पवई पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) अनिल फोपळे हे सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या जागी वपोनि म्हणून सुधाकर कांबळे यांनी नुकताच पदभार सांभाळला आहे. भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पोलीस दलात सेवा बजावणे पसंत केले आहे.
कांबळे हे १९९६च्या बॅचचे अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी डोंगरी, पायधुनी, एमएचबी, आझाद मैदान पोलीस ठाणे अशा अतिसंवेदनशील भागातील पोलीस ठाणे बरोबरच सशस्त्र पोलीस दल – ४, गुन्हे शाखेमध्ये सुद्धा काम केले आहे. हा दांडगा अनुभव पाठीशी घेऊन त्यांनी नुकताच पवई पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सांभाळला आहे.
पवई पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणारा परिसर हा तसा शांत असला तरी, बाजूला असलेल्या आयआयटी मुंबई सारख्या संवेदनशील ठिकाणावर त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर दर दोन दिवसाला घडणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृती आणि लक्ष देणे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे.
वपोनि सुधाकर कांबळे यांनी पदभार स्विकारल्यानंतर पवईतील विविध पक्ष- संघटनेचे व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी ‘पवई दैनिक पत्रकार संघ’ या होतकरू पत्रकार संघटनेच्या सदस्यांनी सुद्धा त्यांची भेट घेऊन पवईतील नानाविध समस्यांवर चर्चा केली आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
No comments yet.