकाणे उध्वस्त झाल्याने मगरी आता बाहेर निघू लागल्याचे प्राणीमित्र आणि पर्यावरणवादी संस्थांचे म्हणणे आहे. सोमवारी संध्याकाळी पवई तलाव भागात फिरत असणाऱ्या […]
पवईच्या शाळांमध्ये ‘पोलीस दीदी’
@ प्रमोद चव्हाण बालकांवरील अत्याचारांबाबत जनजागृती करण्यासाठी पवई पोलिसांच्यावतीने सोमवारी पवईतील गोपाल शर्मा स्कूल आणि पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘पोलीस दीदी’ परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. पवई पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी या शाळांमध्ये जावून मुलांमध्ये याबाबत जनजागृती करत काय काळजी घ्यावी आणि प्रतिकार कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. पवई पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षक (गुन्हे) […]
धम्मदीप तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव
स्वयंप्रज्ञा व्हा! हा उद्देश घेऊन पवईतील दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विध्यार्थ्यांचा गुणगौरव आणि पुढील वाटचालीसाठी विविध अभ्यासक्रमांचे आणि क्षेत्रांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन पवईतील धम्मदीप सोशल अँड कल्चरल असोसिएशनच्या तर्फे आयआयटी येथील मुक्तेश्वर आश्रम येथे रविवारी करण्यात आले होते. पवई पोलीस ठाणेच्या महिला पोलीस निरीक्षक सौ. सरला वसावे यांच्या हस्ते उदघाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. […]
पवई तलाव भरला, धरण भागात कडेकोट बंदोबस्त
गेल्या आठवडाभर पडलेल्या पावसामुळे पवई तलाव भरला असून, मुंबईकरांचे आकर्षण असणारे पवई तलाव धरण ओसंडून वाहू लागले आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी तलाव भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासूनच या भागात मुंबईकरांनी गर्दी केली होती. आठवडाभर मुंबईला पावसाने झोडपले आहे. तलाव क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत, शुक्रवारी संध्याकाळ पासून पवई तलाव तुडुंब […]
दुर्गादेवी शर्मा उद्यानाला मिळणार नवसंजीवनी, ४० लाखांचा फंड मंजूर
आयआयटी, चैतन्यनगर येथील दुर्गादेवी शर्मा उद्यान पुनर्जीवित करण्यासाठी आमदार निधीतून ४० लाख रुपयाचा फंड मंजूर झाला आहे. रविवारी ३ जुलै रोजी कामाचे उदघाटन आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते केले जाणार असून, लवकरच आयआयटीकरांना आपले हक्काचे उद्यान मिळणार आहे. शहरात अनेक मैदानांवर एकतर अतिक्रमण झाले आहे किंवा त्यांची दुरावस्था झाली आहे. पवईच्या आयआयटी भागात दुर्गादेवी शर्मा […]
पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
लग्नाच्या सात वर्षानंतरही मूल होत नसल्याने मानसिक तणावात असलेल्या व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात हातोडी घालून तिची हत्या करून, स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. याबाबत पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास करत आहेत. पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या फिल्टरपाडा भागात राहणाऱ्या सुरेश बीजे आणि प्रिती बीजे यांचे सात वर्षापूर्वी लग्न […]
लेक होम परिसरात दिसला बिबट्या
पवई मधील लेकहोम परिसराच्या पाठीमागील झाडीत सोमवारी संध्याकाळी काही रहिवाशांना बिबट्या फिरताना आढळून आला आहे. यासंदर्भात सोसायटीतर्फे रहिवाशांना सूचनापत्र देवून सूचित करण्यात आले असून, वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी परिसराची पाहणी करून रहिवाशांना खबरदारी बाळगण्यास सूचना केल्या आहेत. बिबट्याच्या वावरामुळे रहिवाशांना मात्र धडकी भरली आहे. लेकहोम, लेक लुक्रेन सोसायटीच्या आवारात खेळत असणाऱ्या काही मुलांना सोमवारी संध्याकाळी सोसायटी, […]
जेवीएलआर मार्गावरील पहिले शौचालय जनतेसाठी खुले
रविराज शिंदे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर बनवण्यात येणाऱ्या चार शौचालयांपैकी, आयआयटी मार्केट येथे पहिले शौचालय बनवण्यात आले आहे. या शौचालयाचे उद्घाटन रविवारी स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले असून, मंजुरीनंतर एक वर्षानंतर अखेर आता ते जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यात उरलेल्या शौचालयांचे काम पूर्ण करून ती जनतेसाठी खुली केली जाणार आहेत. […]
खदानीत सापडला तरुणाचा मृतदेह
रविराज शिंदे मंगळवार पासून गायब असणाऱ्या पवईतील एका वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह हनुमान नगर येथील खदानीत शुक्रवारी पहाटे सापडला असून, त्याची हत्या कि आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. सोनू पांडियन (२०) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पवईतील महात्मा फुले नगरमधील रहिवाशी आहे. पवईतील महात्मा फुले नगरमध्ये आपल्या ३ भावंडासह राहणारा सोनू कचरा वेचण्याच […]
पवई तलावातील मगरींचे संवर्धन, पालकत्व स्विकारण्यास पालिका, वन विभागाची टोलवाटोलवी
पवई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे पवई तलाव प्रदूषित झाला असून, मगर दर्शन घडणाऱ्या मुंबईतील एकमेव पवई तलावातील मगरींचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. तलावातील वाढत्या प्रदूषणामुळे तलावात असणाऱ्या मगरींचा आधिवास संपुष्टात येत असल्याबाबत प्राणीमित्र आणि पर्यावरणवादी संस्थांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, या मगरींचे संवर्धन करण्यास व पालकत्व घेण्यास महापालिका आणि ठाणे वन विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत […]
‘निव फौंडेशन’ची अंमली पदार्थां विरोधात जनजागृती रॅली
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत, पवईकरांच्यात जनजागृती करण्यासाठी ‘निव फौंडेशन’च्या वतीने शनिवारी २५ जूनला संध्याकाळी ५ वाजता हिरानंदानीतील ‘गलेरिया मॉल ते हेरिटेज गार्डन’ येथे जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी पथनाट्याद्वारे लोकांच्यात जनजागृती केली जाणार असून, अंमली पदार्थ विरोधी पथक व अंमली पदार्थ नियंत्रक पथकाचे अधिकारी सुद्धा लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. अनेक परिसरात […]