मास्क न घातलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) पोलिस (Police) असल्याचे भासवून फसवणूक (Cheating) केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्याची रुपये ४५,०००० किंमतीची सोनसाखळी (Gold Chain) घेऊन पळ काढला. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास फिल्टरपाडा (Filterpada) येथील ६० वर्षांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेतून (BMC) निवृत्त कर्मचारी, मोर्निंग वॉक घेत पायी घरी परतत असताना, स्कूटरवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने (unidentified person) त्यांना तो पोलीस असल्याचे सांगितले. “तुम्ही मास्क का घातला नाही? अशी त्यांची चौकशी केली. माझे नाक वाहते आहे, गर्दीत असताना मी नेहमी मास्क घालतो, असे तक्रारदार म्हणाले, असे पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “पोलीस असल्याचे भासवणाऱ्या इसमाने ज्येष्ठ नागरिकाची अधिक चौकशी करत त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळील मौल्यवान वस्तू पाकीट, सोन्याची चेन आणि नकली अंगठ्या काढून त्या रुमालात ठेवण्यास सांगितल्या.”
दुसऱ्या व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि एवढ्यात पहिल्या व्यक्तीने हातचलाखी करत मौल्यवान वस्तू लांबवत दोघांनी तिथून पळ काढला.
दोघेही स्कूटरवरून पवई उद्यानाच्या दिशेने निघून गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पाहिले असता त्यांची सोन्याची चेन मिळून आली नाही. आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
“लोकसेवकाची तोतयागिरी केल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम १७०, ४२० (फसवणूक) आणि ३४ (समान हेतू) अंतर्गत गुन्हा नोंद करून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत,” असे पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बुधन सावंत यांनी सांगितले.
No comments yet.