आयआयटी कँपस परिसरात असणाऱ्या लेबर कँपमध्ये एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. शिलादेवी राकेश शर्मा (१९) असे या विवाहितेचे नाव आहे. मात्र, या विवाहितेच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नसून, पोलिसांनी अपमृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.
आयआयटी येथील हॉस्टेल क्रमांक चौदाच्या पाठीमागील भागात कामगारांना राहण्यासाठी लेबर कँप बनवण्यात आलेले आहेत. याच लेबर कँपमध्ये मूळचे युपीचा असणारा राकेश सहानी आपल्या पत्नी शिलादेवी सोबत राहतो. राकेश हा आयआयटीत सुतारकाम करतो. शुक्रवारी सकाळी तो कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर शिलादेवीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आयआयटीमधील रुग्णालयात घेऊन जाण्यात आले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
“तिने गळफास घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले असले तरी, तिच्या आत्महत्येमागचे नक्की कारण समजू शकले नाही. आम्ही याबाबत अधिक तपास करत आहोत”, असे आवर्तन पवईशी बोलताना पोलीस उप-निरीक्षक बनसोडे यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.