चोरीला गेलेले तब्बल २०३ मोबाईल पवई पोलिसांनी केले हस्तगत; ४० आरोपींना अटक

पवई पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले जवळपास २०३ मोबाईल पवई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने हस्तगत केले आहेत. हे सर्व मोबाईल महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून हस्तगत करण्यात आले असून, याबाबत नोंद वेगवेगळ्या गुन्ह्यात ४० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पवई पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, पाठीमागील दहा महिन्याच्या कालावधीत पवई पोलीस ठाणे हद्दीतून प्रवास करताना प्रवासी, पादचारी, व्यावसायिक यांचे मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले होते.

दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने पवई पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि पथक यांचे एक विशेष तपास पथक तयार करून तांत्रिक माहितीच्या आधारे या मोबाईलसचा शोध सुरु केला होता. तपासादरम्यान काही मोबाईल मुंबई, महाराष्ट्रासह इतर राज्यात कार्यरत झाल्याचे समोर आले. “माहितीच्या आधारे तांत्रिक मदतीने पाळत ठेवत महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यातून ४० आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यात असणारे २०० पेक्षा अधिक मोबाईल हस्तगत केले आहेत,” असे पवई पोलिसांच्या तपासी अधिकाऱ्याने  सांगितले.

“मोबाईल चोरीस गेल्या संदर्भात ज्या काही लोकांनी तक्रारी दिल्या आहेत त्यांच्या जवळील मोबाईल संबंधित कागदपत्रे तपासून हे सगळे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले जाणार आहेत,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ १०) मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) सुर्यकांत बांगर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस निरीक्षक जयदिप गोसावी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड, पोलीस हवालदार तानानी टिळेकर, बाबू येडगे, चव्हाण, आदित्य झेंडे, पोलीस शिपाई संदिप सुरवाडे, पाटील, सुर्यकांत शे‌ट्टी, साटम, प्रशांत धुरी, कुंदे यांनी पार पाडली.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!