पवईमधील हिरानंदानी भागात कॉलेज विद्यार्थिनी समोर अश्लील वर्तन आणि अश्लील शेरेबाजी करणाऱ्या मोटारसायकल बहाद्दराला काल संध्याकाळी पवई पोलिसांनी अटक केली आहे. कल्पेश गोपीनाथ देवधरे (२७) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून, मुंबईभर विनयभंगाचे त्याच्यावर दोन डझनच्यावर गुन्हे नोंद आहेत. रोजंदारीवर मिळेल ते काम करणारा कल्पेश हा कधी आपल्या आई सोबत […]


