पवईत एअर हॉस्टेसची बाथरूममध्ये गळा चिरून हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

पवईतील अशोक नगर भागात राहणाऱ्या एका २३ वर्षीय हवाई सुंदरीची (एअर हॉस्टेस) हत्या झाल्याची एक धक्कादायक घटना पवईत समोर आली आहे. घराच्या बाथरूममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत ती पोलिसांना मिळून आली.

तिच्यासोबत राहणारी बहिण गावी गेली असताना हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पवई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरु केला आहे.

रूपल ओगरे असे हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून, मूळची ती रायपूरची आहे. ती हवाई सुंदरी म्हणून प्रशिक्षण घेत होती. आपल्या बहिणीसोबत ती मरोळ, अशोकनगर भागातील एन जी कॉम्प्लेक्समध्ये राहत होती.

“तिची बहिण ८ दिवसांपूर्वी गावी गेली आहे. रविवारी रुपलच्या घरचे तिला फोन करत होते, मात्र ती फोन उचलत नसल्याने त्यांनी एका मित्राला घरी जावून पाहण्यास सांगितले. घराचा दरवाजा ठोठावूनही ती दरवाजा उघडत नसल्याने त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

“घराच्या बाथरूममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली ती पोलिसांना मिळून आली आहे. यासंदर्भात आम्ही इमारतीचे सुरक्षारक्षक आणि शेजारी यांच्याकडे चौकशी केली आहे,” असे तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आम्ही इमारतीचे आणि आसपासच्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, तसेच तिच्या मित्रांकडे देखील चौकशी करत आहोत.”

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!