पवई तलावात मासेमारी करण्यास विरोध दर्शवल्याने पवई येथील महाराष्ट्र स्टेट अँग्लिग असोसिएशनच्या पर्यवेक्षकासह सुरक्षारक्षकाला काही अज्ञात इसमांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. मध्यरात्री काही इसमांनी काठ्या घेवून क्लबच्या कार्यालयात घुसून हा हल्ला चढवला. यासंदर्भात पवई पोलिसांनी ७ जणांविरोधात भादवि कलम ३२४, ५०६, १४३, १४७, १४९ नुसार गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. […]
Tag Archives | पवई तलाव
पवईत सापडले दीड महिन्याच्या बालकाचे शव
पवईमधील पवई तलाव भागात काल (मंगळवारी) सकाळी दीड महिन्याच्या बालकाचे शव सापडल्याने एकच खळबळ उडाली. पवई पोलिसांनी शव विच्छेदनासाठी पाठवले असून, अधिक तपास करत आहेत. मंगळवारी सकाळी पालिका उद्यान विभागातील सुपरवायझर अरविंद चिंतामणी यादव पवई तलाव भागात फेरफटका मारत असताना त्यांना एका बालकाचे शव पवई तलावाच्या रामबाग येथील भागात गाळात पडल्याचे आढळून आले. “यादव याने […]
पवई तलावावर सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
पवई तलाव भागात वाढणाऱ्या गैरकृत्यांना रोखण्यासाठी तसेच मुंबईकरांचे आकर्षण असणाऱ्या पवई तलावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पवई तलावावर सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे येथे चालणाऱ्या गैरकृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा पवईकरांकडून व्यक्त केली जात आहे. पूर्वीपासूनच मुंबईकरांच्या आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या पवईतील पवई तलावाकडे जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित व्हावेत, तलावाचे रुपडे पालटण्यासाठी करोडो रुपये खर्च करून येथील […]
पवई तलावावरील प्रेमी युगलांच्या अश्लील चित्रफीती व्हायरल, गुन्हेगारांना अटक करण्याची युथ पॉवरची मागणी
@रविराज शिंदे पवई तलाव भागात प्रेमरसात मग्न असणाऱ्या प्रेमी युगलांचे फोटो आणि चित्रफिती काढून सोशल मिडियामार्फत व्हायरल करणारी टोळीच या भागात सक्रीय झाली आहे. मुंबईतील युथ पॉवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हातात या चित्रफिती पडताच, त्यांनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल फोपळे यांची भेट घेवून याबाबत लेखी निवेदन देत चित्रफिती व्हायरल करणाऱ्यावर त्वरित कारवाई […]
पवईत २६, २७ जानेवारीला भरणार रात्र बाजार
मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने मुंबईतील वरळी, मालाड आणि पवई येथे रात्र बाजार भरणार आहे. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये २६ आणि २७ जानेवारीला पवईमधील पवई तलाव भागात हा उत्सव रंगणार आहे. संध्याकाळी ४ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हा बाजार चालणार असून, मनोरंजन आणि खरेदी असे दुहेरी हेतू या रात्र बाजारातून […]
पवई तलावात पडून तरुणाचा मृत्यू
मन्नूभाई चाळ, पवई येथे राहणारा अठरा वर्षीय मोहमद फरहान हा पवई तलावात मासेमारीसाठी गेला असताना पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल (रविवारी) संध्याकाळी पवईत घडली. याबाबत पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत. ‘फरहान हा आपल्या काही मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी काल रामबाग येथील पवई तलाव भागात उतरला होता. मासेमारी करताना त्याचा […]
पवई तलावात उडी मारून तरूणीची आत्महत्या
रविराज शिंदे, रमेश कांबळे पवईतील रमाबाई आंबेडकरनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय तरूणीने पवई तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी ३ वाजता उघडीस आली आहे. ऐश्वर्या खंडागळे असे तरूणीची नाव असून, ती ज्ञान मंदिर शाळेत १० वीत शिकत होती. शुक्रवारी कोचिंग क्लासला जात आहे असे सांगून गेलेली एश्वर्या उशिरा पर्यंत घरी परतलीच नाही. घरातील […]
पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अफवा कि सत्य?
