भूस्खलन झाल्याने इमारतीची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना पवईमध्ये शुक्रवार सकाळी घडली. सुदैवाने येथे कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद झाली नसून, काही गाड्यांचे मात्र नुकसान झाले आहे. पवईतील मुंबई महानगरपालिकेच्या प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी भूस्खलन झाल्याने सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली. जवळपास १० मीटरपर्यंत जमीन धसल्याची घटना घडली आहे. कोरोना रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी येथे कोविड केअर सेंटर (सिसिसि) […]
Tag Archives | विलगीकरण केंद्र
आयआयटी पवईत ४० रुग्ण ठेवल्याची माहिती खोटी – जनसंपर्क अधिकारी
आयआयटी मुंबईत काम करणारे हाऊसकिपिंग कामगार सहीत अन्य विभागात काम करणाऱ्या काही लोकांकडून पवईत या कॅम्पसमध्ये ४० रूग्ण आणण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. आमची ड्युटी तिथेच आहे असं ‘डंके की चोट पर’ सांगितले जात आहे. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या संदर्भात आयआयटी मुंबई जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती विचारली असता […]
आयआयटी मुंबईचे विलगीकरण केंद्र रद्द
पवईतील दोन ठिकाणी सी कॅटेगरीमधील बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी केंद्र उभी करण्याची लगबग सुरु होती. आयआयटी पवई आणि रहेजा विहार येथील प्रशिक्षण केंद्रात हे विलगीकरण कक्ष बनवण्यात येणार होते. मात्र ही लगबग सुरु असतानाच आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बनवण्यात येणारे विलगीकरण केंद्र शासनातर्फे रद्द करण्यात आल्याचे तहसीलदार मिलिंद बोरीकर यांनी स्पष्ट केले आहे. जगभर […]
पवईत दोन ठिकाणी तयार होत आहेत विलगीकरण केंद्र
जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने (कोव्हीड १९) भारतात प्रवेश केला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १६६च्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मिळून सध्या ४८ पॉजीटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात पोहचलेल्या या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने सुद्धा ठोस पाऊले उचलली असून, ठिकठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी सेंटर उभी करण्याची लगबग सुरु […]