Tag Archives | पवई

nisha

तिनचाकीचे सारथ्य ‘ती’च्या हाती, संसाराचा गाडा हाकण्यासाठी

पवई, चांदिवली भागात तुम्ही रिक्षाला हात दाखवता, रिक्षा जवळ येवून थांबते आणि पाहता तर काय एक महिला रिक्षाचालक तिचे सारथ्य करत आहे. हो हे पवईच्या रस्त्यांवर शक्य आहे! कारण गेली अनेक वर्ष केवळ पुरुषांची मक्तेगिरी आहे असे समजले जाणाऱ्या रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात महिलाही उतरल्या आहेत. पार्कसाईट येथे राहणाऱ्या निशा अमोल दांगट (निशा शिवाजी शिंदे) गेली […]

Continue Reading 0
banned notes

चलनातून बाद झालेल्या १.७ करोड रुपयाच्या नोटा बाळगणाऱ्या व्यावसायिकाला अटक

चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयाच्या १,७०,६१,५०० रुपये किमतीच्या जुन्या नोटा बाळगल्या प्रकरणी जुहू एटीएस व पवई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत व्यावसायिक अजय राजेंद्रप्रसाद गुप्ता (३६) याला रविवारी अटक केली. साकीविहार रोडवरील सोलारीस इमारतीत असणाऱ्या त्याच्या कार्यालयात छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. कोर्टात हजर केले असता त्याला जामीन देण्यात आला आहे. “अजय […]

Continue Reading 0

हिरानंदानीत ‘बॉंब’ बोंब; निघाले तापमान मोजणारे उपकरण

काल (सोमवार) दुपारी पवईतील हिरानंदानी शाळेच्या बाजूला कोणीतरी अज्ञात इसमाने बॉंब ठेवला असल्याची बोंबा बोंब झाल्याने पालकांसह संपूर्ण पवई या बातमीने हादरून गेली. पालकांनी धावपळ करत आपल्या मुलांना ताब्यात घेण्यासाठी सरळ शाळा गाठली. मात्र, पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर रिकामा करून बंद करत सुरक्षित केल्याने पालकांची चांगलीच धांदल उडाली. अखेर दोन तासानंतर पोहचलेल्या बॉंब स्कोडने दिसणारी […]

Continue Reading 0
20170323-202805.jpg

गौतमनगरमध्ये तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

@रविराज शिंदे पवईतील गौतमनगर पाईपलाईन येथे एका २३ वर्षीय तरूणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. जतिन रामचंद्र परब (२३) असे तरूणाचे नाव असून, तो परिवारासह गौतमनगर परिसरात राहतो. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आई-वडिलांना विना काही सांगताच जतिन घरातून बाहेर पडला होता. रात्रभर मुलगा घरी परतला नसल्याने आई-वडिलांनी सकाळी आसपास […]

Continue Reading 0
20170320-005821.jpg

पवईत सापडलेली चिमुरडी परतली स्वगृही

पवईत चांदशहावाली जत्रेच्या दरम्यान पवई पोलिसांना सापडलेल्या ६ वर्षाच्या मुलीच्या परिवाराचा शोध काढत पवई पोलिसांनी तिला सुखरूप स्वगृही परतवले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी तिचे वडील विनोद शेंडे यांच्या ताब्यात मुलीला सुपूर्द केले. एका महिन्यात तिसऱ्यांदा पवई पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावत २४ तासाच्या आत परिवार पुनर्मिलन घडवले आहे. यापूर्वी हिरानंदानी येथील शाळेतून गायब झालेल्या […]

