साकीनाका, खैरानी रोड येथील दुकानाला आग लागल्याची घटना १९ जानेवारीला मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या आगीत तीन जण गंभीररित्या जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खैरानी रोड, न्यू इंडिया मार्केट येथील रेहमानी हॉटेल जवळील एका दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत […]
Tag Archives | आग
इलेक्ट्रोनिक्स भंगार घेवून जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग
इलेक्ट्रोनिक्स भंगार घेवून जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना सोमवार, ५ ऑक्टोबर रात्री पवई परिसरात घडली. प्रसंगावधान राखत चालकाने गाडी बाजूला लावत गाडीतून बाहेर पडल्याने कोणत्याही प्रकारच्या जीवित हानीची नोंद झाली नसून, टेम्पो जळून खाक झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो क्रमांक एमच १५ एफवी ११५४ असल्फा येथून इलेक्ट्रोनिक्स भंगार घेवून नाशिकला […]
पवईत पाण्याच्या टँकरला आग
पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर (जेविएलआर) धावत्या पाण्याच्या टँकरला आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून, रस्त्यावर प्रवास करणाऱ्या लोकांच्या मदतीने दुसऱ्या एका टँकरमधील पाणी वापरून आग विझवण्यात आली. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका वॉटर सप्लाय कंपनीचा टँकर हा पाणी घेवून जेविएलआर वरून अंधेरीच्या दिशेने जात होता. मरीन इन्स्टिट्यूट […]
चांदिवलीत स्टुडिओला आग, जीवितहानी नाही
साकीविहार रोडवर चांदिवली येथे असणाऱ्या एका स्टुडिओला आग लागल्याची घटना आज, शनिवार, १८ जुलै रोजी घडली. एसीमध्ये ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सगळेच बंद असल्यामुळे सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण सुद्धा बंद होते. मात्र काही दिवसांपूर्वीच चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. “चांदिवली येथे असणाऱ्या या […]
लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी
चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]
हिरानंदानीत हायको मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग
हिरानंदानी येथील एव्हीटा इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर लागलेल्या आगीला आठवडा उलटला नसेल की, येथील हायको मॉलच्या पहिल्या मजल्यावर डक्टजवळ, कॅफेच्या भागाला आग लागल्याची घटना आज सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई अग्निशमन दल आणि हिरानंदानी एसटीएफ यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, येथील बोट कॅफेच्या एसीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे अग्निशमन दलाकडून […]
हिरानंदानी, इवीटा इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग, बेडरूम जळून खाक
पवई हिरानंदानी गार्डन परिसरातील इविटा इमारतीच्या १५व्या मजल्यावरील १५०२ या फ्लॅटमध्ये सायंकाळी ४.१० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना आज घडली. घरमालक शेनॉय यांचा परिवार यावेळी घरातच होता, आगीची माहिती मिळताच त्यांनी घराबाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी पोहचलेल्या हिरानंदानी स्पेशल टास्क फोर्स आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. यासंदर्भात […]
हिरानंदानी, एवेलॉन इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर आग
हिरानंदानी येथील एवेलॉन इमारतीच्या १४ व्या मजल्यावर असणाऱ्या १४०२ फ्लॅटमध्ये शोर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज संध्याकाळी ७.४५ वाजता घडली. घटनास्थळी पोहचलेल्या हिरानंदानी स्पेशल टास्क फोर्स आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी घडलेली नाही. यासंदर्भात घटनास्थळी पोहचलेल्या पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी येथील एवेलॉन इमारत, ‘बी’ विंगच्या चौदाव्या […]
धावत्या ट्रकला आग; पवई पोलिसांच्या सजगतेमुळे टळली मोठी दुर्घटना
आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आदी शंकराचार्य मार्गावर धावणाऱ्या एका ट्रकला आग लागल्याची घटना पवई परिसरात घडली. पवई पोलिसांच्या आयआयटी बिट चौकीत असणाऱ्या पोलिसांनी स्थानिक दुकानदारांसह धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओ डी सी ट्रान्सपोर्ट कंपनीचा एमएच १० एडब्ल्यू ७३२७ ट्रक जोगेश्वरी येथून लाकडी खुर्च्या, टेबल, कॉम्पुटर, एअर […]
ज्ञानमंदीर शाळेच्या मीटर बॉक्सला आग; विद्यार्थी सुखरूप
रविराज शिंदे, रमेश कांबळे पवईतील आयआयटी माता रमाबाई नगर भागात असणाऱ्या ‘ज्ञानमंदीर विद्यालय’ शाळेच्या मीटर बॉक्सला आग लागल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. शाळेच्या पाठीमागील बाजूस हा मीटर बॉक्स असल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नाही. शाळेतील कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवांनाच्या साहय्याने विद्यार्थ्यांना त्वरित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टाळता आला.सोमवारी मरोळ भागात असणाऱ्या […]
हिरानंदानीत बिजनेस पार्कच्या मिटर रूमला आग, अग्निशमन अधिकारी जखमी
