मुंबईच्या किमान तापमानात फेब्रुवारी महिन्यात चांगलीच घट झाली असून, मुंबईच्या अनेक भागात माथेरान पेक्षा अधिक थंडी अनुभवायला मिळाली. माथेरानमधील किमान तापमान १८.६ इतके असतानाच मुंबईत सर्वात कमी तापमान गोरेगाव येथे १४.९० अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.
हिवाळ्याचा ऋतू म्हणजे बाहेर फिरण्याचे, थंडीची मजा अनुभवायचे दिवस. अनेक कुटुंबे या काळात थंडीचा आस्वाद घेत थंड हवेच्या ठिकाणी जावून सुट्ट्या व्यतीत करत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे अनेकांना यावर्षी बाहेर जावून थंडीची मजा अनुभवता आलेली नाही. म्हणूनच की काय यावेळी निसर्ग स्वतः मुंबईकरांसाठी धावून आला आहे. लोकांना बाहेर जाता येत नसल्याचे थंड हवेच्या ठिकाणी असणारी थंडी आता मुंबईत पडू लागली आहे. मुंबईत नुकतीच माथेरान पेक्षा अधिक कमी थंडी मुंबईकरांनी अनुभवली.
मुंबईमधील पवई येथे १७.६० अंश सेल्सियस तर गोरेगाव १४.९०, सांताक्रूझ १६.३७, वांद्रे १८, मालाड १८, बीकेसी १८, कांदिवली १९ आणि कुलाबा येथे २०.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
Nice story