पवई, हिरांनंदानी येथे नाकाबंदी सुरु असताना ‘नो एन्ट्री’मधून आलेली कार थांबवून, नियम मोडल्याबाबत दंड भरण्याची मागणी करणाऱ्या पवई पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिपायाला कारचालक महिलेने धक्काबुक्की करून पळ काढल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेचा शोध सुरु केला आहे. पवई पोलिसांच्यावतीने ठिकठिकाणी नाकाबंदी करून पवईमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्या सोबतच गुन्हेगारी […]
Tag Archives | पवई
संविधान किंवा आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मी सोडणार नाही – रामदास आठवले
@रविराज शिंदे भाजप सरकार बाबासाहेबांनी लिहलेलं संविधान आणि मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण नष्ट करण्याच्या तयारीत आहे अशी अफवा काहीजण पसरवत आहेत. मात्र हे सत्य नसून, भाजप सरकार विरोधात खोट्यानाट्या अफवा पसरवून आंबेडकरी चळवळीतील लोकांना भडकविण्याचे कारस्थान सुरू आहे. मात्र, जर कोणी संविधान किंवा आरक्षणाला नष्ट करण्याचा प्रयत्न जरी केला तर मी त्यांना सोडणार नाही. असा इशाराच […]
‘पवई से नो टू ड्रग्ज’ रॅलीचे आयोजन
पवई भागात वाढत्या नशाखोरीला रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी (भाजपा) वार्ड क्रमांक १२२ तर्फे सोमवारी हिरानंदानी ते आयआयटी ‘पवई से नो टू ड्रग्ज’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा नगरसेवक (१२२) वैशाली पाटील, पदाधिकारी व कार्यकत्यांसह मोठ्या प्रमाणात स्थानिक यात सहभागी झाले होते. अनेक तरुणांना ड्रग्ज सारख्या व्यसनाने आपल्या कवेत घेतलेले असताना, आता याची लाट […]
बसमधील बेवारस बॉक्सने पवई हादरली
काल संध्याकाळी अंधेरीच्या दिशेने जाणारी बस मार्ग क्रमांक ४०३ पवईमध्ये असताना, बसच्या कंडक्टरला बसमध्ये पाठीमागील सीटजवळ एक बेवारस बॉक्स आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्वरित बस रिकामी करण्यात आली. बस निर्जन स्थळी घेवून जावून बॉंब स्कोडला पाचारण करून बॉक्स ताब्यात घेण्यात आला. मुलुंड ते आगरकर चौक (अंधेरी) या मार्गावर चालणारी बस क्रमांक ४०३ काल […]
आयआयटीत ‘धम्मदीप’चे ‘भिमस्पंदन’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यावर्षी साजऱ्या होणाऱ्या १२६ व्या जयंतीनिमित्त बौद्ध धम्माचा दिप तेवत ठेवणाऱ्या धम्मदीप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून शनिवारी आयआयटी मार्केट भागात संस्थेतर्फे ‘भिमस्पंदन’ या प्रबोधनपर संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची […]
अलोट जनसागर व शोकाकूल वातावरणात प्रमिलाताईना अखेरचा निरोप
@अविनाश हजारे, रविराज शिंदे नवनिर्वाचित कॉग्रेसच्या नगरसेविका (प्रभाग क्रमांक ११६) प्रमिलाताई पाटील यांचे पार्थिवावर आज (बुधवारी) सोनापूर स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. अंतयात्रा दिनाबामा पाटील इस्टेट येथून निघून एलबीएस मार्गाने सोनापूर स्मशान भूमी येथे नेण्यात आली. यावेळी हजारोंचा जनसमुदाय अंतयात्रेला सहभागी झाला होता. भांडूपच्या दिना बामा पाटील […]
पोलिस भरतीमध्ये उमेदवाराने उंची वाढवण्यासाठी केसांत लपवली कॅरमची सोंगटी
पोलिस भरतीमध्ये डमी उमेदवार उभे केलेल्या तरुणांना पवई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, अजून एका उमेदवाराने चक्क च्युइंगमच्या सहाय्याने काळी सोंगटी चिकटवून उंची वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात मरोळ येथे पोलिस मैदानावर भरती दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करत उमेदवाराला अटक केली आहे. मुंबईत होणाऱ्या […]
पवई प्लाझामध्ये भीषण आग; ऑफिस जळून खाक