कालपासून सोशल मिडियावर पवई तलावातून एक मगर बाहेर आल्याची बातमी व्हायरल होत आहे. मात्र या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आवर्तन पवईने जेव्हा पवई पोलीस, प्राणीमित्र संघटना ‘पॉज मुंबई’ आणि वन विभाग यांच्याशी संपर्क साधला तेव्हा यातील कोणाकडेही पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अधिकृत तक्रार किंवा माहिती कळवण्यात आलेली नसल्याचे या सर्वांनी स्पष्ट केले. काल जोरदार […]
पवई तलावावर गणेश विसर्जनाचे थांबलेले कार्य पूर्ववत
मुंबईत आज सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि भरतीमुळे पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे पवई तलावात सुरु असणारे गणेश विसर्जन काही काळासाठी थांबवण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर ओसरताच पवई तलावातील विसर्जन कार्य पूर्ववत झाले आहे. शुक्रवारी विराजमान झालेल्या गणेशांपैकी पाच दिवसांच्या गणपतींचे आज ठिकठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरातील अनेक गणेशांचे पवई […]
महिलेचा पवई तलावात आत्महत्येचा प्रयत्न; सुरक्षारक्षकांनी वाचवले प्राण
पवईतील जयभीमनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा पवई तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न काल सकाळी येथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे फसला. सविता जाणकार (४०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर सध्या जोगेश्वरी येथील ट्रोमा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवई तलावात वाढत्या घुसखोरीला रोखण्यासाठी सध्या तलावाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट अंग्लिंग असोसिएशनचे गस्त पथक […]
पवई तलावाच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या मुलाचा धाडसी तरुणांनी वाचवला जीव
पवईतलावाच्या धबधब्यावर भिजण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून पाण्यात वाहून जात असताना काही धाडसी तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याचा जीव वाचवल्याची घटना काल पवईत घडली. या चित्तधरारक क्षणाचा व्हीडीओ आज संपूर्ण सोशल मिडियाचा विषय बनला होता. पवई तलाव पावसाळ्यात सर्व मुंबईकरांचे आकर्षणाचे ठिकाण असते. येथील डॅमवरून पडणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी तर तरुणाईची मोठी गर्दी उसळते. सोमवारी सुद्धा […]
एका ट्वीटने दोन तासात हटवला एनटीपीसी सिग्नलला अडथळा बनणारा वाहतूक दर्शक फलक
नव्या पिढीच्या संभाषणाचे माध्यम असणाऱ्या सोशल मिडियामुळे अनेक कामे झटपट होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असेच गेली अनेक महिने एनटीपीसी सिग्नल समोर लावण्यात आलेल्या वाहतूक फलकामुळे सिग्नल दिसण्यासाठी प्रवाशांना होणारी अडचण एक बँक कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांच्या @mumbaipolice ट्वीटरवर टाकताच दोन तासातच अडचण करणारा वाहतुकीचा फलक हटवण्यात आला आहे. घाटकोपर येथील रहिवाशी व बँक कर्मचारी असणारे […]
पवई तलावात बोट उलटून ८ जण बुडाले, ५ जणांना वाचवण्यात यश
पवई तलावात बोट उलटून ८ जण बुडाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यातील ५ जणांना वाचवण्यात स्थानिक आणि अग्निशमन दलाला यश आले आहे. तर ३ जणांचा शोध शनिवारी संध्याकाळ पर्यंत चालूच होता. बुडालेले सर्व हे मुंबईतील विविध भागातील रहिवाशी असून, पवई तलावातील हाउस बोटवर पार्टी करण्यासाठी आले होते. या घटनेवरून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे की […]
पवई तलाव परिसर उजळणार एलईडी दिव्यांनी; पर्यावरणवादी संस्थांची सौर एलईडी दिव्यांची मागणी