Continue Reading 0
crime1

पवईत सख्या बापानेच केला आपल्या मुलीवर अत्याचार

@अविनाश हजारे, रविराज शिंदे नराधम सख्या बापानेच आपल्या ९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पवईतील इंदिरानगर परिसरात घडली. विलास गायकवाड (३६ वर्षे) असे या नराधमाचे नाव असून,”पोस्को” कायद्यांतर्गत व भादवि कलम ३५४ नुसार गुन्हा नोंदवत पार्कसाईट पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी गायकवाड हा आपल्या कुटुंबासोबत पवईच्या देवीपाडा-इंदिरानगर परिसरात आपल्या बायको-मुलांसोबत राहायला […]

Continue Reading 0

पवईजवळ धावती कार पेटली

@रविराज शिंदे पवईजवळ गांधीनगर येथे काल रात्री मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या ओला कारला अचानक आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली. विक्रोळी अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नक्की कारण समजू शकले नसले तरी वायरिंगमध्ये शोर्ट सर्किट होऊन ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काल, बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या […]

Continue Reading 0
hatya

पवईत होळीला गालबोट; एकाचा खून तर एकाची आत्महत्या

@रविराज शिंदे सोमवारी होळीच्या मुहूर्तावर किरकोळ वादातून पवईतील पेरूबाग येथे डोक्यात आणि मांडीत बिअरच्या बाटल्या घालून एकाची हत्या करण्यात आली आहे. तर इंदिरानगर येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन हेमाडे (२०) असे खून करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याच गुन्ह्यात पवई पोलिसांनी चार लोकांना अटक केली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत इंदिरानगर […]

Continue Reading 0

पवईत जनावरांचे मांस घेऊन जाणारी गाडी पकडली; दोघांना अटक

आज (रविवारी) सकाळी बेकायदेशीरपणे जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या बलेरो पिकअप गाडीला ताब्यात घेत पवई पोलिसांनी दोन लोकांना अटक केली आहे. मुरबाड येथे जनावरांची कत्तल करून त्याचे मांस मुंबईत घेऊन येत असताना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही कारवाई केली. अली उस्मान कुरेशी (३५), सय्यद परवेज अहमद (४०) अशी पवई पोलिसांनी या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे […]

Continue Reading 0
disha0

जागतिक महिलादिन विशेष: पवईकर तरुणीची जनजागृतीसाठी इंडिया गेट ते वाघा बॉर्डर सायकलिंग

मानसिक तणाव आणि उदासीनता याच्याशी दोन हात करण्यासाठी ‘खेळाला जवळ करा’ असा संदेश घेऊन पवईकर आणि दोन मुलांची आई असणाऱ्या दिशा श्रीवास्तव (३६), यांनी इंडिया गेट ते वाघा बॉर्डर असा ६०० किलोमीटरचा प्रवास ४ मार्च ते ६ मार्च सायकलवरून करत लोकांच्यात जनजागृती केली. कुरुक्षेत्र, लुधियाना आणि अमृतसर अशा तीन टप्प्यात त्यांचा हा प्रवास झाला. दररोज […]

Continue Reading 0
IMG-20170307-WA0006

पवई पोलिसांनी 24 तासांच्या आत लावला हरवलेल्या मुलाचा छडा

अविनाश हजारे/रविराज शिंदे  मागील अनेक प्रकरणांवरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर  प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच अफाट कामगिरीची चुणूक पवई पोलिसांनी दाखवून दिली आहे. पवईच्या तुंगागाव परिसरातून हरवलेल्या हर्षद सुमित यादव या 3 वर्षीय चिमुकल्याला चोवीस तासाच्या आत शोधून काढत त्याच्या  आई-वडिलांच्या  हवाले करून पोलिसांनी आपल्या कार्यतत्परतेची प्रचिती दिली आहे. पवईच्या तुंगा परिसरात यादव दाम्पत्य राहतात. 5 मार्च रोजी सायंकाळी […]

