पवईत पायलट तरुणीची आत्महत्या

पवई परिसरात एका पायलट तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पवई परिसरात उघडकीस आली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी तपास करत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.

दिल्ली येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सुमेधा मांगे (बदललेले नाव) ही एका नामांकित विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत झाली होती. पवई येथील ग्रीन फोरेस्ट इमारतीत राहणारी सुमेधा सोमवारी रात्री दरवाजा उघडत नसल्याने तिच्या मित्राने चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलावून दरवाजा उघडला असता तिने घरातील पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले.

“सोमवारी पहाटेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली होती. तरुणीला तिच्या मित्रांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते, मात्र दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.” असे पवई पोलिसांनी सांगितले.

“यासंदर्भात तपास सुरु असताना तिचा प्रियकर आदित्य पंडित याच्यासोबत तिचे सतत वाद होत होते. त्या रात्री देखील तो तिथे आला असताना दोघांच्यात काही कारणाने वाद झाले होते” असे पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.

यासंदर्भात पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच मोबाईल डाटा देखील मागवला होता.

“मोबाईल डाटा तपासत असताना आदित्य हा इमारतीतून तरुणीला भेटून गेल्यानंतर देखील सतत तिच्याशी फोनवर बोलत होता. याबाबत संशय आल्याने आम्ही त्याच्याकडे चौकशी केली असता, तरुणीने त्याला फोनवर मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.” असे पवई पोलिसांच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, “काही वेळाने रात्री २.३० वाजता तरुण पुन्हा तरुणीच्या रूमवर आल्यावर ती दरवाजा उघडत नसल्याने त्याने याच परिसरात राहणाऱ्या तिच्या अजून एका मैत्रिणीकडे सुमेधाच्या रूमची चावी आहे का? याबाबत चौकशी केली. मात्र त्या मैत्रिणीकडे चावी नसल्याने त्याने चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलावून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला असता घरात तरुणीने पंख्याला गळफास घेतल्याचे त्याला आढळून आले.”

याबाबत बोलताना तपासी अधिकाऱ्याने सांगितले कि, “दिल्ली येथे प्रशिक्षणा दरम्यान दोघांची ओळख झाली होती. पुढे त्याचे प्रेमात रुपांतर झाल्यानंतर दोघे कधी दिल्लीत तर कधी मुंबईत भेटत असत. मात्र पाठीमागील काही दिवसात दोघांच्यात वाद होत होते. या वादातूनच तरुणीने सोमवारी आत्महत्या केली असल्याने उघडकीस आल्याने आम्ही तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या प्रियकराला भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे.”

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!