पवईकर लिखित ‘स्वाभिमान’ शोध अस्तित्वाचा मालिका ‘स्टार प्रवाह’वर आजपासून

‘स्वाभिमान’ शोध अस्तित्वाचापवईकर सुषमा बक्षी लिखित ‘स्वाभिमान’ – शोध अस्तित्वाचा, अस्तित्वाचा शोध घेऊ पाहणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट आजपासून तुमच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार, २२ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ६.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पवईकर असणाऱ्या सुषमा बक्षी यांनी या मालिकेची कथा पटकथा लिहिली आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शनने केली असून कल्पेश कुंभार दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा बिरारी ही पल्लवीची व्यक्तिरेखा साकारत आहे. सोबतच अभिनेता अक्षर कोठारी, आसावरी जोशी, सुरेखा कुडची, अशोक शिंदे, प्रसाद पंडित अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत पहायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावर आजपासून प्रसारित होणाऱ्या या मालिकेत अस्तित्वाचा शोध घेऊ पाहणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट पहायला मिळणार आहे. छोट्याश्या गावात जन्मलेल्या पल्लवीचं असणारे शिक्षिका बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ती तिचं ध्येयं कशा पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट ‘स्वाभिमान’ – शोध अस्तित्वाचा मालिकेतून उलगडेल.

सुषमा बक्षी यांनी आपल्या लेखणीतून उलगडलेली एका मुलीच्या स्वाभिमानाची, अस्तीत्वाची लढाई आणि प्रवास बऱ्याच सामान्य कुटुंबांचा आपला जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे तो लोकांना पहायला आणि अनुभवयाला नक्की आवडणार आहे. बक्षी यांच्या या कामाचे पवईसह अनेक भागातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा सिरीयल प्रोमो

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!