पवई, हिरानंदानीतील केसिंग्टन बिजनेस पार्कच्या तळमजल्यावर असणाऱ्या मीटर रूमला आग लागल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली. दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ बंबांच्या साहय्याने १ तासानंतर संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग विझवण्याचे काम सुरु असताना विक्रोळी अग्निशमन विभागाचा एक कर्मचारी आगीच्या दाहामुळे किरकोळ जखमी झाला असून, उपचारानंतर […]
चांदिवलीत बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग, मजूरांची सुखरुप सुटका
@प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे चांदिवली येथील हिरानंदानी विकासकाच्या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारी १२.१५ वाजता घडली आहे. अग्निशमन दलाच्या २० – २५ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीतून ७० – ८० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, धूर शरीरात गेल्याने श्वसनास त्रास जाणवू लागलेल्या ६ कामगारांना […]
हिरानंदानीत फेब्रीकेशन युनिटला आग
हिरानंदानीमधील जयभीमनगर परिसरात असणाऱ्या फेब्रीकेशन युनिटला रविवारी रात्री १०.२० वाजता आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ३ बंबांच्या मदतीने १५ मिनिटाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले गेले असून, आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानीची नोंद नाही. सध्या मुंबईत आगीचे सत्रच सुरु आहे. या आगींमध्ये अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पवईमध्ये सुद्धा वारंवार आगीच्या घटना घडत […]
आयआयटीत खाजगी कँटिंगमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही
रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण पवईतील आयआयटी कॅम्पसमध्ये एका खाजगी कँटिंगमध्ये आग लागल्याची घटना आज संध्याकाळी ९.१० च्या सुमारास घडली. विद्यार्थी, आयआयटी सुरक्षारक्षक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले गेले असून, कँटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. आज (सोमवारी) संध्याकाळी ९.१० वाजताच्या सुमारास आयआयटी कॅपसमध्ये येथील हॉस्टेल क्रमांक ४ जवळ असणाऱ्या […]
खैरानी रोडवर फरसाण दुकानाला आग, १२ जणांचा मृत्यू
चांदिवलीतील खैरानी रोडवरील भानू फरसाण स्वीट दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज पहाटे ४.१५ वाजता घडली. या आगीत होरपळून १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या ३ फायर इंजिन व ४ पाण्याच्या बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, बचावकार्य सुरु आहे. खैरानी रोडवरील मखारीया कम्पाऊंडमध्ये गाळा क्रमांक १ मध्ये […]
पवईत बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीमध्ये आग
पवईमधील चंदननगर जवळ बांधकाम सुरु असणाऱ्या एका इमारतीच्या अकराव्या मजल्याला आग लागल्याची घटना आज (शुक्रवार) रात्री ९.३५ वाजता घडली. ४० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. संध्याकाळी ९.३५ वाजता पवई, गांधीनगर येथील चंदननगर […]
पवई प्लाझामध्ये भीषण आग; ऑफिस जळून खाक
हिरानंदानी येथील पवई प्लाझाच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जिओ सिंडीकेट या कन्सल्टन्सी ऑफिसला आज (सोमवार) सकाळी ११.३० वाजता भीषण आग लागली. आगीत कन्सल्टन्सी ऑफिस जळून पूर्ण खाक झाले असून, शेजारी असणाऱ्या दोन ऑफिसना सुद्धा याची झळ बसली आहे. इमारत प्रशासन, शॉप कर्मचाऱ्यांच्या मदतीने व घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमनदलाच्या ५ गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या […]
एनटीपीसी इमारतीत आग, मोठा अपघात टळला
जलवायू विहार जवळ असणाऱ्या एनटीपीसी या रहिवाशी संकुलाच्या ‘डी’ विंगच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी एसीत शोर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या माहिती मिळताच पाच मिनिटाच्या आत घटनास्थळावर दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. पवई उंच इमारतींच्या ठिकाणा व्यतिरिक्त आगीचे ठिकाण म्हणून पण आता ओळख निर्माण करू लागले आहे. येथील उंच उंच इमारतीत गेल्या […]
जयभिम नगरमध्ये भीषण आग, वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल
@रविराज शिंदे पवईतील जयभीम नगर परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे ४ वाजता घडली. सदर घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. मात्र, अतितापमान परिस्थितीत वीज खंडीत झाल्याने नागारिकांचे मात्र अतोनात हाल झाले. जयभीम नगर या डोंगराळ भागातील संपूर्ण परिसराला एमएसईबी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. ज्याचे ट्रान्सफॉर्मर परिसराच्या मुख्यप्रवेशद्वारावर […]
आयआयटीत तीन दुकाने आगीत जळून खाक
@रविराज शिंदे, रमेश कांबळे पवई, आयआयटी मेनगेट येथील गोखलेनगर परिसरात रविवारी लागलेल्या आगीत येथील फुटपाथवर असणारी तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. शोर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयआयटी, गोखलेनगर परिसरात असणाऱ्या फुटपाथवर ज्यूस […]