पवईतील कोरोना (कोविड १९) बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज, २१ एप्रिल २०२० आयआयटी पवई येथील गोखलेनगर परिसरातील ३० वर्षीय पुरुषाचा अहवाल (रिपोर्ट) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच पवईतील कोरोना बाधितांची संख्या आता १२ वर पोहचली आहे. ४ दिवसात ५ कोरोना बाधितांची यात भर पडली आहे.
“चाळसदृश्य लोकवसाहतीमध्ये हा कोरोना बाधित मिळून आला आहे. तो कोणाच्या संपर्कात आला होता का याची आम्ही माहिती घेत आहोत. परिसर पालिकेतर्फे सील करण्यात आला आहे,” असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
“अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येताच त्याला बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.” असेही याबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले.
पवईत चाळसदृश्य वसाहतींमध्ये सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह केसेस
पवईतील सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह हे चाळसदृश्य मोठी लोकसंख्या असणाऱ्या लोकवस्तीत मिळून आले आहेत. चैतन्यनगर, मिलिंदनगर, गौतमनगर, फुलेनगर आणि आता गोखलेनगर. या सगळ्या ठिकाणी दाट अशी लोकवस्ती आहे. दिलासादायक बाब म्हणजे चैतन्यनगर वगळता प्रत्येक ठिकाणी केवळ एकच रुग्ण मिळून आला आहे. चैतन्यनगर परिसरात दोन कुटुंबातील ४ लोकांना याची लागण झाली होती.
पवईतील कोरोना बाधितांची संख्या आता १२ वर पोहचली आहे. ४ दिवसात ५ कोरोना बाधितांची यात भर पडली आहे. १२ पैकी ६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे तर ६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोना_अपडेट २१ एप्रिल २०२०
राज्यात आज ५५२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून, एकूण संख्या आता ५२१८ अशी झाली आहे. यापैकी ७७२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत – आरोग्यमंत्री राजेश टोपे
No comments yet.