गुन्हे व शोध पत्रकार ज्योतिर्मय डे (जेडे) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या हिरानंदानी येथील चौकाला, सन्मानार्थ त्यांचे नाव देण्यात येणार आहे. १३ जुलै रोजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत नामकरण फलकाचे उदघाटन केले जाणार आहे. मुंबई प्रेस क्लब, स्थानिक रहिवाशी, हिरानंदानी विकासक व महानगरपालिका यांच्या माध्यमातून या चौकाला जेडे यांचे नाव देण्यात येणार आहे.
मिड-डे दैनिकाचे संपादक (गुन्हे) जेडे यांची ११ जून २०११ रोजी, मोटारसायकलवरून आलेल्या छोटा राजन टोळीच्या चार गुंडांनी हिरानंदानीतील डी-मार्टजवळ गोळ्या घालून हत्या केली होती. या चौकाला जेडे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पत्रकार मित्र व स्थानिक यांच्याकडून होत होती. अखेर पाच वर्षानंतर याला सर्वपरी मंजुरी मिळाली असून, १३ जुलै रोजी मुंबई महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत सकाळी ११.३० वाजता येथील चौकाला देण्यात येणाऱ्या जेडे यांच्या नामफलकाचा उदघाटनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे मुंबई प्रेस क्लबचे प्रमुख गुरुबीर सिंग यांनी सांगितले.
हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापक सुदीप्तो लहरी यांनी सुद्धा या वृत्ताला दुजोरा देत, सोमवारी प्रेस क्लब प्रतिनिधींसोबत चर्चा करून पुढील तयारीला सुरवात होणार असल्याचे आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.