पर्यावरण रक्षणासाठी यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रस्टच्या वतीने रविवारी हिरानंदानी येथे आयोजित सायक्लोथॉनमध्ये अबाल वृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मुंबईचे डब्बेवाले, सायकलवर कर्तब करणारे, शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला आणि विविध संस्थांच्या मुलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत प्रदूषण आणि वाहन विरहीत रविवारचा आनंद लुटला. त्यावेळी टिपलेली काही छायाचित्रे.
Tag Archives | सायक्लोथॉन
पवई सायक्लोथॉनमध्ये मुंबईचे डब्बेवाले
ऊन, वारा, पाऊस काहीही असो सायकलवरून प्रवास करत वेळेच्या आत चाकरमान्यांना त्यांचा डब्बा पोहचवणारे आणि जगात मँनेजमेंट गुरु म्हणून स्थान असणारे मुंबईचे डब्बेवाले, पर्यावरण संरक्षणाच्या मुद्यावर पुढे सरसावत रविवारी १३ डिसेंबरला (उद्या) होणाऱ्या पवईच्या पहिल्या वहिल्या सायक्लोथॉनमध्ये विद्यार्थी, सायकल प्रेमी, मान्यवर, ज्येष्ठ नागरिकांसोबत शामिल होणार आहेत. हिरानंदानीच्या डोंगर, हिरवळीतून बनलेल्या रस्त्यातून आपल्या सायकलवर हे डब्बेवाले […]
१३ डिसेंबरला पवईत सायक्लोथॉनचे आयोजन
मुलांना शाळेत, महाविद्यालयात जाताना सायकलचा वापर करण्यासाठी यंग इन्वायरमेंटलिस्टचे आवाहन वाहनाच्या बाहेर पडणाऱ्या धुरातून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन पसरल्याने वायूप्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याबरोबरच एक उत्तम आरोग्य मिळावे म्हणून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटलिस्ट ट्रुस्टच्या वतीने लोकांनी सायकल संस्कृती जपावी म्हणून सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. १३ डिसेंबरला हिरानंदानीमधील हेरीटेज […]