आयआयटी येथील शिवसेना शाखा क्रमांक ११५ मध्ये पाहा प्रारूप आराखडा. सुचवा आपल्या हरकती व सूचना.
आधीच्या विकास आराखड्याला रद्द केले गेल्यानंतर पालिकेने काहीच महिन्यातच नवीन प्रारूप आराखडा तयार केला आहे. पालिकेचा हा नवीन प्रारूप आराखडा पवईकरांना पाहण्यासाठी शिवसेना शाखा ११५ मध्ये ठेवण्यात आला असून, त्यात हरकती आणि सूचना सुचवण्यासाठी शिवसेना शाखा ११५ तर्फे पवईकरांना आमंत्रित केले गेले आहे.
मुंबई शहरास नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही पालिकेची असते. यामुळेच मुंबईतील सर्व प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रत्येक वीस वर्षांनी या विकास आराखड्यात उद्याने, खेळाची मैदाने, रस्ते, हॉस्पिटल, दवाखाना, शाळा, सभागृह, अभ्यासिका, वाचनालये या सारख्या मानवी सुविधांना आरक्षण दिले जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा २०१४ ते २०३४ नवीन प्रारुप आराखडा तयार आहे. हा आराखडा शिवसेना शाखा ११५ मध्ये लोकांना पाहण्यासाठी ठेवला असल्याने, या आराखड्यात पवईच्या विकासाच्या दृष्टीने सूचना आणि हरकती सुचवण्यासाठी पवईकरांना सुवर्णसंधी चालून आली आहे.
या संदर्भात बोलताना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी सांगितले, “उद्याने, खेळाची मैदाने, हॉस्पिटल आणि सर्व मानवी सुविधांसाठी शिवसेना नेहमीच प्रयत्न करत आली आहे. या सगळ्यांचे आरक्षण असणाऱ्या प्रारूप विकास आराखड्याची माहिती सर्वांना मिळावी यासाठी आम्ही जनजागृती अभियान राबवत आहोत. या आराखड्याला पाहून पवईकर सूचना व हरकती अर्ज स्वरुपात लिहून देवू शकतील.”
प्रारूप आराखडा पाहण्यासाठी पत्ता: शिवसेना शाखा ११५, तिरंदाज व्हिलेज, आयआयटी मेनगेट समोर, पवई
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.