मुंबईतील मिलिंदनगर येथील एका घराजवळ सिसिलियन (देवगांडुळ) हा दुर्मिळ प्रजातीचा उभयचर जीव आढळून आला आहे. सापासारखा दिसणारा हा जीव या परिसरात आढळून आला. याबाबत स्थानिकांनी टेल ऑफ होप अॅनिमल्स रेस्क्यू फाऊंडेशनला माहिती दिली. टेल्स ऑफ होप फाऊंडेशनचे बचावकर्ते अक्षय रमेश भालेराव आणि जोनाथन फेलिक्स डिसोझा यांनी तेथे धाव घेत सेसिलियनची सुखरूप सुटका केली. महाराष्ट्र वनविभागाचे वैभव पाटील आणि सुरेंद्र पाटील यांना माहिती देत सीसिलियनची तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सिसिलियनला शास्त्रीय भाषेत इच्थ्योफिस बोम्बेयेन्सीस तर इंग्रजीत बोम्बाय सिसिलियन आणि मराठीत देवगांडूळ म्हणतात. हा एक उभयचर प्राणी आहे जो पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतो. गांडूळ हे त्याचे मुख्य खाद्य असते. स्वतःच्या संरक्षणासाठी ते स्वतःच्या शरीरावर चिकट स्राव सोडते. परिणामी, त्याचे शरीर खूपच गुळगुळीत होत असल्याने त्याला पकडणे सोपे नसते. सिसिलियन हे प्रामुख्याने पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात आढळते. होप फाउंडेशनच्या टीमने सांगितले की त्याची ओळख त्याच्या डोळे आणि गोलाकार रिंगण असलेल्या शरीरावरुन निश्चित केली जाऊ शकते.
काय असते देवगांडूळ?
पाय नसल्यामुळे आणि निमुळत्या लांब शरीरामुळे प्रथदर्शनी तो सापा सारखा वाटतो. ते आपला बहुतेक जीवनकाळ ओलसर जमिनीच्या खाली घालवतात त्यामुळे ते आपल्याला खूप कमी परिचित आहेत. ते अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये आढळून येतात. त्यांच्या आहारात प्रामुख्याने गांडूळाचा समावेश होतो. या जाती पूर्णपणे पायविहरीत असतात. त्यांच्या लहान प्रजाती गांडूळासारख्या आणि मोठ्या प्रजाती ५ फुटापर्यंत लांब आणि सापा सारख्या वाटतात. त्यांची त्वचा गुळगुळीत आणि प्रामुख्याने गडद पण काही प्रजातीमध्ये रंगीबेरंगी त्वचा दिसून येते. स्वतःला वाचवण्यासाठी साठी ते त्वचेमधून विषारी द्रव्य सोडतात. त्वचेमधून निघणाऱ्या द्रव्यात Siphonops paulensis नावाच्या द्रव्याचा समावेश असतो.
दृष्टी फक्त अंधारात बघण्यासाठी विकसित झालेली असते. त्यांची डोक्याची कवटी आणि टोकदार तोंडाचा भाग चिखलातून वाट काढायला वापरतो. त्याच्या शरीराचे स्नायू चिखलातून वाट काढण्याच्या दृष्टीने विकसित झालेले आहेत. सर्व सिसिलियन प्रजाती डोळे आणि नासिकामध्ये असलेल्या संवेदनाग्रचा (antenna) वापर संवेदनेसाठी करतात. सगळ्या सिसिलियन प्रजातीमध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी फुफ्फुसे असतात पण त्याचबरोबर ते त्वचा आणि तोंडाचा वापर सुदधा करतात. त्यांचं डाव फुफु उजव्या फुफुसापेक्षा खूपच लहान असते, असे अनुकूलन सापांमध्ये सुदधा दिसून येत.
No comments yet.