मर्चंट नेव्हीत नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

बेरोजगार अनेक तरुण-तरुणी नोकरी मिळवण्यासाठी पैसे देवून नोकरी मिळवण्यास तयार आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत मर्चंट नेव्हीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये सराईत गुन्हेगारांनी शेकडो तरुणांची फसवणूक केली आहे. अशाच एका टोळीला बेड्या ठोकण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी दिल्लीमधून तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून तरुणांचे पासपोर्ट आणि सीडीसी ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपींनी बेरोजगार तरुणांकडून ४३ लाखापेक्षा अधिक रक्कम लुटली आहे.

शिवकुमार राजेशकुमार गुप्ता (२९ वर्षे), सिद्धार्थ कमल बाजपेयी (२२ वर्षे) आणि उदीत कमल सिंग (२४ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी साकीनाका परिसरात मर्चन्ट नेव्हीत नोकरी मिळवून देण्यासाठी अग्याता मरिन्स अलाईस शिपमेन्ट नावाने कार्यालये सुरु करून यासंबंधीची जाहिरात त्यांनी वृत्तपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. अनेक बेरोजगार तरुणांनी या कार्यालयात नोकरीसाठी अर्ज केले.

“इच्छुक उमेदवारांकडून नोकरी मिळवून देण्यासाठी रक्कम घेण्यात आली आणि अनेक तरुणांचे पासपोर्ट जमा करून घेतले. मात्र काहीच दिवसात हे कार्यालय बंद करून सर्व पसार झाले,” असे पोलिसांनी सांगितले.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच या तरुणांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेत या विरोधात तक्रार दाखल केली.

यासंदर्भात तक्रारीच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी आरोपींचे कॉल रेकॉर्ड आणि लोकेशनची माहिती मागवून तपासले असता, पाहिजे आरोपी हे दिल्ली, नोएडा परिसरात असल्याचे उघडकीस आले. या अनुषंगाने एक पथक बनवून साकीनाका पोलिसांनी दिल्ली येथून ३ आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस त्यांच्या इतरही साथीदारांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी या सर्वांची खाती गोठवली असून, त्यांच्या ताब्यातून १२७ बेरोजगार तरुणांचे पासपोर्ट आणि सीडीसी ताब्यात घेतले आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!