Continue Reading 0

एनटीपीसी इमारतीत आग, मोठा अपघात टळला

जलवायू विहार जवळ असणाऱ्या एनटीपीसी या रहिवाशी संकुलाच्या ‘डी’ विंगच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी एसीत शोर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या माहिती मिळताच पाच मिनिटाच्या आत घटनास्थळावर दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. पवई उंच इमारतींच्या ठिकाणा व्यतिरिक्त आगीचे ठिकाण म्हणून पण आता ओळख निर्माण करू लागले आहे. येथील उंच उंच इमारतीत गेल्या […]

Continue Reading 2

नवनिर्वाचीत नगरसेविकांच्या हस्ते विकास कामाचा नारळ फुटला

प्रभाग क्रमांक १२२ मधून निवडून आलेल्या पवईच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.वैशाली श्रीकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी हरिओमनगर येथे त्यांच्या कार्यकाळातील विकासाच्या कामाचा पहिला नारळ फोडला गेला. यावेळी येथील माजी नगरसेवक चंदन शर्मा सह परिसरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या निधीतून मलनिसारण वाहिनी बनवण्याचे काम येथे केले जात आहे. २०१७ ते २०२२ […]

Continue Reading 0
fire020317

जयभिम  नगरमध्ये भीषण आग, वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल

@रविराज शिंदे पवईतील जयभीम नगर परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे ४ वाजता घडली. सदर घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. मात्र, अतितापमान परिस्थितीत वीज खंडीत झाल्याने नागारिकांचे मात्र अतोनात  हाल झाले. जयभीम नगर या डोंगराळ भागातील संपूर्ण परिसराला एमएसईबी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. ज्याचे ट्रान्सफॉर्मर परिसराच्या मुख्यप्रवेशद्वारावर […]

Continue Reading 0
121,122 winners

पवईत कमळ फुलले; भाजपच्या वैशाली पाटील विजयी

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निर्णय नुकतेच जाहीर झाले असून, पवईतील प्रभाग क्रमांक १२२ मध्ये गेली २५ वर्ष सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या गडावर भाजपाची उमेदवार वैशाली पाटील यांनी ४८७० मते मिळवत ७०० मताधिक्याने विजयी होत कमळ फुलवले. दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी (४१४०), तिसऱ्या स्थानावर शिवसेना (३५८९) तर चौथ्या स्थानावर कॉंग्रेस (१३०७) पक्षाला समाधान मानावे लागले आहे. प्रभाग क्रमांक […]

Continue Reading 0
vote

पवईत मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद; ५२% मतदान

काल (२१ फेब्रुवारीला) झालेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२२ जो पवईचा सर्वात मोठा भाग व्यापतो यातून मोठ्या प्रमाणात मतदारांनी घरातून बाहेर निघत मतदानाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. या प्रभागातून ३१८७३ मतदारांपैकी १६७१६ मतदारांनी आपले कर्तव्य बजावल्याने ५२.४४% मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता पवई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवल्याने शांततेत मतदान पार पडले. मुंबई महानगरपालिकेच्या […]

Continue Reading 0

पालिका निवडणुकीसाठी पवईत नवीन चेहऱ्यांना संधी

महिना अखेरीस होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी पालिका एस विभागा अंतर्गत येणाऱ्या पवईतील प्रभाग क्रमांक १२०, १२१, १२२ मध्ये यावेळेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस आणि मनसे या प्रमुख पक्षांतर्फे अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, मराठी मतांसाठींची आणि अस्तित्वाची लढाई जोरदार रंगणार आहे. वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून भलत्याच उमेदवाराला तिकीट दिल्याने काही […]

Continue Reading 0

पवईत तोतया पोलिसाला अटक

“तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा आहे आणि आम्ही तुला अटक करायला आलो आहोत” असे सांगून, खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तोतया पोलिसांच्या दुकलीतील एकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. विजय तटकरे असे अटक आरोपीचे नाव असून, अशाच प्रकारच्या एका प्रकरणात १२ वर्षापूर्वी साकीनाका पोलिसांनीही त्याला अटक केली होती. एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारे पंचेचाळीस वर्षीय […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!