हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर

पवईतील निर्देशांक मध्यम स्तरावर नोंदविण्यात आला.

टाळेबंदीत (लॉकडाऊन) सुधारलेली मुंबईच्या हवेची गुणवत्ता पुन्हा घसरू लागली असून, मंगळवारी ती घसरून वाईट स्तरावर पोहोचल्याचे नोंदीतून समोर आले आहे. अनलॉकनंतर रस्त्यांवर वाढलेली वाहनांची संख्या ऋतूंमधील बदल आणि हळूहळू सुरु होत असलेली मुंबई यामुळे गुणवत्ता निर्देशांक घसरू लागला आहे. पवईचा निर्देशांक मध्यम स्तरावर नोंदविण्यात आला.

सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च म्हणजेच सफरच्या नोंदीनुसार मंगळवारी पहाटे मुबईतील पवई, भांडूप, अंधेरी, बोरिवली, शीव, कुलाबा या ठिकाणचा निर्देशांक मध्यम स्तरावर नोंदविण्यात आला. वांद्रे-कुर्ला संकुल, विलेपार्ले या ठिकाणची गुणवत्ता वाईट तर अतीवाईट नोंद गुणवत्ता निर्देशांक माझगाव, चेंबूर आणि मालाड भागात झाली आहे.

कोरोनामुळे संपूर्ण देश टाळेबंदीत असल्याने रस्त्यांवर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने चालत होती. कार्यालये आणि औद्योगिक क्षेत्र बंद होते यामुळे प्रदूषण कमी होत हवेतील गुणवत्ता निर्देशांक सुधारला होता. मात्र आता मुंबई हळूहळू अनलॉक होत आहे. त्यातच उशिरा का होईना पण नोव्हेंबर उजडता उजाडता थंडीची चाहूल लागत आहे. हवामातील बदल आणि इतर परिणाम यामुळे जमिनीलगतचे प्रदूषक घटक हवेत विरून जात नसल्याने हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील काही शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला ३९६ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून, यातील मुंबईला २४४ कोटी रुपये मिळणार आहेत.

 

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!