विदेशी पर्यटकांसह मुंबईकरांचे आकर्षण असलेला पवई तलाव परिसर येत्या काही दिवसात एलईडी दिव्याने उजळणार आहे. पवई तलाव सुशोभिकरणाच्या वेळी हे एलईडी दिवे बसवले जाणार आहेत. या कामासाठी ७.५ कोटी खर्च येणार असून, दोन कंत्राटदारांची निवड सुद्धा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपल्या कॅमेऱ्यात येथील दृश्यांना कैद करण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. मात्र, पर्यावरणवादी संस्था पॉज […]
पवई तलाव वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची पवईकरांशी चर्चा
पवई तलावात सोडल्या जाणाऱ्या घाण पाण्यामुळे पवई तलावाचे होणारे प्रदूषण तसेच त्याच्या सुशोभिकरणावेळी घ्यावयाच्या उपाययोजना आणि नियोजनबद्द कामावर चर्चा करण्यासाठी पालिकेच्या हायड्रोलिक विभागाच्यावतीने त्यांच्या भांडूप येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पॉज मुंबई संस्थेचे सुनिश सुब्रमण्यम, निशा कुंजू, यंग इन्वायरमेंट संस्थेच्या ईलसी गेब्रील, आशा संस्थेचे पदाधिकारी आणि पवईकर उपस्थित होते. हायड्रोलिक विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]
पवई तलाव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गुंडाळला; पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर पालिकेचा निर्णय
पवई तलावात विविध वाहिन्यांच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र हा प्रकल्प बसवण्याचा खर्च करण्याऐवजी, तलावात सांडपाणी सोडण्यात येवू नये अशी मागणी पॉज या पर्यावरणवादी संघटनेने लावून धरली होती. याबाबत आवर्तन पवईने पाठपुरावा केला होता. महानगर पालिकेने अखेर आपला हा निर्णय पाठीमागे घेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दुसरे उपाय योजणार […]
गणेश विसर्जन २०१६ (अकरा दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप)
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
महेश गौडाच्या न्यायासाठी स्थानिकांचा मूक कॅंडल मार्च
विसर्जन काळात जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या महेशच्या मृत्यूस सुरक्षाव्यवस्था आणि विसर्जन व्यवस्था जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी घेऊन मंगळवारी रात्री पवईतील नागरिकांनी पवई प्लाझा ते गणेशनगर गणेश विसर्जन घाट असा मूक कॅंडल मार्च काढला. बुधवारी प्रतिनिधींनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आपली मागणी ठेवली. रविवारी गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या महेश […]
पवई तलावात बुडालेल्या तरुणास गणेश विसर्जनास बंदी केल्याचा समाजसेवी संस्थेचा दावा
पवई तलावात विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण पवईवर शोककळा पसरलेली असतानाच, गणेश विसर्जनाचे काम पाहणाऱ्या ‘पवई नागरिक सेवा संस्था’ या समाजसेवी संस्थेने महेश यास पोहता येत नसल्याने विसर्जनाच्या कामास मनाई केली होती असा दावा केला आहे. या घटनेने सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न गणेश विसर्जनाच्या कामकाजावर उपस्थित झाला असून, याची नक्की जबाबदारी कोणाची? […]
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पवई तलावात बुडून मृत्यू
गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या तरुणाचा पवई तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (रविवारी) पवईत घडली. महेश गौड (२४) असे या तरुणाचे नाव असून, तो स्वतः लाइफ गार्ड म्हणून विसर्जन काळात काम पाहतो. रविवारी सात दिवसाच्या घरगुती आणि सार्वजनिक गणेशांचे विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर सुरु होते. अशाच एका सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती रात्री ११.५० […]