Tag Archives | पवई तलाव

residents of powai and jvlr

मेट्रो – ६ भूमिगत मार्गाने करण्याची पवईकरांची मागणी

स्वामी समर्थनगर – जोगेश्वरी – कांजुरमार्ग – विक्रोळी या मार्गावर होणारा मेट्रो – ६ प्रकल्प भूमिगत करण्याची मागणी पवईकरांकडून केली जात आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड़वर होणाऱ्या वाहतूक कोंडीसह हा एलिवेटेड मार्ग पवई तलाव आणि परिसराचे सौदर्य बिघडवणार असल्याने, पवईकरांनी याला विरोध दर्शवत भूमिगत मार्गाने करण्याची मागणी केली आहे. पवईकरांमध्ये याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वृत्तपत्रांमधून पत्रके […]

Continue Reading 0
chhat puja

पवई तलाव घाटावर छठ पूजा हर्षोल्हासात

उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा सण, सूर्य आणि त्याची पत्नी उषा यांना समर्पित असलेली ‘छठ पूजा’ पवईत हर्षोल्हासात साजरी झाली. पवई तलाव घाटावर हजारोच्या संख्येने  भाविकांनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत छट पूजा साजरी केली. उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी विविध संस्थांकडून सोयी-सुविधा देण्यात पुढाकार दिसला. यावेळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या, आमदार नसीम खान यांच्यासह भाजपचे नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास […]

Continue Reading 0
dipak kute1

विहार तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

आपल्या महाविद्यालयीन मित्रांसोबत विहार तलाव भागात फिरण्यासाठी गेलेल्या पवईतील एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. दिपक शिवाजी कुटे (१८) असे या तरुणाचे नाव असून, तो आयआयटी कॅम्पसमध्ये आपल्या परिवारासोबत राहत होता. याबाबत मुलुंड पोलिस अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत. गेल्या काही वर्षात पवई आणि आसपासच्या भागात असणारे तलाव […]

Continue Reading 0
ganesh visarjan incident

पवई तलावात विसर्जना वेळी मुर्ती पडून दोन तरुण जखमी

काल अकराव्या दिवशी पवई तलावावर विसर्जन सुरु असताना क्रेनवरील मूर्तीचा तोल बिघडून पडल्यामुळे दोन तरुण जखमी झाल्याची घटना पवईत घडली. सागर चांडालीया (३२) आणि रफिक शेख (२९) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुणांवर राजावाडी येथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पवई तलावावरील […]

Continue Reading 0
IMG_4058

दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]

Continue Reading 2

बर्थडे पार्टी साजरी करायला गेलेल्या इसमाचा विहार तलावात बुडून मृत्यू

@रविराज शिंदे साई बांगुर्डा येथे पोहायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल रविवारी विहार तलाव येथे मित्रांसोबत गेलेल्या एका ५२ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली आहे. अग्निशमन दलाच्या साहय्याने त्यांचा शोध सुरु असून, त्यांना अजूनपर्यंत यश लाभले नाही. मुंबईमध्ये मुसळधार पावसाने गेल्या तीन दिवसापासून हाहाकार माजवला आहे. […]

Continue Reading 0
powai lake overflow

पवई तलाव ओसंडून वाहू लागला

  @रविराज शिंदे, सुषमा चव्हाण शनिवार, रविवार दोन दिवस मुंबईमध्ये पावसाचा तडाखा सुरू आहे. तलाव भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे पवई तलाव तुडूंब भरून रविवारी वाहू लागला. पावसात भिजण्याचा आनंद आणि पिकनिक करण्यासाठी रविवारी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तलाव भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!