पवई पोलीस ठाणे हद्दीपासून काहीच अंतरावर पार्क केलेली मोटारसायकल पळवून नेऊन अर्ध्या तासात त्याचे पार्ट काढून विकण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहीम अकबर शेख उर्फ झिपी (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मोहमद गणी शेख हे कुर्ला कोर्टाजवळ राहतात. १८ तारखेला त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्याने ते […]
Tag Archives | पवई
विमानाने प्रवास करून २८० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या तिकडीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सुमारे तीन आठवड्यांपूर्वी पवईतील हिरानंदानी भागातील सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरातून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा २४.७१ लाखांचा डल्ला मारल्याच्या आरोपाखाली पवई पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जलवायू विहार येथे राहणारे माजी नौदल अधिकारी पत्नीसह आगरतळा येथे गेले होते. आपल्या घराची चावी त्यांनी घरकाम करणारी बाई शैला शिर्के यांच्याकडे सोपवल्या होत्या. “शिर्के फक्त घर […]
पवई तलावातील सायकल ट्रॅक प्रकल्पाविरोधात पवईकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पवई तलाव वाचवा मोहिमेला आता चांगलीच गती मिळाली असून, पवई तलावातून आणि सभोवतालच्या परिसरातून जाणाऱ्या सायकल ट्रॅकच्या विरोधात पवईकरांच्या एका गटाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तलावाच्या आतील भागातून सायकल ट्रॅकच्या बांधकामावर त्यांनी धक्का व्यक्त करताना हा प्रकल्प किती हानिकारक आहे याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. पवईकर […]
शाब्बास रे वाघा ! पाठलाग करून एकट्याने पकडले दोन मोबाईल चोर
मुंबई पोलिसांच्या कार्यामुळेच मुंबई पोलिसांनी स्कॉटलंड यार्ड नंतर द्वितीय स्थान कमावले आहे. ते तेवढेच खरे सुद्धा असल्याची प्रचिती नुकतीच पवई परिसरात आली. आपले कर्तव्य संपवून परतत असताना दोन मोबाईल चोर चोरी करून पळत असल्याचे दिसताच पवई पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पठारे यांनी कसलाच विचार न करता त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या […]
वीर सावरकर नगरला नवी उजाळी
पवई रामबाग म्हाडा वसाहत स्थित वीर सावरकर नगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक सुस्थितीत आणण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. मंगळवारी तरुणांनी मिळून सदर स्मारका भोवती गेली अनेक दिवस पसरलेल्या झाडाझुडपांचे जंगल हटवत परिसर स्वच्छ केला. कोरोना टाळेबंदीमुळे मुंबईकर घरात अडकून पडले होते. त्यामुळे कोरोनाशी लढा देताना या लढाईत महत्वाचा भाग असणाऱ्या पालिकेची अनेक कामे […]
पवई तलावावर बाप्पांना भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर ! या अशा गर्जनेत, ढोल-ताशांच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे बुधवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. शुक्रवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर रविवारी दीड दिवसाच्या आणि बुधवारी […]
माझा बाप्पा भाग २
पवईकरांनो सावधान ! हिरानंदानीच्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्हीची नजर, २५०० लोकांना ई चलन
पवईतील हिरानंदानी परिसरात स्थानिक भागात फिरत आहात आणि वाहतूक पोलीस नसतात म्हणून वाहतुकीचे नियम मोडत वाहन चालवत असाल तर सावधान! हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर असणाऱ्या वन वे रस्त्यांवर वाहतूक पोलिसांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतूक पोलिसांतर्फे ई चलन द्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. चार वर्षापूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी […]
डंपर चोरी करणाऱ्या आरोपीस पवई पोलिसांनी अवघ्या पाच तासात ठोकल्या बेड्या
पवई, साकीनाका भागातून डंपर चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या ५ तासात माग काढत अटक केली आहे. पप्पु उर्फ बहादुर राममनी आदिवाशी (वय ३० वर्षे) राहणार उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३० लाख किंमतीचा डंपर हस्तगत केला आहे. फिर्यादी मोहम्मद बिलाल छांगुर चौधरी यांनी दिनांक ७ सप्टेंबर रोजी […]
बाईक स्टंट करणाऱ्या सोशल मिडिया इंन्फ्ल्युन्सरला पवई पोलिसांचा दणका; परवाना निलंबित, बाईक जप्त
पवई पोलिसांनी जप्त केलेली अरमान खान याची मोटारसायकल बाईकवरून स्टंट करून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या एका २१ वर्षीय सोशल मिडिया इंन्फ्ल्युन्सर तरुणाला पवई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची विनापरवाना मोडीफाईड मोटारसायकल जप्त केली आहे. एवढ्यावरतीच न थांबता त्याचा मोटारसायकल चालवण्याच्या परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असून, पुन्हा असे कृत्य […]
पवईत स्वातंत्र्य दिनानिमित्त १५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान
@प्रतिक कांबळे कोरोना विषाणुचा झपाट्याने होणारा प्रसार आणि त्यात भासणारा रक्ताचा अपुरा साठा लक्षात घेता पवईतील आयुष्य फांऊंडेशन संघटनेच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माता रमाबाई आंबेडकर नगर २ येथील विश्वशांती बुद्ध विहारात आयोजित या शिबिरात १५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात सायन रुग्णालयाची रक्तपेढी लाभली होती. पेढ्यामध्ये असणारा अपुरा […]
