पवई इंग्लिश हायस्कूलच्या विज्ञान प्रदर्शनात अवतरली वैज्ञानिक जादू

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये देखील हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रदर्शनात, विज्ञानाचे चमत्कार दाखवत उपस्थितांना आश्चर्यचकित केले.

प्रतिष्ठित रासायनिक अभियंते सुशील कुमार आणि शिक्षण क्षेत्रात अतूट समर्पण देत लाखो विद्यार्थ्यांना प्रगतीच्या मार्गावर घेवून जाणाऱ्या माया सहजन यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे परीक्षण करत त्यांचे कौतुक केले.

वैज्ञानिक पद्धतीने चुंबकीय पृथक्करण पद्धतीचा वापर करून उद्घाटनाने या प्रदर्शन उत्सवाची सुरुवात झाली. उत्सवाला कलात्मकतेचा स्पर्श देत नृत्य सादरीकरणाने प्रख्यात शास्त्रज्ञांना आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण शोधांना मानवंदना देण्यात आली.

वैज्ञानिक प्रदर्शनांत चिमुकल्या वैज्ञानिकांनी कॅलिडोस्कोपमधील आश्चर्यकारक गुंतागुंतीचे नमुने, पिनहोल कॅमेऱ्यांचा मनमोहक साधेपणा, न्यूटन डिस्क्स आणि द्रवपदार्थांची घनता दर्शविणाऱ्या प्रयोगातील चमत्कारांनी सगळ्यांची मने जिंकली.

कॉफी वापरून पर्मनंट (कायमस्वरूपी) मार्करचे आश्चर्यकारकपणे काढून टाकणे, ओब्लेक – कॉर्नस्टार्च आणि पाण्याचे मिश्रण यांचे आश्चर्यकारक वर्तन आणि मीठासोबत चोळल्यावर फेविकॉलचे निर्माण होणारे वैचित्र्यपूर्ण गुणधर्म अशा अनेक मनोरंजक वैज्ञानिक युक्त्या आणि प्रात्यक्षिकांचा देखील या प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता.

फॅन्सी ड्रेस वॉक हा कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरले. जिथे विद्यार्थ्यांनी आपल्या पेहरावातून प्रख्यात वैज्ञानिकांना पुन्हा जिवंत केले. होमी भाभा यांच्या अग्रगण्य कार्यापासून ते बिभा चौधरींच्या शोधांपर्यंत प्रत्येक चित्रणाने या दूरदर्शींच्या दूरदृष्टीचा गौरव केला.

प्रतिष्ठित रासायनिक अभियंते आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे माजी अध्यक्ष सुशील कुमार हे या दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाचे महत्त्व वाढलेच सोबतच त्यांच्या अनेक दशकांच्या अनुभवाचे भावी शास्त्रज्ञाना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

शिक्षणाप्रती अतूट समर्पणाने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पिढ्यांवर माया सहजन यांनी एक अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या उपस्थितीने विद्यार्थी, शिक्षक सर्वांनाच मोठे प्रोत्साहन लाभले. त्यांनी मुलांना अमूल्य मार्गदर्शन करतानाच जिज्ञासा, चिकाटी आणि शिकण्याची आवड याच्या महत्त्वावर भर दिला. ज्यामुळे नवीन पिढीच्या महत्वाकांक्षी शास्त्रज्ञ आणि नवशोधकांना प्रेरणा मिळाली.

प्राचार्या शर्ली उदय कुमार आणि मुख्याद्यापक श्रीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे विज्ञान प्रदर्शन वैज्ञानिक प्रयत्नांच्या केंद्रस्थानी असलेल्या शोध आणि नवकल्पनांचा उत्सव ठरला.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!