पवई इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव यावर्षी ७ व ८ नोव्हेंबरला डॉकयार्ड मैदान, कांजुरमार्ग आणि शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी भारतीय सैन्यदलाचे निवृत्त अधिकारी कर्नल एस के सुरी हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कर्नल सुरी, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शरली उदयकुमार आणि पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भावना मॅडम यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देवून क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
पीटी शिक्षक कृष्णा यादव आणि सावी आरोटे यांच्या नियंत्रणात अनेक मैदानी खेळाच्या स्पर्धा यावेळी पार पडल्या. पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांसाठी स्माईली रेस, संता रेस अशा खेळांनी चेहऱ्यावर हसू पसरवले. तर मोठ्या मुलांच्यात झालेला कबड्डीचा सामन्यामध्ये ९ वीच्या मुलींचा संघ आणि १० वीच्या मुलांच्या संघामध्ये झालेला सामना चांगलाच चुरशीचा झाला.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.