रस्त्यात गाडी अडवून चालकाकडून जबरी चोरी करून पसार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हेप्रकटीकरण पथकाने २४ तासाच्या आत अटक केली आहे. प्रदीप चव्हाण (१९) आणि संजय वर्मा (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एक्टिवा मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी आयआयटी मेनगेट येथे पवईतील महात्मा फुलेनगर येथे राहणारे धर्मेंदर अरुण यादव यांची गाडी अडवून मोबाईल आणि […]