पवईत रेशनिंग दुकान सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम
@अविनाश हजारे | पवईतील गणेशनगर येथील एकमेव रेशनिंग दुकान शिधावाटप प्रशासनाने इतरत्र हलवल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, याविरोधात आता नागरिकांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. भांडूप शिधावाटप कार्यालय अंतर्गत असलेल्या ३० ई ९५ व ३० ई ९६ ही दुकाने पवईतील गणेशनगर भागात अनेक वर्षांपासून कार्यरत होती. टाळेबंदीच्या काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात […]
घरात मृतावस्थेत सापडली परदेशी महिला
परदेशी नागरिक असणारी एक ५० वर्षीय महिला पोलिसांना पवईत मृतावस्थेत मिळून आली आहे. गुरुवार, १५ जुलैला संध्याकाळी चैतन्यनगर भागात ही महिला तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत पोलिसांना मिळून आली. स्थानिक रुग्णालयात किडनीच्या आजारामुळे ती डायलेसिस घेत होती. प्रथमदर्शनी तिचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियन नागरिक […]
चांदीवलीत डिलिव्हरी बॉयला कचऱ्याच्या डंपरने चिरडले
चांदीवली येथील लेकहोम जवळ एका डिलिव्हरी बॉयला डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. डिलिव्हरी बॉय सकाळी कामावर हजर होत असताना मोटारसायकल घसरल्याने डंपरखाली आल्याने ही घटना घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत डंपर चालक मोहम्मद आरिफ मोहंम्मद याकूब शहा (३४) याला अटक केली आहे. चांदीवली येथील संघर्षनगर भागात राहणारे आणि डिलिव्हरी बॉय म्हणून […]
सोशल माध्यमाव्दारे मैत्री करून २०.४७ लाखाचा गंडा घालणाऱ्या आरोपींना उत्तरप्रदेशमधून अटक; पवई पोलिसांची कारवाई
पवईतील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी परदेशी नागरिक असल्याचे भासवत सोशल माध्यमात बनावट खाते बनवून, मैत्री करून नंतर मोबाईलवर संपर्क साधत भारतातील गरीब कोविड रुग्णांना मदत म्हणून पैसे पाठवण्याच्या बहाण्याने २०.४७ लाखाची फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना पवई पोलिसांनी शनिवारी नोएडा, उत्तरप्रदेश येथून बेड्या ठोकल्या आहेत. राहुल विनोद तिवारी (वय २१ वर्ष), आसिम समशाद हुसेन (वय २३ […]
चांदिवलीत माजी महिला पत्रकाराची ७ वर्षाच्या मुलासह आत्महत्या
इंग्रजी दैनिकाच्या माजी पत्रकार महिलेने चांदिवली येथील नहार अमृत शक्ती येथील तुलीपिया इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून आपल्या ७ वर्षीय मुलासह उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. रेश्मा ट्रेंचिल (४४) असे या महिलेचे नाव असून, तिने लिहलेल्या सुसाईडच्या नोटच्या आधारावर साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंद करत एका […]
३० लाखाचे दागिने चोरी करून पसार झालेल्या इसमास पवई पोलिसांनी ६ तासात ठोकल्या बेड्या
पवईतील ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करून ३० लाख किंमतीच्या दागिन्यांसह पसार झालेल्या एका २६ वर्षीय व्यक्तीला पवई पोलिसांनी अवघ्या ६ तासात बेड्या ठोकल्या आहेत. हिरालाल लेहरुलाल कुमावत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिरालाल यावर्षी २० मे रोजी जामिनावर सुटला होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. दोन वर्षापूर्वी जुगारात हरल्याने कर्ज फेडण्यासाठी […]
पवई तलाव ओव्हरफ्लो
पाठीमागील काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने पवई तलाव शनिवारी संध्याकाळी ओसंडून वाहू लागला. मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास २४ दिवस आधीच तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलावाची निर्मिती १८९० मध्ये करण्यात आली. मुंबईतील मोठ्या कृत्रिम तलावांपैकी पवई तलाव एक आहे. या तलावाचे पाणी मुख्यत: औद्योगिक कामांसाठी वापरले […]
पवईत भूस्खलन, गाड्यांचे नुकसान
भूस्खलन झाल्याने इमारतीची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना पवईमध्ये शुक्रवार सकाळी घडली. सुदैवाने येथे कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद झाली नसून, काही गाड्यांचे मात्र नुकसान झाले आहे. पवईतील मुंबई महानगरपालिकेच्या प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी भूस्खलन झाल्याने सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली. जवळपास १० मीटरपर्यंत जमीन धसल्याची घटना घडली आहे. कोरोना रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी येथे कोविड केअर सेंटर (सिसिसि) […]
कस्टम अधिकारी, पत्नीला १.९ लाखाचा गंडा
सीमाशुल्क विभागाच्या एका इन्स्पेक्टर आणि त्यांच्या पत्नीला एका तोतयाने तिचा भाऊ असल्याचे सांगत १.९ लाखाला गंडवले आहे. तत्काळ पैशांची गरज असलेल्या आपल्या मित्राच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत या तोतयाने त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात पवई पोलीस गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पवई पोलिसांनी सांगितले की, सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या पत्नीने […]