हिरानंदानी येथील पवई प्लाझाच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जिओ सिंडीकेट या कन्सल्टन्सी ऑफिसला आज (सोमवार) सकाळी ११.३० वाजता भीषण आग लागली. आगीत कन्सल्टन्सी ऑफिस जळून पूर्ण खाक झाले असून, शेजारी असणाऱ्या दोन ऑफिसना सुद्धा याची झळ बसली आहे. इमारत प्रशासन, शॉप कर्मचाऱ्यांच्या मदतीने व घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमनदलाच्या ५ गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या […]
मानवी साखळीच्या माध्यमातून पवईकरांची कुलभूषण जाधवांच्या सुटकेची मागणी
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनाविलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर देशभरातून सेलिब्रिटींजसह सर्वसामान्य नागरिक विविध माध्यमातून आपला निषेध व्यक्त करत आहेत. गुरुवारी सकाळी पवईकरांनी हिरानंदानी येथील सिल्वर ओक या त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीबाहेर ‘मानवी साखळी’ करुन शासनाकडे जाधवांना परत आणण्याची मागणी केली. यात जाधव यांचा लॉन्ड्री बॉय विजय कनोजियाचा सुद्धा सहभाग होता. पवईकर व माजी […]
मारुती मंदिर वाचवण्यासाठी सह्यांची मोहीम
आयआयटी येथील मारुती मंदिराला पालिका ‘एस’ विभागाने निष्कासनाची नोटीस बजावल्यानंतर आता हे मंदिर केवळ एका व्यक्तीच्या मालकीचे नसून आम्हा सर्वांचे आहे म्हणत भक्तमंडळी मैदानात उतरली आहेत. मारुती मंदिर बचाव मोहिमेअंतर्गत मंदिर वाचवण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव बनवण्यासाठी आज (११ एप्रिल २०१७) मारुती मंदिर परिसरात हनुमान जयंती आणि सह्यांची मोहीम असा दुहेरी उपक्रम राबवला जात आहे. मुंबईतील […]
कथित गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान लष्करी कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा
भारतीय गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (रॉ)चे गुप्तचर असल्याचा दावा करत, कराची आणि बलुचिस्तानमध्ये घातपाताचा कट रचल्याच्या आरोपाखाली रावळपिंडीच्या लष्करी कोर्टाने सोमवारी पवईकर आणि निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी ३ मार्चला बलुचिस्तानमधून पाकिस्तानच्या सुरक्षा दलांने जाधव यांना अटक केली होती. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा निश्चित केल्याचे पाकिस्तानी […]
आयआयटी येथील मारुती मंदिर सात दिवसात हटवण्याची पालिकेची नोटीस
आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) ९२ वर्षापासून उभ्या असणाऱ्या मारुती (हनुमान) मंदिराला पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हीलच्या सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा व महाराष्ट्र शासनाचा ०४.१०.२०१० रोजी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या पारित करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत पालिकेच्या एस विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालयातून गुरुवारी (०६ एप्रिल २०१७) मंदिर प्रशासनाला ७ दिवसाच्या आत हनुमान मंदिर […]
तिनचाकीचे सारथ्य ‘ती’च्या हाती, संसाराचा गाडा हाकण्यासाठी
पवई, चांदिवली भागात तुम्ही रिक्षाला हात दाखवता, रिक्षा जवळ येवून थांबते आणि पाहता तर काय एक महिला रिक्षाचालक तिचे सारथ्य करत आहे. हो हे पवईच्या रस्त्यांवर शक्य आहे! कारण गेली अनेक वर्ष केवळ पुरुषांची मक्तेगिरी आहे असे समजले जाणाऱ्या रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात महिलाही उतरल्या आहेत. पार्कसाईट येथे राहणाऱ्या निशा अमोल दांगट (निशा शिवाजी शिंदे) गेली […]
चलनातून बाद झालेल्या १.७ करोड रुपयाच्या नोटा बाळगणाऱ्या व्यावसायिकाला अटक
चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयाच्या १,७०,६१,५०० रुपये किमतीच्या जुन्या नोटा बाळगल्या प्रकरणी जुहू एटीएस व पवई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत व्यावसायिक अजय राजेंद्रप्रसाद गुप्ता (३६) याला रविवारी अटक केली. साकीविहार रोडवरील सोलारीस इमारतीत असणाऱ्या त्याच्या कार्यालयात छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. कोर्टात हजर केले असता त्याला जामीन देण्यात आला आहे. “अजय […]
हिरानंदानीत ‘बॉंब’ बोंब; निघाले तापमान मोजणारे उपकरण
काल (सोमवार) दुपारी पवईतील हिरानंदानी शाळेच्या बाजूला कोणीतरी अज्ञात इसमाने बॉंब ठेवला असल्याची बोंबा बोंब झाल्याने पालकांसह संपूर्ण पवई या बातमीने हादरून गेली. पालकांनी धावपळ करत आपल्या मुलांना ताब्यात घेण्यासाठी सरळ शाळा गाठली. मात्र, पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर रिकामा करून बंद करत सुरक्षित केल्याने पालकांची चांगलीच धांदल उडाली. अखेर दोन तासानंतर पोहचलेल्या बॉंब स्कोडने दिसणारी […]
गौतमनगरमध्ये तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
@रविराज शिंदे पवईतील गौतमनगर पाईपलाईन येथे एका २३ वर्षीय तरूणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. जतिन रामचंद्र परब (२३) असे तरूणाचे नाव असून, तो परिवारासह गौतमनगर परिसरात राहतो. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आई-वडिलांना विना काही सांगताच जतिन घरातून बाहेर पडला होता. रात्रभर मुलगा घरी परतला नसल्याने आई-वडिलांनी सकाळी आसपास […]
पवईत सापडलेली चिमुरडी परतली स्वगृही
पवईत चांदशहावाली जत्रेच्या दरम्यान पवई पोलिसांना सापडलेल्या ६ वर्षाच्या मुलीच्या परिवाराचा शोध काढत पवई पोलिसांनी तिला सुखरूप स्वगृही परतवले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी तिचे वडील विनोद शेंडे यांच्या ताब्यात मुलीला सुपूर्द केले. एका महिन्यात तिसऱ्यांदा पवई पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावत २४ तासाच्या आत परिवार पुनर्मिलन घडवले आहे. यापूर्वी हिरानंदानी येथील शाळेतून गायब झालेल्या […]
पवईत सख्या बापानेच केला आपल्या मुलीवर अत्याचार
@अविनाश हजारे, रविराज शिंदे नराधम सख्या बापानेच आपल्या ९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पवईतील इंदिरानगर परिसरात घडली. विलास गायकवाड (३६ वर्षे) असे या नराधमाचे नाव असून,”पोस्को” कायद्यांतर्गत व भादवि कलम ३५४ नुसार गुन्हा नोंदवत पार्कसाईट पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी गायकवाड हा आपल्या कुटुंबासोबत पवईच्या देवीपाडा-इंदिरानगर परिसरात आपल्या बायको-मुलांसोबत राहायला […]
पवईजवळ धावती कार पेटली
@रविराज शिंदे पवईजवळ गांधीनगर येथे काल रात्री मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या ओला कारला अचानक आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली. विक्रोळी अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नक्की कारण समजू शकले नसले तरी वायरिंगमध्ये शोर्ट सर्किट होऊन ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काल, बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या […]
पवईत होळीला गालबोट; एकाचा खून तर एकाची आत्महत्या
@रविराज शिंदे सोमवारी होळीच्या मुहूर्तावर किरकोळ वादातून पवईतील पेरूबाग येथे डोक्यात आणि मांडीत बिअरच्या बाटल्या घालून एकाची हत्या करण्यात आली आहे. तर इंदिरानगर येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन हेमाडे (२०) असे खून करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याच गुन्ह्यात पवई पोलिसांनी चार लोकांना अटक केली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत इंदिरानगर […]