Tag Archives | आग

shivom-fire

चांदिवलीत शिव ओम इमारतीमध्ये भीषण आग, २ जखमी, १ मृत

चांदिवली येथील शिव ओम इमारतीमध्ये आज संध्याकाळी ३.४० च्या दरम्यान भीषण आग लागली. इमारतीच्या ९ व्या मजल्यावरील भारवानी यांच्या घरात शोर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत असून, भारवानी यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती यात जखमी झाल्या आहेत तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दोन्ही जखमींवर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नंदलाल भारवानी (६७), तरुण नंदलाल […]

Continue Reading 0
छायाचित्र: वैभव जाधव, प्रमोद चव्हाण

हिरानंदानीतील ‘के ३’ आगीत जळून खाक

हिरानंदानी मधील वेन्चुरा इमारतीमध्ये असणारे प्रसिद्ध नाष्टा आणि मिठाई दुकान के ३ मंगळवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, मात्र तोपर्यंत संपूर्ण फर्निचर जळून दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पवईकरांच्यात आपले हक्काचे नाष्ट्याचे ठिकाण नष्ट झाल्याची खंत व्यक्त होत आहे. याबाबत पवई पोलिसांनी […]

Continue Reading 0
IMG_8454ab

अन् उभी इंडिगो पेटली

चांदिवली भागात चालत्या रिक्षाला आग लागून रिक्षा जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच, आयआयटी येथील तिरंदाज शाळेसमोर कारच्या एसीत शॉर्ट झाल्याने पार्किंगमध्ये उभी टाटा इंडिगो पेटल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. मात्र इंडिगो गाडी पूर्ण जळून खाक झाली असून, तिच्या जवळ पार्क असणाऱ्या कॉलीस आणि मारुती […]

Continue Reading 0
IMG_20160323_162008

पवई, एव्हरेस्ट हाईट इमारतीमध्ये आग

पवईतील लेकहोममधील आगीच्या जखमा अजून ताज्या असतानाच, आज (बुधवारी) याच परिसरातील एव्हरेस्ट हाईट या गगनचुंबी इमारतीच्या १०व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १००३ मध्ये दुपारी ३.५० वाजता एसीत शोर्ट सर्किट होऊन आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ टँकर्स, ३ बंब, २ स्कायलिफ्टच्या साहय्याने काही तासांतच अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिक आणि कामगारांनी तत्परता […]

Continue Reading 0

आयआयटी कॅम्पसमध्ये किरकोळ आग

आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये मंगळवारी संध्याकाळी किरकोळ आग लागल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी बनवलेल्या वस्तीगृहाच्या पाठीमागील बाजूस भंगार साठवून ठेवण्याच्या ठिकाणी ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या एका इंजिनच्या मदतीने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मंगळवारी संध्याकाळी ५.२५ वाजण्याच्या सुमारास कॅम्पसच्या आतील भंगार, कचरा साठवून ठेवण्याच्या ठिकाणी […]

Continue Reading 0
fire

शॉर्ट सर्किटमुळे इंदिरानगरमध्ये आग, जीवितहानी नाही

  रविवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान इंदिरानगर येथील चाळीत असलेल्या इलेक्ट्रिक मिटर बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अर्ध झोपेत असणाऱ्या लोकांना आगीची माहिती मिळताच स्थानिकांची धावपळ उडाली, मात्र दक्ष नागरिक व पोलीस यांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेत पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा धोका टळला. पवई आयआयटी येथे मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळीचे जाळे आहे. यापैकी इंदिरानगर येथील […]

Continue Reading 0
blast parksite

पार्कसाईटमध्ये घरात सिलेंडर स्फोट, ८ जण जखमी

पार्कसाईट विक्रोळी येथील आंबेडकरनगर सोसायटीत शनिवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी स्फोट झालेल्या घरातील दोघे गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घर रस्त्याला लागून असल्याने घरातील काही लोक आणि पादचारीही यांचा जखमींमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी […]

Continue Reading 0
छायाचित्र: ऑलीविया डिसुझा

पवई लेक होममधील भीषण आगीत ७ लोकांचा मृत्यू, २२ पेक्षा जास्त जखमी

पवई लेक होम, फेज तीन मधील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, एका महिलेसह ७ जणांचा मृत्यू झाला असून २२ पेक्षा जास्त लोक जखमी असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगितले जात आहे. मृतांपैकी तीन जणांचा मृत्यू हा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरून झाला आहे. एका जखमीला ऐरोली येथील नॅशनल बर्न्‍स सेंटर येथे उपचारार्थ हलविण्यात आले […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!