पवईमध्ये बत्ती गुल, रहिवाशांची मॉल, कॉफीशॉपकडे धाव

मुंबई शहरातील सर्वाधिक विजेची मागणी बुधवारी दुपारी ३,९६८ मेगावॅटच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. त्यानंतर शहराच्या काही भागांमध्ये काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. गोरेगाव पट्ट्यात दुपारी उशिरा सुमारे दोन तास पुरवठा खंडित झाला. तर विक्रोळी आणि पवईसह पूर्व उपनगरातील काही भागांना संध्याकाळी वीजपुरवठा खंडित झाला.

ऐन उन्हाळ्यात तासभर वीज पुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांचा चांगलाच घामटा फुटला. पवईतील काही उच्चभ्रू वस्त्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने कार्यालये बंद पडली, तर रहिवाशी घरातून बाहेर पडत जवळपास असणाऱ्या कॉफी शॉप, मॉलकडे धाव घेताना आढळून आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेची विक्रमी मागणी वाढलेली असतानाच शहर आणि पूर्व उपनगरात उपकेंद्र बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. २२० केव्ही आरे ट्रान्समिशन सबस्टेशनच्या ट्रिपिंगमुळे ग्राहकांना अंधेरी, मालाड, गोरेगाव, घाटकोपर आणि पवईच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला.

जवळपास ४५ ते ५० मिनिटे हा वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे रहिवाशांनी सांगितले. याचवेळी मात्र संकटकाळात हेल्पलाईन पोहोचत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली.

बुधवारी कुलाबा वेधशाळेने कमाल ३४.४ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ ३५.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांचा चांगलाच घामटा फुटला. काही काळानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर रहिवाशांचा जीव भांड्यात पडला.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!